शहरं
Join us  
Trending Stories
1
"ठाकरे बंधूंच्या ताकदीपुढे सरकारनं माघार घेतली; ही विजयाची पहिली पायरी, यापुढे..."
2
पुण्यातील लोणी काळभोरमध्ये लागले इराणचे झेंडे, खामेनींचे फ्लेक्स; Video व्हायरल...
3
Video:"...आता मला काय विचारताय तुम्ही"; एकनाथ शिंदे चंद्रशेखर बावनकुळेंवर का संतापले?
4
PF मधून पैसे काढायचेत? पहिले जाणून घ्या तुमच्या कंपनीनं केलंय की नाही 'हे' काम? नाहीतर क्लेम होईल रिजेक्ट
5
भारताने पाकिस्तानला नकाशावरून हटवले असते; इंडोनेशियात खुलासा, अणुयुद्ध झाले असते तर काय घडलं असते?
6
Job Alert: पाच अशा नोकऱ्या, ज्या येत्या काळात संपून जातील; वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमचा इशारा
7
कॅनरा बँकेतील सोन्यावर मारला डल्ला, ५३.२६ कोटींची चोरी; शाखा मॅनेजरच निघाला मुख्य सूत्रधार
8
नोकरीचे आमिष दाखवून अल्पवयीन मुलीची विक्री करून परस्पर लावले लग्न, पित्याने घेतला गळफास
9
"सत्यनारायण पूजेसाठी दिवसभर उपवास अन् नंतर...", शेफालीचा पती पराग त्यागीने दिली माहिती
10
विठ्ठल दर्शनाची आस अधुरीच राहिली; वारीतच २ वारकऱ्यांवर काळाचा घाला,  हरिनामाचा गजर शेवटचा ठरला
11
कधीही फसणार नाही! ‘या’ स्ट्रॅटजीनं कराल म्युच्युअल फंडात गुंतवणूक; बनू शकेल मोठा पैसा, अनेकांना माहितच नाही
12
शाळेत जायला रस्ताच नाही, कोणत्या 'भाषेत' सांगितल्यावर ही समस्या सुटेल? फांदीचा आधार घेत पार करतात नदी...
13
Share Market Today: शेअर बाजाराची फ्लॅट सुरुवात; ट्रेंट, इटर्नलमध्ये तेजी; एनटीपीसी, Reliance घसरले
14
"साहेब, तुम्ही जे म्हणता तेच..."; राज ठाकरेंचा व्हिडीओ केला पोस्ट, मनसेचा नेता काय म्हणाला?
15
संसदेच्या पावसाळी अधिवेशनासाठी सरकारचा भरगच्च आर्थिक अजेंडा
16
उत्तर महाराष्ट्रात भाजपाची ताकद वाढणार; पुढील ४८ तासांत २ माजी आमदारांचा पक्षप्रवेश होणार
17
Paresh Rawal : "आता सगळं ठीक झालंय...", परेश रावल यांचं 'हेरा फेरी ३'मध्ये कमबॅक; नक्की काय घडलं होतं?
18
हिंदीचे दोन्ही जीआर रद्द, त्रिभाषा सूत्राचा निर्णय घेण्यासाठी नवी समिती स्थापन
19
‘कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरण माध्यमांतूनच कळाले’
20
पाकिस्तानमध्ये तुफान चालतोय 'सरदार जी ३', दिलजीतची सोशल मीडियावर माहिती; होतेय टीका

