सातपूर औद्योगिक वसाहतीतील एका बंद पडलेल्या मोठ्या कंपनीकडे गेल्या १७ वर्षांपासून लाखो रुपयांची घरपट्टी थकलेली होती. चंद्रकांत घाटोळ या कर्मचाऱ्याने बंद पडलेल्या कंपनी मालकाचा ठावठिकाणा शोधला. मुंबईस्थित या मालकाशी संपर्क साधून, त्यांना अभय योजनेचा लाभ मिळवून देत त्यांच्याकडून एकरकमी ४८ लाख रुपयांची थकबाकी वसूल करून, एक आदर्श निर्माण केला आहे. म्हणूनच एमआयडीसी कडून ८ कोटी ५५ लाख ६८ हजार रुपयांपैकी ५ कोटी रुपयांची सर्वाधिक म्हणजेच जवळपास ८४ टक्के वसुली झाली आहे. अवघ्या चार महिन्यांपूर्वी पदभार स्वीकारलेल्या अतिरिक्त विभागीय अधिकारी नितीन नेर यांनी ‘सुशासन दिनी’ घाटोळ यांना वैयक्तिक भेट देऊन शाबासकी दिली. एखाद्या कर्मचाऱ्याने ठरविले, तर कोणतेही काम अशक्य नाही हे घाटोळ यांनी दाखवून दिले आहे.
१७ वर्षांपासूनची थकबाकी अशी केली वसूल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 15, 2021 04:13 IST