शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईमुळे बांगलादेश खवळला, भारतीयांसाठी व्हिसा सर्व्हिस केली बंद 
2
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
3
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
4
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
5
सौदी अरेबियातील वाळवंटात पसरली बर्फाची चादर, अनेक वर्षांनंतर दिसलं असं चित्र, आपली पृथ्वी देतेय असे संकेत
6
बाथरूममध्ये तरुणाने प्रस्थापित केले संबंध, अतिरक्तस्त्रावाने गर्लफ्रेंडचा मृत्यू, वडिलांचे गंभीर आरोप
7
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
8
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
9
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
10
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
11
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
12
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
13
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
14
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
15
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
16
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
17
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
18
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
19
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
20
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
Daily Top 2Weekly Top 5

ठेकेदारांची भरती केल्यावर कार्यकर्त्यांना शक्ती कशी लाभेल?

By किरण अग्रवाल | Updated: August 4, 2019 02:08 IST

प्रामाणिक व निष्ठावान कार्यकर्ते हेच कोणत्याही पक्षाची शक्ती असतात. पण, संधी लाटून घेणाऱ्यांची मोठ्या प्रमाणात भरती होऊ लागल्याने भाजपतील मूळ कार्यकर्त्यांची घुसमट होऊ लागली आहे. ठेकेदारांनी पक्ष चालत नाही, हे खरे असेल तर अशा ठेकेदारांसाठी पायघड्या अंथरताच कशाला, असा प्रश्न त्यामुळेच उपस्थित होतो.

ठळक मुद्देभाजपच्या शक्ती केंद्रप्रमुखांचे मनोबल उंचावण्याचा प्रयत्न ठीकवास्तविकतेकडे दुर्लक्षच !पक्षनिष्ठही नाराज आणि परपक्षातून घेतलेलेही काहीजण उपेक्षित

सारांशसत्तेची अगर यशाची गणिते जुळविण्यासाठी कधी कधी तडजोडी कराव्या लागतात व त्यास कोणताही राजकीय पक्ष अपवाद ठरू शकलेला नाही हे खरेच; पण भरल्या पोटीही अजीर्णतेला निमंत्रण देण्यासारखी वाटचाल घडून येते तेव्हा निष्ठावानांमधील अस्वस्थता वाढून जाणे स्वाभाविक ठरून जाते. भाजपतही तेच वा तसेच होताना दिसत आहे, म्हणूनच पक्ष ठेकेदार नव्हे तर कार्यकर्तेच चालवतात, अशी पोपटपंची करून ही पक्षांतर्गत धुसफूस शमविण्याचा प्रयत्न करण्याची वेळ या पक्षाच्या पदाधिकाºयावर आलेली पहावयास मिळाले.भाजपच्या निवडणूक तयारीचा भाग म्हणून शक्ती केंद्रप्रमुखांचा मेळावा नुकताच नाशकात झाला. पक्षाची भूमिका, ध्येय-धोरणे जनतेपर्यंत पोहोचवून पक्षाला शक्ती देण्याचे कार्य या कार्यकर्त्यांना करायचे आहे, पण त्यांनी पक्षाला शक्ती मिळवून दिल्यावर सत्तेचे लाभ पदरात पाडून घ्यायला मात्र अन्य पक्षात शक्ती न उरलेले लोक भाजपत येऊ लागल्याने निष्ठावानांतच चलबिचल होताना दिसत आहे. म्हणूनच या मेळाव्यात मार्गदर्शनासाठी आलेल्या भाजपच्या राष्ट्रीय सहसंघटनमंत्री व्ही. सतीश यांना ‘पक्ष ठेकेदारांच्या भरोशावर नव्हे तर कार्यकर्त्यांच्या बळावर चालतो’, असे म्हणून उपस्थितांना गोंजारावे लागले. अर्थात, सतीश जे म्हणाले त्यात गैर काहीच नाही. कोणताही पक्ष हा निष्ठावानांच्याच बळावर चालतो याबद्दल दुमत असू शकत नाही. प्रश्न असा आहे की, जर ते खरे आहे तर मग संधी व लाभासाठी परपक्षातून येणाºया ठेकेदारांना घेताच कशासाठी?

