शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
2
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
3
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
4
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
5
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
6
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
7
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
8
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
9
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
10
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
11
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
12
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
13
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
14
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
15
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
16
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
17
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
18
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
19
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
20
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

रस्ता काँक्रि टीकरण कामाचा कालावधी किती?

By admin | Updated: November 5, 2014 00:28 IST

रविवार पेठतील व्यापाऱ्यांचा सवाल : काँक्रिटीकरणाबरोबरच अतिक्रमणेही काढणार का?; एक कोटी दहा लाखांचे काम

नाशिक : सुमारे एक कोटी दहा लाख रुपये खर्च करून महापालिका अशोकस्तंभ ते रविवार कारंजा या रस्त्याचे सीमेंट काँक्रिटीकरण करते आहे़ या कामास रविवारी मध्यरात्रीपासून सुरुवात झाली असून, हे काम नक्की किती महिन्यांत पूर्ण होईल याबाबत व्यापारी साशंक आहेत़ या रस्त्यावरील अतिक्रमणे काढण्यात येणार नसतील तर लेव्हलिंग करून डांबरीकरण करण्यास काय हरकत होती, असा सवालही काही व्यावसायिकांनी उपस्थित केला आहे़‘सरकारी काम अन् बारा महिने थांब’ अशी म्हण जरी प्रचलित असली, तरी महापालिकेचे काम अन् बारा वर्षे थांब यानुसार रविवार पेठवासीयांनी सुमारे एक तपाची प्रतीक्षा केल्यानंतर हा रस्ता सीमेंट काँक्रीटचा होतोय; मात्र केवळ काँक्रिटीकरण न करता यावरील अतिक्रमणे काढून याची रुंदी वाढवावी, अशी मागणी काही व्यावसायिकांकडून केली जाते आहे़मनपाने काही महिन्यांपूर्वी रामवाडी पूल ते मखमलाबाद नाका या रस्त्याचे तसेच रविवार पेठेतील अंतर्गत गल्ल्यांमधील रस्त्यांचे काँक्रिटीकरण केले; मात्र या कामास निर्धारित कालावधीपेक्षा कितीतरी अधिक कालावधी लागला़ त्यामुळे काँक्रिटीकरणाऐवजी रस्त्याचे लेव्हलिंग करून डांबरीकरण केले असते तरी चालले असते, अशी भूमिकाही काही व्यापाऱ्यांनी मांडली आहे़या रस्ता काँक्रिटीकरणाच्या कामास महापालिकेने नेहमीसारखी दिरंगाई केल्यास तसेच सहा महिने दुकाने बंद राहिल्यास रविवार पेठेतील व्यावसायिकांचे व्यवसायच उद्ध्वस्त होतील, अशी भीती व्यावसायिकांकडून व्यक्त केली जात आहे़ तसेच या ठिकाणी येणाऱ्या ग्राहकांना जर दुसऱ्या व्यावसायिकांकडे जाण्याची सवय लागल्यास ते पुन्हा या ठिकाणी येतील का, अशी चिंताही सतावतेय़मनपाने रस्ता काँक्रिटी-करणाच्या कामाची गती वाढवून (दिवस-रात्र) शक्य होईल तितक्या कमी कालावधीत करून देण्याची मागणी येथील व्यावसायिक करीत असून, याबाबतचे निवेदनही ते मनपा आयुक्त व महापौर यांना देणार आहेत़ तसेच रविवार पेठेत येणाऱ्या ग्राहकांनी पर्यायी रस्त्यांचा वापर करण्याची विनंतीदेखील निवेदनाद्वारे करण्यात आली आहे़ (प्रतिनिधी)