शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
5
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
6
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
7
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
8
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
9
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
10
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
11
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
12
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
13
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
14
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
15
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
16
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
17
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
18
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
19
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
20
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
Daily Top 2Weekly Top 5

सीटी स्कॅनमुळे कोरोनाची तीव्रता शोधणे शक्य : डॉ. मंगेश थेटे

By संजय पाठक | Updated: May 6, 2021 15:26 IST

नाशिक- कोरोना संसर्ग झाल्यानंतर संबंधीत रूग्णांना किती तीव्र लक्षणे आहेत हे तपासण्यासाठी सीटी स्कॅन उपयुक्त ठरत आहेत. सीटी स्कॅन केल्यामुळे रेडीएशनचा धोका असतो ही आता कालबाह्य बाब झाली आहे. नवीन सीटी स्कॅन मशिन्स अत्यंत सुरक्षीत आहेत, असे स्पष्टीकरण इंडीयन मेडीकल असोसिएशनचे माजी अध्यक्ष आणि विभागीय संदर्भ सेवा रूग्णालयाचे सीटी स्कॅन विभागाचे प्रमुख डॉ. मंगेश थेटे यांनी केले.

ठळक मुद्देरेडीऐशनबाबत गैरसमजसीटी स्कॅन सुरक्षीतच

नाशिक- कोरोना संसर्ग झाल्यानंतर संबंधीत रूग्णांना किती तीव्र लक्षणे आहेत हे तपासण्यासाठी सीटी स्कॅन उपयुक्त ठरत आहेत. सीटी स्कॅन केल्यामुळे रेडीएशनचा धोका असतो ही आता कालबाह्य बाब झाली आहे. नवीन सीटी स्कॅन मशिन्स अत्यंत सुरक्षीत आहेत, असे स्पष्टीकरण इंडीयन मेडीकल असोसिएशनचे माजी अध्यक्ष आणि विभागीय संदर्भ सेवा रूग्णालयाचे सीटी स्कॅन विभागाचे प्रमुख डॉ. मंगेश थेटे यांनी केले.

सध्या कोरोनाा बाधीत रूग्णांना रूग्णालयात दाखल करायचे असल्याचे रूग्णाचा एचआरसीटी स्कोर किती ते तपासूनच रूग्णांना दाखल केले जाते. मात्र, सीटी स्कॅनच्या रेडीएशनमुळे कर्करोगाचा धोका असतो काही तज्ज्ञांचे मत आहे. त्याबाबत मते मतांतरे आहेत.  परंतू डॉ. थेटे यांनी मात्र अशाप्रकारे दुष्परीणाम होत नसल्याचे सांगितले.

प्रश्न- सध्या सीटी स्कॅन विषयी खूपच संभ्रमाचे वातावरण आहे. सीटी स्कॅन करावा का?डॉ. थेटे- सीटी स्कॅन हे आवश्यकच असते. विशेषत: सध्या कोरोना संसर्गाचा काळ आहे. ए्खाद्याला संसर्ग झालाच, तर त्याची तीव्रता किती हे त्यातून कळत असते. एचआरसीटी स्कॅनींगमध्ये कळणाऱ्या स्कॅनमुळे त्या रूग्णाबाबत अचूक निदान तर होतेच शिवाय त्याला रूग्णालयात दाखल करायचे की घरीच उपचार करता येणे शक्य आहे, ही उपचाराची दिशा देखील ठरवता येते. त्यामुळे सध्या तर सीटी स्कॅन अधिक उपयुक्त आहे.

प्रश्न- सीटी स्कॅन मशिनमुळे आरोग्यावर दुष्परीणाम होतात हे खरे आहे का?डॉ. थेटे- पूर्वीच्या काळातील सीटी स्कॅन मशिन्स् आणि आत्ताची मशिन्स यात खूप फरक आहे. अगदी सुरूवातीच्या काळातील मशिन्स मुळे होणारे रेडीएशन आता होत नाही. किंबहूना ते खूपच नगण्य असते. आता लोडोस मशिन्स असल्याने त्यातून रेडीएशन घातक प्रमाणात होत नाही. सर्वात महत्वाचे म्हणजे सीटी स्कॅन मशिन्स एफडीने मान्यता दिलेले आहेत. जर ती आरोग्यासाठी घातक असती तर शासनाच्या अन्न आणि औषध प्रशासनाने त्याल मंजुरीच दिली नसती. त्यामुळे आरोग्याला खूप घातक ठरेल अशी अवस्था नाही.

प्रश्न- पण कोरोना संसर्ग झाला म्हणजे सीटी स्कॅन केलेच पाहिजे असे आहे काय?डॉ. थेटे- सध्या नाशिक मध्ये शासकीय रूग्णालय, नाशिक महापालिकेचे रूग्णालय आणि सुमारे वीस खासगी स्कॅनींग सेंटर्स याठिकाणी स्कॅनींग केले जाते. जर सीटी स्कॅन धोकादायक असते तर शासकीय आणि नमि शासकीय रूग्णालयात देखील सीटी स्कॅन होऊ शकले नसते. अर्थात कोरोना बाधीताने वैद्यकीय सल्ल्याने स्कॅनींग करणे योग्य ठरेल.

 

टॅग्स :Nashikनाशिकcorona virusकोरोना वायरस बातम्याMedicalवैद्यकीय