खमताणे : कसमादे भागासह जिल्ह्यासह एकाही नगदी शेतमालाला भाव नसल्याने शेतकºयांत प्रचंड असंतोष आहे. त्यामुळे गेल्या आठ दिवसांपासून रोजच कुठे ना कुठे शेतकरी आंदोलनाचा भडका उडत आहे. या आंदोलनकर्त्यांचा रोष सरकारविरोधात असल्याने आगामी निवडणुकांत सत्ताधाºयांना ही डोकेदुखी ठरणार आहे.जिल्ह्यातील बहुतांश भागात यंदा पुरेशा पाऊस न झाल्याने दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. दुष्काळाची मुकाबला करताना कादा, मका, टोमॅटो व इतर भाजीपाला अशा एकाही नगदी शेतमालाला शेतकºयांना परवडेल असा भाव नाही. त्यामुळे दुष्काळात होरपळून शेतकºयांचे अर्थकारण पूर्णत: कोलमडले आहे. याचा रोष विविध प्रकारच्या आंदोलनातून, तसेच सोशल मीडियातुन व्यक्त होत आहे.गेल्या सात-आठ महिन्यांपासून ज्या उउन्हाळा कांद्याच्या भाववाढीकडे शेतकरी डोळे लावून बसले होते. तो उन्हाळा कांदा चाळीतच सडला आहे. उलट भाववाढीऐवजी कांद्याचे कमी होत गेले आहे. त्यामुळे शेतकºयांचा संयम सुटला आहे असुन रोजच कुठे ना कुठे आंदोलने, रास्ता रोको निषेध अशा प्रकारची आंदोलने होत आहे.डाळिंबाची २५ ते ३० रुपये प्रतिकिलो असा अत्यल्प भाव मिळत आहे. टोमॅटोलाही भाव नसल्याने त्याचाही लाल चिखल होत आहे. मक्याची खरेदी हमीभावाने केली जाईल, असे आवाहन जात असले तरी खरेदी केंद्र बंद असल्याने इतर ठिकाणी उदासीनता असल्याने कमी भावाने मका विकण्याची वेळ शेतकºयांवर आली आहे.आत्तापर्यंत ८० ते ८५ टक्के कांदा बाजारात विकला गेला असुन, अजुन कसमादेसह इतर तालुक्यात सहा - सात लाख क्विंटल कांदाचाळीमध्ये पडून आहे. या कांद्याला अत्यल्प १५० ते ३५० असा सरासरी भाव मिळत असल्याने शेतकरीवर्गात तीव्र नाराजी आहे.
एकाही नगदी शेतमालाला भाव नसल्याने शेतकऱ्यांत प्रचंड असंतोष
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 8, 2018 16:47 IST
खमताणे : कसमादे भागासह जिल्ह्यासह एकाही नगदी शेतमालाला भाव नसल्याने शेतकºयांत प्रचंड असंतोष आहे. त्यामुळे गेल्या आठ दिवसांपासून रोजच कुठे ना कुठे शेतकरी आंदोलनाचा भडका उडत आहे. या आंदोलनकर्त्यांचा रोष सरकारविरोधात असल्याने आगामी निवडणुकांत सत्ताधाºयांना ही डोकेदुखी ठरणार आहे.
एकाही नगदी शेतमालाला भाव नसल्याने शेतकऱ्यांत प्रचंड असंतोष
ठळक मुद्देआगामी निवडणुकांत सत्ताधाºयांना ही डोकेदुखी ठरणार