शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
4
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
5
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
6
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
7
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
8
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
9
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
10
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
11
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
12
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
13
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
14
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
15
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
16
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
17
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
18
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
19
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
20
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

अवयवदान प्रचारासाठी ‘आरोग्य’ची मानवी साखळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 31, 2017 00:30 IST

महाराष्टÑ आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या पुढाकाराने शहरातील विविध महाविद्यालयांचे विद्यार्थी व विविध समाजसेवी संघटना यांच्या सहकार्याने शहरातून अवयवदान प्रचारासाठी मानवी साखळी तयार करण्यात आली. यावेळी सहभागी स्वयंसेवकांनी नागरिकांशी संवाद साधत अवयवदानाची जनजागृती केली.

नाशिक : महाराष्टÑ आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या पुढाकाराने शहरातील विविध महाविद्यालयांचे विद्यार्थी व विविध समाजसेवी संघटना यांच्या सहकार्याने शहरातून अवयवदान प्रचारासाठी मानवी साखळी तयार करण्यात आली. यावेळी सहभागी स्वयंसेवकांनी नागरिकांशी संवाद साधत अवयवदानाची जनजागृती केली. इदगाह मैदान येथून सकाळी मानवी साखळीस प्रारंभ झाला. महापौर रंजना भानसी, विद्यापीठाचे प्रति कुलगुरू डॉ. मोहन खामगावकर, कुलसचिव डॉ. कालिदास चव्हाण यांच्या हस्ते झेंडा दाखवून व आकाशात फुगे सोडून जनजागृती करण्यात आली. याप्रसंगी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुरेश जगदाळे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. वाघचौरे, डॉ. प्रशांत पाटील, स्वप्निल ननावरे, भूषण चिंचोले, सुनील देशपांडे, नितीन रौंदळ, मनीषा रौंदळ, शैलजा जैन, रवींद्र दुसाने, साधना दुसाने आदी मान्यवर रॅलीत सहभागी झाले होते. प्रति-कुलगुरू खामगावकर यांनी अवयवदानाचे महत्त्व विशद केले. कुलसचिव कालिदास चव्हाण यांनी उपक्रमाची माहिती दिली. याप्रसंगी डॉ. सुरेश जगदाळे, डॉ. प्रशांत पाटील, सुनील देशपांडे, डॉ. भाऊसाहेब मोरे यांनीदेखील महत्त्व सांगितले. मानवी साखळीत विद्यार्थ्यांनी ‘अवयवदान महादान’ मरावे परि अवयवरूपी उरावे, अवयवदान सर्वश्रेष्ठ दान, मृत्यूला रोखण्याची ताकद तुमच्या श्रेष्ठ दानात आहे. अशा घोषणांनी परिसर दुमदुमून गेला होता. इदगाह मैदानापासून सुरू झालेली मानवी साखळी ठक्कर बाजार, सीबीएस, जिल्हा न्यायालय, जिल्हाधिकारी कार्यालय, मेहेर थांबा या मार्गावरून अशोकस्तंभ या ठिकाणांपर्यंत मानवी साखळी तयार करण्यात आली होती. विद्यापीठाचे अधिकारी विद्या ठाकरे, डॉ. स्वप्निल तोरणे, बाळासाहेब पेंढारकर, संदीप राठोड, डॉ. प्रदीप आवळे, डॉ. राकेश पाटील, डॉ. रिस्किन मर्चंट, वैद्य कमलेश महाजन, डॉ. सागर नरोडे, डॉ. स्वानंद शुक्ल, डॉ. प्रेम बरनसबास, शिना जॉन, डॉ. श्रीकृष्ण शिंदे, आदी उपस्थित होते.या कॉलेज, संस्थांचा सहभागया रॅलीत मविप्रचे डॉ. वसंतराव पवार वैद्यकीय महाविद्यालय, केबीएच दंत महाविद्यालय, आयुर्वेद महाविद्यालय, मोतीवाला होमिओपॅथी, सप्तशृंगी आयुर्वेद महाविद्यालय, के. के. वाघ महाविद्यालय आॅफ नर्सिंग, एसएमबीटी आयुर्वेद महाविद्यालय नर्सिंग कॉलेज, धन्वंतरी होमिओपॅथी, गोखले नर्सिंग कॉलेज, मविप्र केटीएचएम महाविद्यालय, कर्मवीर शांताराम बापू कोंडाजी वावरे कॉलेज, मातोश्री नर्सिंग, मविप्र कृषी महाविद्यालय, व्ही. एन. नाईक संस्थेचे विद्यार्थी सहभागी झाले होते.