शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
2
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
3
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
4
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
5
महामुंबईत गिरणी कामगारांसाठी २,५२१ घरांची लॉटरी काढावी; एकनाथ शिंदे यांचे म्हाडाला निर्देश
6
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
7
विमानतळावर ३८ कोटींच्या सोने तस्करीचा पर्दाफाश; DRI कडून केनियाच्या २६ नागरिकांना अटक
8
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
9
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
10
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
11
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
12
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
13
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
14
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
15
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
16
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
17
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
18
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
19
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
20
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
Daily Top 2Weekly Top 5

ग्रामपंचायतींसाठी मतदारांचा प्रचंड उत्साह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 16, 2021 01:14 IST

नाशिक : जिल्ह्यातील ग्रामपंचायतींच्या निवडणुकीत मतदारांचा प्रचंड उत्साह दिसून आला खरा; परंतु मतदारांनी केंद्रासमोर लांबच लांब रांगा लावल्याने कोरोनाच्या मार्गदर्शक सूचनांकडे पाठ फिरविल्याचे ठिकठिकाणी दिसून आले.

ठळक मुद्देमतदान केंद्रांवर रांगाच रांगा : कोरोनाचे भय न बाळगता मार्गदर्शक सूचनांकडे फिरवली पाठ ; दुपारनंतर मतदानाचा वाढला वेग

