शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

भुजबळ-कोकाटे यांच्यात तासभर चर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 7, 2018 00:24 IST

सिन्नर : जिल्ह्याचे माजी पालकमंत्री छगन भुजबळ व सिन्नरचे माजी आमदार माणिकराव कोकाटे यांच्या मुंबई भेटीत सुमारे तासभर गोपनीय चर्चा झाल्याचे वृत्त आहे. कोकाटे यांनी भेट घेऊन त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली असली तरी आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्याच्या दोन्ही नेत्यांमध्ये तासभर काय चर्चा झाली, याबाबत सर्वांनाच उत्सुकता लागून राहिली आहे.

ठळक मुद्देभेटगाठ : सहमतीच्या राजकारणाचा भुजबळांनी दिला सल्ला

सिन्नर : जिल्ह्याचे माजी पालकमंत्री छगन भुजबळ व सिन्नरचे माजी आमदार माणिकराव कोकाटे यांच्या मुंबई भेटीत सुमारे तासभर गोपनीय चर्चा झाल्याचे वृत्त आहे. कोकाटे यांनी भेट घेऊन त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली असली तरी आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्याच्या दोन्ही नेत्यांमध्ये तासभर काय चर्चा झाली, याबाबत सर्वांनाच उत्सुकता लागून राहिली आहे.माजी आमदार माणिकराव कोकाटे यांनी बुधवारी (दि. ६) बांद्रा येथील एमईटी शिक्षणसंस्थेत माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांची भेट घेतली. कोकाटे यांच्यासह त्यांचे अनेक समर्थक यावेळी उपस्थित होते. कोकाटे व भुजबळ यांच्यात सुमारे एक तास चर्चा झाली. त्यावेळी सर्व कार्यकर्ते बाहेर होते. ‘माणिकराव, आता जिल्ह्याच्या विकासासाठी सहमतीचे राजकारण करावे लागेल. त्यासाठी पक्षीय विचार बाजूला ठेवावा लागेल. तशी तयारी ठेवावीच लागेल,’ असा सल्ला भुजबळ यांनी कोकाटे यांना दिल्याचे समजते.यावेळी सुनील नाईक, संतू पाटील, राजेंद्र जगझाप, बंडूनाना भाबड, चंद्रकांत बोडके, योगेश माळी, पांडुरंग वारूंगसे, वाळीबा गुरूकुले, सिन्नर बाजार समितीचे सभापती विनायक तांबे, सुनील माळी, विजय झगडे, अनिल शेळके, राजू माळी, जिल्हा परिषदेचे माजी सभापती राजेश नवाळे, शशिकांत गाडे, शरद शिंदे, राजेंद्र पोमनर, कैलास झगडे, बाळासाहेब हांडे, भाऊसाहेब शिंदे, माजी नगरसेवक बापू गोजरे, युगेन क्षत्रिय, विजय वरंदळ, मंगेश क्षत्रिय, सतीश कोकाटे, नाना खुळे, ज्ञानेश्वर तांबे, प्रा. जयंत महाजन, बाळू भोर, अंबादास भुजबळ, भरत आरोटे, सुनील उगले, लक्ष्मण मंडाले, नगरसेवक राहुल दिवे आदी उपस्थित होते. नाशिक व सिन्नर तालुक्यातून अनेक वाहनांतून शेकडो कार्यकर्ते कोकाटे यांच्या नेतृत्वाखाली भुजबळ यांच्या भेटीसाठी मुंबईला गेले होते. सर्वांनीच भुजबळ यांच्या प्रकृतीत सुधारणा व्हावी, अशी प्रार्थना केली.