नाशिक : आपल्यातील नम्र भाव धारण करून जर आपण कार्यात आलो तर ते उत्तम अधिशासनासाठीचे उत्तम उदाहरण असेल. क्रोधावर नियत्रंण मिळवायचे असेल तर आपल्यामध्ये नम्रता महत्वाची आहे. अध्यात्म आपणास जसे शिकविते तशी वर्तणूक आपण इतरांना देणे आवश्यक आहे. असे प्रतिपादन दिल्ली येथील ब्रम्हाकुमारी संस्थेच्या वरिष्ठ राजयोग शिक्षिका ब्रम्हकुमारी आशादिदी यांनी केले. प्रजापिता ब्रम्हाकुमारी विद्यालय, नाशिक यांच्या वतीने ‘उत्तम अधिशासनासाठी स्वशासन’ याविषयावर शनिवारी (दि.२५) कुर्तकोटी सभागृह येथे एकदिवशीय संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी आशादिदी अशा म्हणाल्या की, पूर्वग्रह दूषित भावनेने आपण कोणाला भेटलो तर आपण सुशासन करूच शकत नाही, पूर्वग्रह हा सुशासनाचा शत्रूच आहे. विसरा व माफ करा हे तत्व अवलंबून आपण सुशासन साकारू शकतो. कोणी अधिकारी जर गर्व सहित आपल्या आसनावर बसला तर तो व्यक्ती कधीच सुशासन करू शकत नाही. नम्रचित्त व आपुलकीची भावना चांगल्या प्रशासनाचा आदर्श निर्माण करू शकते, असे सांगितले.
क्रोधावर नियंत्रण मिळविण्यासाठी नम्रता आवश्यक : आशादिदी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 25, 2020 15:11 IST
आपल्यातील नम्र भाव धारण करून जर आपण कार्यात आलो तर ते उत्तम अधिशासनासाठीचे उत्तम उदाहरण असेल. क्रोधावर नियत्रंण मिळवायचे असेल तर आपल्यामध्ये नम्रता महत्वाची आहे
क्रोधावर नियंत्रण मिळविण्यासाठी नम्रता आवश्यक : आशादिदी
ठळक मुद्देपूर्वग्रह दूषित भावनेने आपण कोणाला भेटलो तर आपण सुशासन करूच शकत नाहीविसरा व माफ करा हे तत्व अवलंबून आपण सुशासन साकारू शकतो