मतदानासाठी सकाळपासूनच मतदारांनी गर्दी केल्याचे बघायला मिळाले. त्यामुळे दुपारी १.३० वाजेपर्यंत अनेक ठिकाणी ५० टक्क्यांहून अधिक मतदान झाले. पुढे मतदानाचा वेग वाढत गेला. दरम्यान, काही ठिकाणी ईव्हीएम मशीनमध्ये बिघाड झाल्याने मतदारांमध्ये काही काळ गोंधळाची स्थिती निर्माण झाली होती, तर काही भागांत किरकोळ बाचाबाचीचेही प्रकार घडले. पोलीस यंत्रणेने अतिसंवेदनशील मतदार केंद्रांकडे विशेष लक्ष पुरविल्याने मतदान प्रक्रिया शांततेत पार पडली. जिल्ह्यातील ६२१ ग्रामपालिकांची निवडणूक जाहीर झाली होती. त्यातील ५५ ग्रामपालिका बिनविरोध झाल्याने ५६६ ग्रामपंचायतींसाठी शुक्रवारी (दि.१५) सकाळी ७.३० ते ५.३० वाजेपर्यंत मतदान घेण्यात आले. त्यासाठी जिल्ह्यात १,९५२ मतदान केंद्रांची व्यवस्था करण्यात आली होती. पहिल्या दोन तासांत बहुतांश मतदान केंद्रांवर १० ते १२ टक्के मतदान झाले. त्यानंतर सकाळी ११.३० वाजेपर्यंत मतदानाचा टक्का वाढत जाऊन तो २५ ते ३० टक्के झाला. दुपारी १.३० वाजेपर्यंत ५० टक्क्यांहून अधिक मतदान नोंदविले गेले, तर अनेक ठिकाणी दुपारी ३.३० वाजेपर्यंत मतदानाचा वेग वाढून तो ७० टक्क्यांहून अधिक झाला होता. काही मोजक्या ग्रामपालिका वगळता बहुतांश ठिकाणी मतदारांचा मतदानासाठी प्रचंड उत्साह दिसून आला. ठिकठिकाणी मतदारांच्या लांबच लांब रांगा लागल्याचे बघायला मिळाले. त्यामुळे कोरोनाविषयक मार्गदर्शक सूचनांच्या अंमलबजावणीचा पुरता फज्जा उडाला. मतदारांनी मोठ्या प्रमाणावर गर्दी केल्याने प्रशासनही हतबल झाल्याचे बघायला मिळाले. ईव्हीएम मशीनमध्ये बिघाड होण्याच्याही घटना घडल्या. नांदगाव तालुक्यातील वडाळी खु., दहेगाव, वंजारवाडी, जळगाव बु. , कऱ्ही याठिकाणी मशीनमध्ये तांत्रिक बिघाड झाला होता, तर सिन्नर तालुक्यातील ठाणगाव येथेही प्रभाग २ मधील मशीनमध्ये बिघाड झाल्याने मतदारांचा खोळंबा झाला होता. बागलाण तालुक्यात लखमापूर, ब्राह्मणगाव, दऱ्हाणे, नामपूर, ताहराबाद, उत्राणे, द्याने, तसेच मालेगाव तालुक्यातील येसगाव येथे किरकोळ बाचाबाचीचे प्रकार घडल्याने काही काळ गोंधळ उडाला होता. अनेक मतदारांची नावे मतदार यादीतून गायब झाल्याने गोंधळाची स्थिती बघायला मिळाली.पत्रिकेतून उमेदवारांची नावे गायबअनेक ठिकाणी ईव्हीएम मशीनमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याचे बघायला मिळाले. नांदगाव तालुक्यातील पानेवाडी येथे तर मशीनवरील मतपत्रिकेतून उमेदवारांची नावे गायब झाल्याचे उघडकीस आले. त्यामुळे प्रशासनाची धावपळ उडून अखेर मतपत्रिकेत नावे टाकल्यानंतर मतदान प्रक्रियेला सुरुवात झाली. येवला तालुक्यातही ठाणगाव येथे उमेदवाराच्या निशाणीचे बटन दाबले असता १५ ते १७ मिनिटांनी मतदान होत असल्याचा आक्षेप उमेदवारांनी घेतल्यानंतर मशीन बदलण्यात आले.स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदा मतदान केंद्रमालेगाव तालुक्यातील दहिवाळ बोधे ग्रुप ग्रामपंचायतीमधील बोधे येथे स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच मतदान केंद्र उभारण्यात आल्याने बोधेकरांनी ७३ वर्षांत पहिल्यांदाच गावात मतदानाचा हक्क बजावला. यापूर्वी बोधेकरांना ग्रामपंचायतीसाठी दहिवाळ येथे, तर लोकसभा-विधानसभा मतदानासाठी सिताणे येथे जावे लागत होते; परंतु यंदा आयोगाने येथे मतदान केंद्राची व्यवस्था केली. शिवाय आदर्श केंद्र म्हणून घोषित करत मतदारांचे गुलाबपुष्प देऊन स्वागतही करण्यात आले.मतदारांच्या रांगेत चेंगरला ह्यकोरोनाह्णकोरोनाचा संसर्ग होऊ नये यासाठी प्रशासनाने मतदान केंद्रांवर सॅनिटायझरची, तसेच तापमान मापकाची व्यवस्था केली होती; परंतु मतदारांनी एकमेकांना खेटून लांबच लांब रांगा लावल्याने या रांगांमध्ये कोरोना चेंगरल्याची भावना ठिकठिकाणी व्यक्त झाली. अनेकांनी मास्क लावला नव्हता, तर गर्दी उसळल्याने फिजिकल डिस्टन्सिंगचा पुरता फज्जा उडाला. ग्रामीण भागात पहिल्यांदा जेथे कोरोनाचा शिरकाव झाला त्या निफाड तालुक्यातील विंचूरला तर मतदान केंद्रांवर सॅनिटायझर व तापमान मापकाची व्यवस्थाच केलेली नसल्याचे आढळून आले.दिव्यांग, ज्येष्ठांची वाहतूक व्यवस्थाआपला मतदानाचा टक्का वाढावा यासाठी उमेदवारांनी कसून मेहनत घेतली. दिव्यांग, ज्येष्ठ मतदारांसाठी खास वाहनांची व्यवस्था करण्यात आली होती. गावातून शहरात नोकरी-रोजगारासाठी गेलेल्या मतदारांसाठीही विशेष वाहनांची व्यवस्था करून त्यांना गावात मतदानासाठी आणण्यासाठी एकच धांदल बघायला मिळाली. दिव्यांग मतदारांनाही उमेदवार समर्थकांनी कुणी खांद्यावर तर कुणी वाहनात घेऊन येत मतदान करून घेतले.

टॅग्स :Nashikनाशिकgram panchayatग्राम पंचायत