शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
4
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
5
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
6
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
7
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
8
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
9
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
10
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
11
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
12
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
13
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
14
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
15
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
16
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
17
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
18
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
19
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
20
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
Daily Top 2Weekly Top 5

कांदा भाववाढीमुळे बजेट कसे कोलमडते !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 25, 2019 20:14 IST

देवळा : कांद्याच्या वाढलेल्या बाजारभावामुळे शहरी नागरीकांचे नेमके आर्थिक बजेट कसे कोलमडते? असा प्रश्न कांदा उत्पादक शेतकऱ्यांना पडला आहे.

ठळक मुद्देदेवळा : कांदा उत्पादक शेतकऱ्यांची संतप्त प्रतिक्रि या

देवळा : कांद्याच्या वाढलेल्या बाजारभावामुळे शहरी नागरीकांचे नेमके आर्थिक बजेट कसे कोलमडते? असा प्रश्न कांदा उत्पादक शेतकऱ्यांना पडला आहे.गतवर्षी दुष्काळामुळे सर्वत्र तीव्र पाणीटंचाई होती. पावसाला उशीर झाल्यामुळे खरीप पीकांच्या लागवडीला उशीर झाला. यामुळे रब्बी हंगामातील उन्हाळी कांदा लागवडीला देखील उशीर होऊन कांदा पीकाला अंतिम टप्प्यात पाणी देतांना पाणीटंचाई निर्माण होउन पाण्याअभावी हातातोंडाशी आलेला कांदा अनेक शेतकºयांना सोडून द्यावा लागला व शेतकºयांना मोठे आर्थिक नुकसान सोसावे लागले होते.गतवर्षी कांदा लागवडीसाठी व काढण्यासाठी मजूर मिळत नसल्याने परवडत नसतांना देखील नाईलाजाने इतर तालुक्यातून मजूर आणावे लागल्यामुळे उत्पादन खर्च मोठ्या प्रमाणात वाढला. हया मजुरांना त्यांच्या मजुरीचे पैसे देण्यासाठी कांद्याचे दर कोसळलेले असतांना तोटा खाऊन अनेक शेतकºयांना कांदे विकावे लागले होते.मजूर टंचाईमुळे शेतातून कांदा वेळेवर काढला गेला नाही. त्यातच वाढलेल्या उष्णतामानाचा परीणाम होउन चाळीत साठवलेला कांदा बºयाच प्रमाणात खराब झाला आहे. चाळीत साठवलेला कांदा सडल्यामुळे व वजनात येणारी घट यामुळे शेतकºयांचे मोठे नुकसान होते.गत दोन वर्षांपासून कांदा पीकात नुकसान सहन करणाºया शेतकºयांना चालू वर्षी दोन पैसे पदरात पडून थोडीफार मागील नुकसानाची भरपाई होत आहे.हि बाब शहरातील नागरीकांनी समजून घ्यावी. कांद्याचे भाव कोसळतात त्या वेळी हया शेतकºयांवर काय अरीष्ट येते याचा कोणी विचार करत नाही, अशी भावना बंडू अहेर या कांदा उत्पादक शेतकºयाने व्यक्त केली आहे.केवळ शहरी भागातील ग्राहकांच्या मानसिकतेतून कांदा हा जीवनावश्यक वस्तूंच्या यादीत टाकून सरकार कांदा दरावर नियंत्रण ठेवते. कांदा दर वाढू नये म्हणून निर्यात धोरणात धरसोड वत्तीचे परीणाम शेतकºयांना सातत्याने भोगावे लागत आहेत.अशा स्थितीत कांदा उत्पादक शेतकºयांचे भविष्य निसर्ग व सरकारी यंत्रणा यांच्या लहरीपणावर अवलंबून असल्याची भावना शेतकरी व्यक्त करीत आहेत.