तासाभराच्या पावसाने २५ फिडर्स फेल

By admin | Updated: May 29, 2014 00:49 IST

विजेचा खेळखंडोबा : दोन दिवसांच्या पावसाने विजेचा पुरता बोजवारा

विजेचा खेळखंडोबा : दोन दिवसांच्या पावसाने विजेचा पुरता बोजवारानाशिक (प्रतिनिधी)- वादळी पावसामुळे कालपासून कोलमडून पडलेली वीज वितरण यंत्रणा काहीशी सावरत नाही तोच आज अवघ्या तासभर झालेल्या पावसामुळे पुन्हा यंत्रणेने मान टाकली आणि संपूर्ण शहर अंधारात गेले. काही वेळेतच वीजपुरवठा सुरळीत करण्यात आल्याचा दावा कंपनीकडून करण्यात आला असला तरी रात्री नऊ वाजेपर्यंत अर्ध्याअधिक शहरात अंधार पसरला होता. काल झालेल्या वादळीवार्‍यामुळे शहरातील संपूर्ण वीज वितरण यंत्रणा कोलमडून पडल्याने नागरिकांना त्रास सहन करावा लागला. विजेअभावी नागरिकांचे हाल झाले, तर अनेकांना रात्र अंधारात काढावी लागली. त्यातच वीज कंपनीच्या अधिकार्‍यांकडून कोणतेही सहकार्य मिळत नसल्याने विजेची नेमकी काय परिस्थिती आहे याची माहिती मिळत नसल्याने नागरिकांच्या त्रासात अधिकच भर पडली. काल शहरात खंडित झालेला वीजपुरवठा काही ठिकाणी सुरळीत झाला; मात्र अनेक ठिकाणी आज दुपारपर्यंतही वीज सुरळीत होऊ शकली नाही. त्यातच आज दुपारच्या सुमारास वार्‍यासह जोरदार पाऊस झाल्यानंतर संपूर्ण शहरातील यंत्रणा पुन्हा कोलमडून पडली. अवघ्या तासाभराच्या पावसामुळे शहरातील तब्बल २५ फिडर्स नादुरुस्त झाले. गंगापूर, मखमलाबाद, जेलरोड, नाशिकरोड, द्वारका, पाथर्डी, राणेनगर, इंदिरानगर येथील फिडर्स नादुरुस्त झाल्याने या फिडर्सवरील हजारो ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित झाला, तर वीजतारा निखळल्यामुळे सिडको, सातपूर, गंगापूररोड, टिळकवाडी, शरणपूररोड, कॉलेजरोड परिसरातील वीजपुरवठाही खंडित झाल्याने नागरिकांचे चांगलेच हाल झाले. ठक्कर बझार, अशोकस्तंभ आणि पंचवटी येथील फिडर्सदेखील नादुरुस्त झाल्यामुळे अर्धेअधिक शहर पुन्हा एकदा अंधारात लोटले गेले. रात्री नऊ वाजेपयंर्त शहरातील बहुतांश भागात वीजपुरवठा सुरळीत झालेला नव्हता. १३९ खांब जमीनदोस्त, लाखोंचे नुकसानमंगळवारी झालेल्या वादळी पावसामुळे महावितरणचे तब्बल १३९ खांब जमीनदोस्त झाले. यामुळे महावितरणचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. नाशिक शहर-१ आणि शहर-२ मधील अतिउच्च दाब आणि लघुदाब वाहिन्यांचे खांब कोसळण्याच्या घटना घडल्या. उच्चदाब वाहिनीचे ६३ तर लघुदाब वाहिनीचे ७६ खांब पडल्याने मोठ्या प्रमाणात यंत्रणा कोलमडून पडली. साधारणपणे दोन किलोमीटरपर्यंतच्या उच्चदाब वाहिनी तर १.६२ कि.मी पयंर्त लघुदाब वाहिन्या पडल्याने या वाहिन्या दुरुस्तीच्या कामाला विलंब झाला. एका ठिकाणी विद्युत डीपी जळाली तर तीन फिडर्स नादुरुस्त झाल्याने वीज कंपनीचेही मोठ्या प्रमाणावर आर्थिक नुकसान झाले. वितरण प्रणालीच्या दुरुस्ती कामासाठी मजूर, वाहने आणि इतर साहित्यांसाठी कंपनीला तब्बल ३.७५ लाखांचा खर्च आला. उच्चदाब खांब पडल्याने ५.२९ लाख, लघुदाब खांब पडल्याने ४.४ लाख इतके नुकसान झाले, तर लघुदाब वाहिनी पडल्याने १.६२ लाख तर उच्चदाब वाहिनी दुरुस्तीसाठी ७९ हजार इतका खर्च आला. तीन ट्रान्सफार्मर दुरुस्तीचा खर्च ६० हजार, तर डीपी दुरुस्तीवर २५ हजाराचा खर्च महावितरणला आला.