शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
3
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
4
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
5
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
6
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
7
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
8
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
9
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
10
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
11
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
12
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
13
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
14
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
15
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
16
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
17
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
18
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
19
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
20
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
Daily Top 2Weekly Top 5

पर्यटकच नसल्याने वन्यजीवांची उपासमार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 12, 2020 00:28 IST

नांदूरवैद्य : कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे जनमाणसांचीच नव्हे तर जंगलातील मुक्या प्राण्यांवरही अन्न व पाण्यावाचून उपासमारीची वेळ आल्याचे चित्र इगतपुरी-कसारादरम्यान महत्त्वाचे पर्यटन क्षेत्र असलेल्या उंटदरी परिसरात पाहावयास मिळत आहे.

नांदूरवैद्य : कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे जनमाणसांचीच नव्हे तर जंगलातील मुक्या प्राण्यांवरही अन्न व पाण्यावाचून उपासमारीची वेळ आल्याचे चित्र इगतपुरी-कसारादरम्यान महत्त्वाचे पर्यटन क्षेत्र असलेल्या उंटदरी परिसरात पाहावयास मिळत आहे.कोरोनामुळे लॉकडाउन झाल्यामुळे या क्षेत्रात कोणीही फिरकत नसल्यामुळे वन्यप्राण्यांचे अन्न व पाण्यावाचून हाल होत आहेत. त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. अशावेळी महामार्गावर गस्त घालणारे अधिकारी व कर्मचाऱ्यांकडून त्यांची तहान व भूक भागवली जात असल्याचे गस्त अधिकारी रवि देहाडे व इतर कर्मचारी यांनी सांगितले. कसारा घाटाजवळील एक पर्यटन क्षेत्र म्हणून ओळख असणाºया उंटदरी परिसरातील जंगलात अनेक प्राणी वास्तव्यास असून, लॉकडाउनमुळे या पर्यटन क्षेत्राच्या हद्दीत येण्यास शासनाकडून बंदी घालण्यात आली आहे. परिणामी या ठिकाणी कोणीही पर्यटक येत नसल्यामुळे येथील प्राण्यांना अन्न व खाण्याचे पदार्थ मिळत नाहीत. यामुळे या प्राण्यांवरदेखील उपासमारीची वेळ आली आहे. सकाळी महामार्गावरील गस्त घालणारे अधिकारी रवि देहाडे व इतर कर्मचारी यांना भूकेने व तहानेने व्याकूळ झालेले माकडे त्यांच्या दिशेने पळत आल्याचे लक्षात येताच गस्त अधिकारी प्रमुख यांनी सदर मुक्या प्राण्यांना पाणी, बिस्किटे व खाण्याचे पदार्थ देऊन त्यांची भूक व तहान भागवली.

टॅग्स :Nashikनाशिक