शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
3
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
4
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
5
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
6
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
7
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
8
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
9
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
10
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
11
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
12
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
13
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
14
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
15
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
16
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
17
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
18
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
19
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
20
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
Daily Top 2Weekly Top 5

बारावीची परीक्षा  : कॉपीमध्ये जळगावची आघाडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 26, 2019 01:27 IST

बारावीची परीक्षा सुरू होऊन तीन दिवस उलटले असून, या पहिल्या तीन दिवसांमध्येच नाशिक विभागातील जळगाव जिल्ह्याने आघाडी घेतली आहे. जळगावमध्ये बारावीच्या पहिल्या पेपरपासूनच सर्वाधिक कॉपी प्रकरणे समोर आली असून, त्यानंतर सलग दोन दिवस जळगावचे नाव कॉपी प्रकरणांमुळे चर्चेत राहिले आहे.

नाशिक : बारावीची परीक्षा सुरू होऊन तीन दिवस उलटले असून, या पहिल्या तीन दिवसांमध्येच नाशिक विभागातील जळगाव जिल्ह्याने आघाडी घेतली आहे. जळगावमध्ये बारावीच्या पहिल्या पेपरपासूनच सर्वाधिक कॉपी प्रकरणे समोर आली असून, त्यानंतर सलग दोन दिवस जळगावचे नाव कॉपी प्रकरणांमुळे चर्चेत राहिले आहे.शिक्षण विभागाचे कॉपीमुक्त परीक्षा राबविण्यासाठी अभियान सुरू असून त्यासाठी विभागस्तरावर २८ भरारी पथके कार्यरत असताना जळगावमध्ये तीन दिवसांत तब्बल ३१ कॉपी प्रकरणे समोर आल्याने सध्या नाशिक विभागात जळगाव जिल्ह्यातील शिक्षण व्यवस्था चर्चेचा विषय बनली आहे.बारावीची परीक्षा २१ फेब्रुवारीपासून सुरू झाली असून, पहिल्या दिवशी इंग्रजीच्या पेपरला १८ कॉपी बहाद्दरांवर कारवाई झाली होती. यात जळगावच्या सर्वाधिक १४ जणांचा समावेश होता, तर धुळ्यातून चार विद्यार्थ्यांना कॉपी करताना पकडण्यात आले होते, तर दुसऱ्या दिवशी हिंदीच्या पेपरला पकडलेले सर्वच्या सर्व पाच कॉपीबहाद्दर जळगावचेच होते. त्यानंतर शनिवारी (दि.१३) झालेल्या मातृभाषेच्या पेपरलाही जळगावमध्येच सर्वाधिक कॉपी १२ प्रकरणे समोर आल्याने आतापर्यंत झालेल्या तीन विषयांच्या पेपरमध्ये एकूण २५ कॉपी प्रकरणांपैकी जळगावमधील सर्वाधिक ३१ प्रकरणांचा तर, धुळ्यातील चार प्रकरणांचा समावेश आहे. विशेष म्हणजे नाशिक व नंदुरबार  जिल्ह्यात पहिल्या दिवसापासून एकही कॉपी प्रकरण समोर आलेले नाही. त्यामुळे या दोन्ही जिल्ह्यांची कॉपीमुक्त परीक्षेकडे यशस्वी वाटचाल सुरू असल्याचे यातून  दिसते.कॉपी रोखण्याचे आव्हानमहाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात येणाऱ्या बारावीच्या परीक्षेस गुरुवारी (दि.२१) इंग्रजी विषयाच्या पेपरने प्रारंभ झाला. विभागातील ६७ हजार ३५८ विद्यार्थ्यांनी हा पेपर दिला, तर दुसºया दिवशी शुक्रवारी (दि.२२) विभागातील ३६ हजार ६१४ विद्यार्थ्यांनी सकाळ सत्रात हिंदी, तर दुपार सत्रात ७४८ विद्यार्थ्यांनी पर्शियन भाषेचा पेपर दिला. परीक्षेच्या तिसºया दिवशी शनिवारी (दि.२३) सकाळच्या सत्रात एकूण १ लाख २३ हजार ७८ विद्यार्थ्यांनी मराठीचा, तर दुपार सत्रात विभागातील सात हजार ५०५ विद्यार्थी उर्दू भाषेचा पेपर दिला. परीक्षेच्या पहिल्या तीन दिवसांतच जळगामध्ये एकूण ३१ कॉपीप्रकरणे समोर आली आहे. त्यामुळे विभागीय शिक्षण मंडळापुढे जळगावमधील गैरप्रकारांवर नियंत्रण मिळविण्याचे आव्हान निर्माण झाले आहे. दरम्यान, सोमवारी (दि.२५) भौतिकशास्त्र, चिटणिसांची कार्यपद्धती व राज्यशास्त्र विषयांचे पेपर होणार आहेत.

टॅग्स :examपरीक्षाNashikनाशिक