शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

मराठवाडा आत्ताच कसा भकास दिसू लागला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 1, 2020 00:08 IST

नाशिक : राज्यात भाजप सरकार असताना मराठवाड्यातील प्रश्न दिसले नाही, ते प्रश्न आताच कसे उपस्थित झाले, असा सवाल करीत महसूल राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी पंकजा मुंडे यांच्यावर टीका केली. स्वर्गीय गोपीनाथ मुंडे आणि त्यांची कन्या पंकजा मुंडे यांच्या काम करण्याच्या कार्यपद्धतीत फरक असल्याचेदेखील ते यावेळी म्हणाले. राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांचाही त्यांनी समाचार घेतला.

ठळक मुद्देअब्दुल सत्तार : पंकजा मुंडे यांच्या विधानाचा घेतला समाचार

नाशिक : राज्यात भाजप सरकार असताना मराठवाड्यातील प्रश्न दिसले नाही, ते प्रश्न आताच कसे उपस्थित झाले, असा सवाल करीत महसूल राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी पंकजा मुंडे यांच्यावर टीका केली. स्वर्गीय गोपीनाथ मुंडे आणि त्यांची कन्या पंकजा मुंडे यांच्या काम करण्याच्या कार्यपद्धतीत फरक असल्याचेदेखील ते यावेळी म्हणाले. राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांचाही त्यांनी समाचार घेतला.मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत नाशिकमध्ये गुरुवारी (दि.३०) सुरू असलेल्या विभागीय आढावा बैठकीसाठी आलेल्या सत्तार यांनी पत्रकारांशी संवाद साधला यावेळी ते बोलत होते. पंकजा मुंडे यांनी नुकत्याच केलेल्या मराठवाड्याच्या उपोषणाविषयी बोलताना सत्तार यांनी पंकजा मुंडे यांच्या भूमिकेविषयी शंका उपस्थित केली. गेल्या पाच वर्षांच्या कार्यकाळात सत्तेत असताना त्या काम करू शकल्या नाही, त्यावेळेस देवेंद्र फडणवीस हे राज्याचे मुख्यमंत्री होते आणि तेदेखील या आंदोलनामध्ये सहभागी झाले आहेत. सत्ता गेल्यानंतर एकच महिन्यात त्यांना मराठवाडा हा भकास का दिसू लागला असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.यापूर्वी मराठवाडा सुजलाम्-सुफलाम् होता का असा प्रश्न उपस्थित करून मुंडे यांचे आंदोलन ही केवळ स्टंटबाजी असल्याचा आरोप सत्तार यांनी केला. गोपीनाथ मुंडे यांची काम करण्याची पद्धत वेगळी होती मात्र पंकजा मुंडे यांच्यामध्ये ते गुण दिसत नाहीत, असा आरोपही त्यांनी केला. अबू आझमी यांच्या मुलाने केलेल्या वक्तव्याबाबत बोलताना सत्तार म्हणाले, अबू आझमी यांचा मुलगा जर आमच्या सोबत येऊन मशीद बांधण्याची गोष्ट करत असेल तर निश्चितपणे त्यांनी आमच्या सोबत यावे, आम्ही त्यांचे स्वागत करतो.जितेंद्र आव्हाड यांनी आणीबाणीसंदर्भात स्व. पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या संदर्भात केलेल्या वक्तव्याविषयी सतार यांनी कोणत्याही प्रमुख राजकीय पक्षाच्या नेत्याविषयी बोलताना तारतम्य ठेवले पाहिजे, असे सांगून सत्तार यांनी त्यांचा समाचार घेतला. आव्हाड यांना काय सल्ला देणार या पत्रकारांच्या प्रश्नावर बोलताना सत्तार यांनी आव्हाड यांनी शिर्डीला जावे तसेच श्रद्धेबरोबरच सबुरीचा सल्ला दिला.

टॅग्स :Abdul Sattarअब्दुल सत्तारNashikनाशिक