शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
4
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
5
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
6
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
7
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
8
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
9
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
10
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
11
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
12
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
13
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
14
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
15
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
16
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
17
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
18
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
19
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
20
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

प्रशिक्षण केंद्रच कसे अडकले?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 17, 2018 00:45 IST

महापालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पातील अवघ्या दीड कोटी रुपयांच्या प्रशिक्षण केंद्राचा वापर होत नसल्याने राज्य शासनाच्या लोकलेखा समितीने त्याबाबत आयुक्तांना पाचारण केले खरे, परंतु केवळ हे केंद्रच नव्हे तर या प्रकल्पातील अनेक यंत्रसामग्री वापराविना पडून आहे,

नाशिक : महापालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पातील अवघ्या दीड कोटी रुपयांच्या प्रशिक्षण केंद्राचा वापर होत नसल्याने राज्य शासनाच्या लोकलेखा समितीने त्याबाबत आयुक्तांना पाचारण केले खरे, परंतु केवळ हे केंद्रच नव्हे तर या प्रकल्पातील अनेक यंत्रसामग्री वापराविना पडून आहे, शिवाय नेहरू अभियानातील कोट्यवधी रुपयांच्या योजना संशयाच्या फेऱ्यात असताना केवळ एकाच केंद्राबाबत आलेल्या आक्षेपामुळे पालिकावर्तुळातच आश्चर्य व्यक्त केले जात आहे.  महापालिकेच्या कामकाजाचे प्रशासन आॅडिट करतेच, परंतु त्यापलीकडे जाऊन राज्य शासनाचा लेखा विभागदेखील आॅडिट करते, अनेक बाबी विधिमंडळाच्या लोकलेखा समितीसमोर आल्यानंतर त्याबाबतच्या आक्षेपांबाबत समिती निराकरण करीत असते. या समितीने आयुक्त तुकाराम मुंढे यांना पाचारण केले होते. पाथर्डी शिवारात महापालिकेचा घन कचरा व्यवस्थापन प्रकल्प असून, याठिकाणी दीड कोटी रुपये खर्च करून प्रशिक्षण केंद्र बांधण्यात आले आहे. याठिकाणी कोणत्याही प्रकारचे प्रशिक्षण आजवर दिले गेलेले नाही. त्यामुळे वापराविना पडून असलेल्या या केंद्राबाबत आक्षेप घेण्यात आला होता. त्यावर कौशल्य विकास योजनेंतर्गत प्रशिक्षण योजना सुरू करण्याची हमी आयुक्तांनी दिली. परंतु मुळातच नेहरू अभियानांतर्गत हा संपूर्ण खत प्रकल्पच वादग्रस्त ठरला आहे.  नेहरू अभियानांतर्गत महापालिकेने ६० कोटी रुपयांचा घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प राबविण्यात आला होता. घंटागाड्या खरेदीपासून अनेक प्रकारची यंत्रसामग्री खरेदी करण्यात आली. घंटागाड्या खरेदी करून दीड पावणे दोन वर्षे वापराविना पडूनच होत्या. कचरा संकलित झाल्यानंतर त्यापासून सेंद्रिय खत आणि आरडीएफ म्हणजे कांडी कोळसा तयार करण्याबरोबरच कचºयात येणाºया सीमेंट, वाळूपासून पेव्हर ब्लॉक तयार करण्याचादेखील प्रकल्प होता. परंतु पेव्हर ब्लॉक आजवर तयारच झाले नाहीत. सदरची यंत्रसामग्री पडून असल्याबद्दल अनेकदा चर्चा झाल्या आहेत, परंतु त्याची दखल गांभिर्याने घेतली गेली नाही.या आहेत वादग्रस्त योजनाघनकचरा व्यवस्थापनाप्रमाणेच केंद्र सरकारच्या नेहरू नागरी अभियानांतर्गत पावसाळी गटार योजना, शहरी गरिबांसाठी घरे अंतर्गत घरकुल योजना, नदीकाठ सुशोभिकरण यादेखील गैरव्यवहारामुळे वादात सापडल्या होत्या. यातील काही योजनांची चौकशी झाली होती. आजही त्यांचा उपयोग हा वादाचा विषय असताना ३००-३५० कोटी रुपयांच्या योजनांचा विचार नाही आणि अवघ्या दीड कोटी रुपयांसाठी आयुक्तांवर हजेरीची नामुष्की आल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

टॅग्स :Nashik municipal corporationनाशिक महानगर पालिका