शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

पाण्यासाठी महिला नगरसेवकाच्या घरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 21, 2020 00:02 IST

सिडको : प्रभाग क्रमांक २५ मधील कामटवाडे, अभियंतानगर व परिसरात नागरिकांना पिण्यापुरतेही पाणी मिळत नसल्याने बुधवारी परिसरातील नागरिकांनी थेट नगरसेवकाच्या घरीच पाणी भरण्यासाठी गर्दी केली. अखेर दखल घेत प्रशासनाने टॅँकरद्वारे पाणीपुरवठा केला.

सिडको : प्रभाग क्रमांक २५ मधील कामटवाडे, अभियंतानगर व परिसरात नागरिकांना पिण्यापुरतेही पाणी मिळत नसल्याने बुधवारी परिसरातील नागरिकांनी थेट नगरसेवकाच्या घरीच पाणी भरण्यासाठी गर्दी केली. अखेर दखल घेत प्रशासनाने टॅँकरद्वारे पाणीपुरवठा केला.गेल्या चार दिवसांपासून कामटवाडा, अभियंतानगर, इंद्रनगरी, पवननगर, रायगड चौक परिसरातील पाणीपुरवठा विस्कळीत झाला असून, काही ठिकाणी पाणी येते तर काही ठिकाणी पूर्णपणे बंद झाले आहे. कोरोना महामारीमुळे लॉकडाउनसारख्या परिस्थितीत आरोग्याच्या दृष्टीने पाणी ही अत्यावश्यक बाब असतानाही महानगरपालिकेच्या गलथान कारभारामुळे नियमित पाणीपुरवठा केला जात नाही.नगरसेवक श्यामकुमार साबळे यांनी दोन दिवसापासून सतत महापालिकेच्या अधिकाऱ्यांना फोन करून पाणीपुरवठा सुरळीत करण्याची सूचना केली. तथापि, अधिकाऱ्यांनी दाद दिली नाही. दरम्यान, बुधवारी सकाळी पाणी मिळत नसल्याच्या कारणावरून प्रभागातील महिलांनी थेट रिकामे हंडे घेऊन नगरसेवक साबळे यांचे निवासस्थान गाठले व पाण्याची मागणी केली. परंतु त्यांच्याकडेही पाणी नसल्यामुळे बोअरिंगचे पाणी या महिलांना द्यावे लागले.महापालिकेच्या या उदासीनतेबाबत साबळे यांनी थेट शहर अभियंता संजय घुगे व मनपा आयुक्त गमे यांना परिस्थितीचे गांभीर्य सांगितल्यानंतर यंत्रणा कामाला लागली. सकाळी नऊ ते बारा वाजेपर्यंत पाण्याच्या टाकीतून टॅँकर भरून त्याद्वारे कामटवाडे, पवननगर, एकदंत चौक, इंद्रनगरी परिसरात टॅँकरने पाणीपुरवठा करावा लागला. दरम्यान, पाणीपुरवठ्याचे सर्वच अधिकारी निष्काळजी असून, त्यामुळे नवीन यंत्रणा आयुक्तांनी उभी करावी, अशी मागणी साबळे यांनी केली आहे.

टॅग्स :Nashikनाशिक