सतरंज्या पक्षातील निष्ठावान कार्यकर्त्यांकडून उचलून घ्यायच्या, संघटनात्मक बांधणीसाठी त्यांच्या शक्तीचा वापर करून घ्यायचा आणि नंतर लाभाचे भरलेले ताट मात्र अन्य पक्षांतून आलेल्यांच्या पुढे करायचे, या अलीकडे भाजपत प्रचलित होऊ पाहणाºया पद्धतीने निष्ठावान नाराज आहेत. यासाठी आणखी कुणाकडे पाहण्याची गरज नाही. नाशिक महापालिकेतलेच उदाहरण घ्या. तेथे सत्तेपर्यंत पोहचण्यासाठी भाजपने घाऊकपणे भरतीप्रक्रिया राबविली. कमळाचे देठ हाती धरून असे उधार-उसनवारीचे खूप लोक निवडूनही आले. त्यानंतर पालिकेतील पदे देताना या बाहेरून आलेल्यांनाच संधी दिली गेली. पक्षाच्या नादारीच्या काळात एकनिष्ठेने खस्ता खाल्लेल्यांना मात्र शुल्लक पदांसाठी पालकमंत्री व प्रदेशाध्यक्षांकडे चपला झिजवायची वेळ आली. इतकेच काय ‘मनसे’ सोडून भाजपच्या तिकिटावर निवडून आलेल्या नगरसेवकांनाही त्यांच्या वॉर्डातील कामे करण्यासाठी बळ दिले गेले नाही. मोजक्यांनीच आपली कामे रेटून नेलीत. म्हणजे, पक्षनिष्ठही नाराज आणि परपक्षातून घेतलेलेही काहीजण उपेक्षित. मग पुन्हा भरतीचा सोस कशासाठी?नव्या लोकांना त्यांचे कार्य, कर्तृत्व आणि स्थान पाहूनच प्रवेश दिला जातो असे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले आहे; पण अशा कर्तृत्ववानांनी त्यांच्या कार्यकर्त्यांना अगर समर्थकांना पक्षकार्याला जुंपलेले दिसत नाही. त्यांना तिकीट दिले तरच त्यांचे कार्यकर्ते बाहेर पडतात. म्हणजे व्यक्तीसाठी त्यांचा प्रचार असतो, पक्षासाठी नसतो. तेव्हा व्ही. सतीश यांचे विधान कार्यकर्त्यांना सुखावणारे असले तरी, वास्तवातील त्यांच्या अस्वस्थतेच्या कारणांकडे दुर्लक्ष करता येऊ नये.महत्त्वाचे म्हणजे, अच्छे दिनाच्या अपेक्षेने अनेकांचा ओढा भाजपकडे असला तरी तिथे यापूर्वी प्रवेश मिळवून बाहेरचे ठरवले गेलेल्यांची अवस्था काय हे विचारातच घेतले जात नाही. ज्यांनी प्रवेशासोबतच कसली का होईना संधी किंवा तिकीट मिळवून विजयही मिळवला त्यांचे भले झाले हा अपवाद; परंतु जे प्रतीक्षेतच आहेत त्यांचे काय? आज नंबर लागेल, उद्या लागेल या आशेवर असलेले असे अनेकजण केवळ सभा-संमेलनांप्रसंगी व्यासपीठावर गौर मांडल्यासारखे बसवलेले दिसून येतात, त्यांना कुणी जमेतही धरत नाही, तरी केवळ सत्ताधारी पक्षात असल्याचे समाधान बाळगत ते थांबून आहेत. अशांकडून पक्षकार्याची अपेक्षाच करता येऊ नये. अन्यथा, भाजपत येणाऱ्यांची गर्दी होत असताना दोन वर्षांपूर्वी या पक्षात आलेल्या माजी आमदार कल्याणराव पाटील यांच्यासारख्यांची शिवसेनेत घरवापसी झालीच नसती. कल्याणरावांनी दोनदा आमदारकी भूषविली, आता ते राजकारणात फारसे सक्रियही नाहीत. बरे, उमेदवारीसाठी ते शिवसेनेत आले म्हणायचे तर तिथे अगोदरच अनेक दावेदार आहेत. तरीदेखील कल्याणरावांनी भाजप सोडला. त्यांच्या या उलट प्रवाहामागील अन्वयार्थ खरे तर भाजपकडे धावणाºयांनी समजून घ्यायला हवा, पण चालत्या गाडीत बसायला इच्छुक असणारे अन्य धोके लक्षात घेत नाहीत.

टॅग्स :PoliticsराजकारणBJPभाजपाElectionनिवडणूक