शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
4
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
5
मिरा-भाईंदरमधील उड्डाणपूलाचा आकार बाटलीसारखा का? एमएमआरडीएच्या कामावर फडणवीसांचं स्पष्टीकरण
6
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
7
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
8
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
9
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
10
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
11
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
12
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
13
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
14
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
15
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
16
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
17
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
18
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
19
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

खोदलेल्या खड्ड्यांमध्ये रोपांची शोधाशोध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 29, 2018 01:10 IST

वनमहोत्सवानिमित्ताने विविध शासकीय अस्थापनांच्या माध्यमातून रोपे लागवड करण्यात आली; मात्र लावलेल्या रोपांचे संवर्धन रामभरोसेच असून, कश्यपी धरणाच्या परिसरात जलसंपदा खात्याच्या जागेत हजारो रोपे लावण्यात आल्याचा दावा जरी केला जात असला तरी या परिसरात खोदलेल्या खड्ड्यांमध्ये रोपांची शोधाशोध करावी लागते. मंगळवारी (दि.२८) दुपारी दीड वाजेच्या सुमारास भेट दिली असता काही मोजक्याच खड्ड्यांमध्ये रोपे दिसली तर बहुतांश खड्डे नुसतेच ओस पडल्याचे चित्र नजरेस पडले.

नाशिक : वनमहोत्सवानिमित्ताने विविध शासकीय अस्थापनांच्या माध्यमातून रोपे लागवड करण्यात आली; मात्र लावलेल्या रोपांचे संवर्धन रामभरोसेच असून, कश्यपी धरणाच्या परिसरात जलसंपदा खात्याच्या जागेत हजारो रोपे लावण्यात आल्याचा दावा जरी केला जात असला तरी या परिसरात खोदलेल्या खड्ड्यांमध्ये रोपांची शोधाशोध करावी लागते. मंगळवारी (दि.२८) दुपारी दीड वाजेच्या सुमारास भेट दिली असता काही मोजक्याच खड्ड्यांमध्ये रोपे दिसली तर बहुतांश खड्डे नुसतेच ओस पडल्याचे चित्र नजरेस पडले.  धोंडेगावजवळ कश्यपी धरणाच्या परिसराला लागून असलेल्या डोंगराळ भागावर एका खासगी कंपनीच्या प्रयोजनामार्फत हजारो खड्डे खोदले गेले. खड्डे खोदताना कुठल्याहीप्रकारे रोपे लागवडीचा शास्त्रीय अभ्यास करण्यात आल्याचे दिसत नाही. थेट जेसीबीने पाच ते सात फुटांचे खड्डे खोदून या खड्ड्यांमध्ये अवघे काही दिवस वाढीचे लहान आकाराची रोपे लावण्यात आली. त्यामुळे ज्या खड्ड्यांमध्ये रोपे लावली गेली त्या रोपांच्या भोवती त्यांच्या आकारमानापेक्षा अधिक मातीची भर पडली परिणामी रोपे मातीखाली गाडली गेली. रोपे आणि  खड्ड्यांवर करण्यात आलेला खर्च पाण्यात गेल्याचे चिन्ह आहेत. करंज, आवळा, कांचन या प्रजातीच्या रोपांची निवड या ठिकाणी करण्यात आली. मात्र खड्डे मोठे आणि रोपे लहान झाल्याने वृक्षारोपणाचा उपक्रम केवळ फार्स ठरला. जलसंपदा विभागाच्या परवानगीने करण्यात आलेल्या या वृक्षारोपणाचा उद्देश अपूर्णच राहणार असल्याची भीती व्यक्त होत आहे.पिशव्यांसह रोपांची लागवडकश्यपी धरणाच्या परिसरात खोदण्यात आलेल्या खड्ड्यांमध्ये रोपे लागवड करताना अत्यंत निष्काळजीपणा संबंधितांकडून दाखविला गेल्याचे उघड झाले. मंगळवारी दुपारी दीड वाजेच्या सुमारास या ठिकाणी भेट दिली असता खड्ड्यांची पाहणी करताना काही खड्ड्यांमध्ये रोपवाटिके तून आणलेली रोपे पिशवीसह खड्ड्यात ठेवून माती  ढक लून देण्यात आली आहे.वर्षभरापासून खड्ड्यांना रोपांची प्रतीक्षाया जागेत वर्षभरापासून खड्डे खोदण्यात आले होते; मात्र रोपे लागवडीचा मुहूर्त मिळत नसल्याने मागील महिन्यापर्यंत खड्ड्यांना रोपांची प्रतीक्षा होती. जुलै महिन्यात रोपे येथील काही खड्ड्यांमध्ये लावण्यात आली, मात्र यावेळी शास्त्रीय पद्धतीकडे दुर्लक्ष केले गेल्याने लावलेली रोपे जगण्याची चिन्हे कमीच आहे. तसेच काही खड्ड्यांना अद्याप रोपांची प्रतीक्षा असून खड्डे ओस पडलेले आहेत.रोपे जगणार की नाही?रोपांची लागवड केली गेली असली तरी ती काही खड्ड्यांपुरतीच मर्यादित आहे. ही लागवडही अशास्त्रीय पद्धतीने करण्यात आल्यामुळे रोपे वाढतील की नाही, याबाबत संभ्रमच आहे. कारण रोपे लावताना अत्यंत निष्काळजीपणा दाखविण्यात आला आहे. खड्ड्यांचा आकार खूप मोठा आणि त्या तुलनेत रोपे लहान अशी अवस्था या ठिकाणी पहावयास मिळते.

टॅग्स :forest departmentवनविभागforestजंगल