शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
2
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
3
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
4
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
5
माऊलीच्या भक्ताचा अनोखा सन्मान! आळंदी मंदिरास नांदेडच्या भाविकाकडून एक किलो सोन्याचा मुकुट अर्पण
6
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
7
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
8
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
9
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
10
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
11
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
12
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
13
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
14
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
15
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
16
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
17
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
18
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू
19
'हुकूमशहा-पाकिस्तानचा खुनी..', अमेरिकेत गेलेल्या असीम मुनीरच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
20
“सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशाने भाजपाची ताकद वाढली, आता महापालिका निवडणूक...”: गिरीश महाजन

पत्नीला पळवून नेल्यामुळे पतीने काढला प्रियकाराचा काटा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 12, 2020 01:14 IST

नाशिक : आभाळवाडी परिसरातील एका विवाहितेसोबत प्रेमसंबंध प्रस्थापित करुन दोन महिन्यांपूर्वी विवाहितेला पळवून घेऊन गेल्याचा राग मनात धरत विवाहितेच्या ...

ठळक मुद्दे'त्या' खुनाचा उलगडा : गंगापूर धरणालगत आढळला होता मृतदेह

नाशिक : आभाळवाडी परिसरातील एका विवाहितेसोबत प्रेमसंबंध प्रस्थापित करुन दोन महिन्यांपूर्वी विवाहितेला पळवून घेऊन गेल्याचा राग मनात धरत विवाहितेच्या पतीने प्रियकराचा निर्घृणपणे खून केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. दोन दिवसांपूर्वी गंगापूर धरणाच्या परिसरात आढळून आलेल्या मृतदेहाची ओळख पटवून तालुका पोलीस ठाणे व स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने खुनाचा गुन्हा उघडकीस आणला.याबाबत अधिक माहिती अशी, हरसूल येथे राहणारा नितीन टबाले याचा सावरगाव शिवारात गंगापूर धरणाच्या परिसरात पाटबंधारे विभागाच्या मालकीच्या जागेत मृतदेह आढळून आला होता. मृतदेहाचा पंचनामा केला असता, त्याची बेदम मारहाण करुन हत्या करण्यात आल्याचे समोर आले. तालुका पोलीस ठाण्यात अज्ञात इसमाविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला. या गुन्ह्याचा तालुका पोलीस व स्थानिक गुन्हे शाखा समांतर तपास करत असताना तालुका पोलीस ठाण्याचे शिपाई विक्रम कडाळे यांना मयत नितीन याचे आभाळवाडीतील एक विवाहित स्त्रीसोबत प्रेमसंबंध असल्याचा धागा मिळाला. त्यावरुन पोलिसांनी तपासाची चक्रे अधिक वेगाने फिरविली असता नितीन हा मागील दोन महिन्यांपासून त्या विवाहितेसोबत राहत होता आणि तिच्या पतीने त्याचा खून केल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली. या महितीच्याआधारे संशयित अशोक मोरे (23, रा. आभाळवाडी, उजवा कॅनॉल, महादेवपूर शिवार) यास तालुका पोलिसांनी ताब्यात घेतले. त्याची कसून चौकशी केली असता अशोक याने गुन्हयाची कबुली देत घडलेली हकीगत सांगितली. यानुसार पोलिसांनी त्याच्याविरुद्ध कारवाई करत त्यास खुनाच्या गुन्ह्यात बेड्या ठोकल्या. पुढील तपास तालुका पोलिस करत आहेत.

 

टॅग्स :MurderखूनCrime Newsगुन्हेगारी