शहरं
Join us  
Trending Stories
1
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
2
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
3
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
4
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
5
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
6
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
7
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
8
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
9
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
10
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
11
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
12
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
13
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
14
"स्वतःची काळजी घ्या बाबा"; हातावर 'ते' शब्द लिहून लेकीने आयुष्य संपवलं! नेमकं काय घडलं?
15
युद्धादरम्यान इराणला जबर धक्का, अमेरिका-इस्राइलच्या हल्ल्यात गुप्तचर संघटनेचे प्रमुख माजिद खादेमी यांचा मृत्यू
16
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
17
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
18
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
19
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
20
Lunch Box Recipe: प्रोटीन रिच सोया दाल पराठा; चवीला भारी आणि आरोग्यासाठी गुणकारी!
Daily Top 2Weekly Top 5

नागरिकत्व कायद्याच्या समर्थनासाठी मानवी साखळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 30, 2019 01:08 IST

नाशिक : केंद्र सरकारने केलेल्या नागरिकत्व कायद्यातील सुधारणेचे समर्थन करण्यासाठी शहरात विविध ठिकाणच्या सोळा मार्गांवर मानवी साखळी करण्यात आली. आम्ही नागरिकत्व कायद्याचे समर्थन करीत असल्याचे फलक यावेळी झळकविण्यात आले.

ठळक मुद्देप्रबोधन मंच : सोळा ठिकाणी फलक घेऊन केले समर्थन ; युवती, नागरिकांच्या हातात घोषणांचे फलक

लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : केंद्र सरकारने केलेल्या नागरिकत्व कायद्यातील सुधारणेचे समर्थन करण्यासाठी शहरात विविध ठिकाणच्या सोळा मार्गांवर मानवी साखळी करण्यात आली. आम्ही नागरिकत्व कायद्याचे समर्थन करीत असल्याचे फलक यावेळी झळकविण्यात आले.केंद्र सरकारने केलेल्या कायद्यातील सुधारणांबाबत समर्थन आणि विरोध अशा दोन्ही प्रकारची आंदोलने नाशिकमध्ये होत आहेत. मात्र प्रबोधन मंच या संस्थेच्या माध्यमातून शहराच्या सहा विभागांत तसेच देवळाली आणि भगूर येथेही मानवी साखळी उपक्रम राबविण्यात आला. वंदे मातरम, भारत माता की जय असे फलक झळकावून शांततामय मार्गाने हा उपक्रम राबविण्यात आला. यात कॉलेजरोड, मेरी रोड, मानूर नाका, पंचवटी कारंजा, सीबीएसवरील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा, सातपूर बसस्थानक, पवननगर, शिवाजी चौक, माउली लॉन्स, रथचक्र सोसायटी, पाथर्डी फाटा, काठेगल्ली, बिटको चौक, जेलरोड, जुने बस स्टॅन्ड देवळाली तसेच भगूर येथे या प्रकारचे समर्थन करण्यात आले.दरम्यान नाशिकरोड येथील बिटको चौकात प्रबोधन मंच, भारतीय जनता पार्टी, युवा मोर्चातर्फे नागरिकत्व दुरुस्ती कायद्याच्या समर्थनार्थ रविवारी सायंकाळी मानवी साखळी करण्यात आली.वंदे मातरम, भारत माता की जयच्या घोषणा देत प्रबोधन मंचच्या वतीने नागरिकत्व संशोधन कायद्याच्या समर्थनार्थ सावरकर चौक ते साईनाथनगर चौफुलीपर्यंत मानवी साखळी करण्यात आली होती. यावेळी देश के हित मे सबके हित मे, काश्मीर ते कन्याकुमारी भारत माता एक हमारी, भारतीय संविधानाचा विजय असो, सह विविध फलकांनी सर्वांचे लक्ष वेधले होते. याप्रसंगी मनपा सभागृहनेता सतीश सोनवणे, नगरसेवक अ‍ॅड. श्याम बडोदे, नगरसेवक अजिंक्य साने, राजश्री शौचे, अ‍ॅड. भानुदास शौचे, सचिन कुलकर्णी, अनिकेत सोनवणे, बापू गोरे, सह आबालवृद्ध सहभागी झाले होते.

टॅग्स :Human Traffickingमानवी तस्करीNashikनाशिक