शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
4
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
5
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
6
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
7
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
8
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
9
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
10
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
11
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
12
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
13
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
14
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
15
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
16
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
17
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
18
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
19
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
20
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
Daily Top 2Weekly Top 5

हॉटेलचालकांची वेटरला अपहरण करून मारहाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 15, 2018 00:38 IST

एका हॉटेलच्या वेटरचे चौघा हॉटेलचालकांनीच पगाराच्या वादातून अपहरण करून त्याला गंगापूर रोडवरील हॉटेलमध्ये डांबून ठेवत त्याचा दात पाडल्याची घटना घडली आहे.

नाशिक : एका हॉटेलच्या वेटरचे चौघा हॉटेलचालकांनीच पगाराच्या वादातून अपहरण करून त्याला गंगापूर रोडवरील हॉटेलमध्ये डांबून ठेवत त्याचा दात पाडल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी पोलिसांनी संशयित चौघांपैकी तिघांना अटक केली असून, एकाचा शोध सुरू आहे.औरंगाबादरोड परिसरातील जनार्दन स्वामी आश्रमाजवळ तपोवन परिसरतील रहिवासी संजय एकनाथ पिठे (१८) याने दिलेल्या फिर्यादीनुसार, तो गंगापूर रोडवरील पाहुणचार हॉटेल येथे वेटरचे काम करीत होता; मात्र गेल्या काही दिवसांपासून त्याचा पगार हॉटेल व्यवस्थापनाकडे अडकला होता. पगाराचे हे पैसे मागण्यासाठी तो हॉटेलचालकांकडे गेला होता; परंतु व्यवस्थापनाने त्याला पगार देण्यास टाळाटाळ केली. याच रागातून पाहुणचार हॉटेलचे संशयित प्रदीप निकम, अशोक निकम, विनोद व अन्य एक अशा चौघांनी गुरुवारी (दि. १३) दुपारी १२ वाजेच्या सुमारास संजय पिठेला औरंगाबाद नाक्यावरून एमएच ०४ एडब्ल्यू २८२९ या क्र मांकाच्या कारमध्ये बळजबरीने बसवून अपहरण करीत त्याला पाहुणचार हॉटेलमध्ये डांबून ठेवले. त्यानंतर संशयितांनी वेटर पिठे याला मारहाण करीत संशयित अशोक निकम याने फटका मारल्याने त्याचा दात पाडला. या घटनेत वेटर पिठे हा जखमी झाला असून, त्याने दिलेल्या फिर्यादीनुसार चौघांविरु द्ध आडगाव नाका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी आडगाव पोलिसांनी तपास करून चौघांपैकी तिघांना अटक केली असून, या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक भोंडवे करीत आहेत.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीArrestअटक