शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये होर्मुझ सामुद्रधुनीचा तिढा, इस्लामाबादमध्ये पहिली बैठक संपली, ४ तास चालली चर्चा
2
"आप आए बहार आयी..." शतकानंतर Sanju Samson ने शेअर केली ‘लकी चार्म’संदर्भातील गोष्ट
3
Ambernath Crime: बॉससोबत प्रेमसंबंध आणि ब्रेकअप, भेटायला गेलेल्या सिमरन पाटीलचा हॉटेलमध्ये मिळाला मृतदेह, नेत्याच्या नावावर रुमची बुकिंग
4
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
5
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
6
संजू सॅमसनचं नाबाद शतक; जेमी ओव्हरटनचा 'चौकार'! DC ला ऑलआउट करत CSK नं फोडला विजयाचा नारळ
7
Nagpur: वय वर्षे ११, बालिका निघाली बिहारकडे; प्रधान आरक्षक स्नेहल यांना दिसली आणि...
8
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
9
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
10
LPG Crisis: सरकारी दावा फोल, नागपुरात सिलेंडरचा ‘दुष्काळ’च! ४० दिवसांच्या प्रतीक्षेत ग्राहकांचे हाल
11
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
12
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
13
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
14
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
15
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
16
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
17
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
18
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
19
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
20
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
Daily Top 2Weekly Top 5

ब्राह्मणगाव येथे घरफोड्यांचे सत्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 21, 2019 18:42 IST

ब्राह्मणगाव येथील हेरंब गणपती मंदिराजवळील नंदिनी शेवाळे तसेच महा ई सेवा केंद्रा जवळील जिभाऊ खरे हे घरमालक बाहेरगावी गेलेले असतांना मध्यरात्री बंद घराचे कुलूप कटरच्या साह्याने तोडून अज्ञात चोरट्यांनी घरफोडी केली.

ठळक मुद्देनागरिकांमध्ये घबराट : लाखाचा ऐवज लंपास

ब्राह्मणगाव : येथील हेरंब गणपती मंदिराजवळील नंदिनी शेवाळे तसेच महा ई सेवा केंद्रा जवळील जिभाऊ खरे हे घरमालक बाहेरगावी गेलेले असतांना मध्यरात्री बंद घराचे कुलूप कटरच्या साह्याने तोडून अज्ञात चोरट्यांनी घरफोडी केली.सविस्तर माहिती अशी की हेरंब गणपती मंदिराजवळील नंदिनी धर्मा शेवाळे हे बाहेरगावी गेलेले होते,बंद घर असल्याने बुधवारीमध्यरात्री चोरट्यांनी कटरच्या साह्याने दरवाजाचे कुलूप तोडून घरात प्रवेश करत चार तोळे सोन्याची पोत, साडे चार ग्रॅम सोन्याचे कानातले टॉप्स,व रोख रक्कम आठरा हजार रु पये असा एकूण एक लाख छत्तीस हजार पाचशे रु पयांचा ऐवज चोरून नेला. सदर घटना गुरु वारी (20) रोजी शेवाळे यांच्या घरासमोरील दिलीप नेरकर यांच्या पत्नी घराबाहेर आले असता समोरील शेवाळे यांच्या घराकडे लक्ष गेले तेव्हा दरवाजाचे कुलूप नसल्याचे दिसून आले तेव्हा त्यांनी पती दिलीप नेरकर यांना सांगितले,श्री.नेरकर यांनी शेवाळे यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क करून दरवाजाचे कुलूप तुटल्याचे सांगितले असता शेवाळे यांनी घडलेली घटना पोलीस पाटील मालपाणी यांना सांगितली,त्वरीत पोलीस पाटील मालपाणी घटनास्थळी आल्यानंतर त्यांनी घरफोडी झाल्याची माहिती पोलिसांना दिली. घटनास्थळी सहाय्यक पोलीस निरीक्षक देवेंद्र शिंदे, पोलीस उपनिरीक्षक गणेश बुवा, पोलीस नाईक अतुल आहेर,पोलीस कान्स्टेबल धनंजय बैरागी यांनी पाहणी करून पंचनामा केला.पाहणी दरम्यान अजून एका ठिकाणी चोरी झाल्याची माहिती मिळाली, महा ई सेवा केंद्र जवळील जिभाऊ दोधा खरे यांच्या घराच्या चैनल गेटचे दोन कुलूप, तर दरवाजाचे बाहेरील गेट व दरवाजाचे कुलूप कटरच्या साह्याने चोरट्यांनी तोडल्याचे निदर्शनास आले,परंतु चोरट्यांच्या हाती काही नाही लागल्याने त्यांनी कपाटाच्या काचा फोडून आर्थिक नुकसान केले.याप्रकरणी अज्ञात चोरट्या विरोधात सटाणा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.यावेळी श्वानपथक यांना पाचारण करण्यात आले होते, श्वानने जिभाऊ खरे यांच्या घरापासुन ते महालपाटणे चौफुली पर्यंत दिशा दाखवली.मात्र चोर याठिकाणा पासून वाहनाने पसार झाल्याचे निष्पन्न झाले.गस्त वाढविण्याची मागणीगावात सतत होत असलेल्या घरफोड्यामुळे नागरिक भयभीत झाले आहेत, फेब्रुवारी महिन्यात प्रताप शिरोडे बाहेरगावी गेलेले असतांना यांच्या घरी मध्यरात्री घरफोडी, तर मागील मिहन्यात देशी दारू दुकान,आदर्श आटो केअर अशा ठिकठिकाणी बंद असलेले दुकान व गावांत मध्यरात्रीच्या वेळी घरफोडीमुळे पोलिसांनी रात्रीच्या वेळी गस्त घालण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे.

टॅग्स :Policeपोलिसtheftचोरी