शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
2
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
3
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
4
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
5
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
6
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
7
SHOCKING! इराण-अमेरिका युद्धातून डोनाल्ड ट्रम्पची दोन्ही मुलंच उकळताहेत प्रचंड पैसा!
8
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
9
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
10
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
11
Mumbai Local: मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
12
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
13
Palmistry: आत्ताच आपला तळहात तपासा! 'अशी' भाग्यरेषा असणारे लोक होतात प्रचंड श्रीमंत
14
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
15
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
16
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
17
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
18
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
19
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
20
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
Daily Top 2Weekly Top 5

विनाअनुदानित शिक्षकांची उपासमार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 10, 2020 00:27 IST

कुकाणे : विनाअनुदानित तत्त्वावर काम करणाऱ्या शिक्षकांचे पगाराविना हाल होत आहे. कोरोनामुळे शाळा बंद असल्याने ना वेतन ना काम यामुळे ते मेटाकुटीस आले आहेत.

कुकाणे : विनाअनुदानित तत्त्वावर काम करणाऱ्या शिक्षकांचे पगाराविना हाल होत आहे. कोरोनामुळे शाळा बंद असल्याने ना वेतन ना काम यामुळे ते मेटाकुटीस आले आहेत.शिक्षण मानवी जिवांचा महत्त्वाचा पैलू मानला जातो. एखाद्या देशाची अथवा घराची परिस्थिती बदलायची असेल तर शिक्षण हे प्रभावी शास्त्र किंवा शस्र ठरते. शिक्षण धोरणाचा उत्तम विचार करून शिक्षक, कर्मचारी, विद्यार्थी, पालक यांना न्याय दिला पाहिजे. मात्र, २००१, २००९, २०१२ पासून राज्यातील विनाअनुदानित प्राथमिक, माध्यमिक कनिष्ठ महाविद्यालय शिक्षक विनावेतन काम केल्यावर उर्वरित वेळात रिक्षा चालवणे, शेतमजुरी करणे, दूध व्यवसाय, दुकानात काम करणे, भाजीपाला विकणे अशी अनेक कामे कसेबसे करून घर चालवत होते. मात्र आता लॉकडाऊन तसेच कोरोनामुळे शाळा बंदमध्ये ना वेतन ना इतर काम अशी केविलवाणी परिस्थिती शिक्षक कर्मचाऱ्यांची झाली आहे. शिक्षणाचा विस्तार व्हावा म्हणून प्राथमिक, माध्यमिक व उच्च महाविद्यालये निर्माण करून शिक्षण पोहोचवावे. या हेतूने सन २००१, २००९ साली कनिष्ठ महाविद्यालय, माध्यमिक व प्राथमिक शाळाना परवानगीदिली.मात्र शासनाचे कोणत्याही प्रकारचे अनुदान दिले नाही. ज्यांनी शिक्षण विभागाचा मार्ग निवडला ते मात्र आज अनुदान देईल, उद्या अनुदान देतील याच आशेवरआपले आयुष्य काढत आहेत. संस्थाचालक शक्य होईल त्या पद्धतीने वेतन करतात मात्र कोरोनामुळे त्यांनाही वेतन देणे शक्य होत नाही. गेली २० वर्ष शिक्षक व कर्मचाºयांच्या आयुष्यात मात्र अंधारचनिधी मिळण्याची शिक्षकांना प्रतिक्षाचविविध संघटनेच्या संघर्षाने २०१४ साली तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी ‘कायम’ हा शब्द वगळला व मूल्यांकनाच्या माध्यमातून अनुदान देण्याची घोषणा केली. मात्र त्यानंतर कुठेलही अनुदान मिळाले नाही. तसा १३ सप्टेंबर २०१९च्या शासन निर्णयानुसार २० टक्के अनुदान दिले मात्र ते अनुदान निधीमुळे प्रतीक्षेतच राहिले. सर्वच स्तरातून घरी राहून सुरक्षित राहा, असे संदेश देताना दिसतात मात्र उदरनिर्वाहासाठी कुठलीही बाजू नसल्याने विनाअनुदानित शिक्षक व कर्मचाºयांना जगावे कसे असाच प्रश्न पडतो !

टॅग्स :Nashikनाशिक