शहरं
Join us  
Trending Stories
1
अखेर पाकिस्तानने गुडघे टेकले! आता नवीन अडचणीत सापडला, जल-मंथनसाठी प्रयत्न सुरू
2
हगवणे कुटुंब राक्षसी, त्यांना चौकातच फाशी देण्यात यावी : विजय वडेट्टीवार
3
SRH vs KKR : ऑरेंज आर्मीचा मोठा विजय! विदर्भकराची हॅटट्रिक हुकली; पण पठ्ठ्यानं मैफिल लुटली
4
न्यायाधिशांनी चार दिवस प्यायले साप मेलेले दूषित पाणी प्रकृती बिघडली; शासकीय निवासस्थान साेडण्याची नामुष्की
5
हेड- क्लासेन जोडीनं जोर लावला; शेवटी ३०० पारचा नारा अधुरा! पण SRH नं वर्ल्ड रेकॉर्ड केला भक्कम
6
कोल्हापूरच्या घाटक्षेत्रात २९ पर्यंत ऑरेंज अलर्ट; दोन दिवसांतच मान्सून महाराष्ट्रात धडकणार
7
तेजप्रताप यादवच नाही तर या बड्या नेत्यांच्या प्रेमप्रकरणांवरूनही झाला होता वाद, अशी आहे यादी
8
SRH vs KKR: वादळी खेळीसह क्लासेनची विक्रमी सेंच्युरी! पण वैभव सूर्यंवशीच्या तो मागेच राहिला
9
विधानसभा निवडणुकांसाठी सरकारची रणनीती; PM मोदींनी NDAच्या बैठकीत दिला विजयाचा मंत्र
10
पुढचा प्लॅन काय? धोनीनं घरची ओढ अन् या गोष्टीवर प्रेम व्यक्त करत असा टाळला तो विषय
11
शाहजहांपूर मेडिकल कॉलेजमध्ये फॉर्मेलिन गॅस गळती, रुग्णालयात चेंगराचेंगरी; एक मृत
12
बोलण्यावर संयम ठेवा, ऑपरेशन सिंदूरवर अनावश्यक विधाने टाळा; PM मोदींच्या BJP नेत्यांना सूचना
13
त्या निवेदनातून माझे नाव वगळा, दुसरे नाव टाका;पोलिस महानिरीक्षक जालिंदर सुपेकरांची ऑडिओ क्लिप व्हायरल
14
भारताला चीनपासून सर्वात मोठा धोका, चहुबाजूंनी घेरण्यासाठी विणतोय जाळं, अमेरिकेच्या गोपनीय अहवालातून गौप्यस्फोट 
15
GT ला मोठा धक्का! CSK वर पहिल्यांदाच आली तळाला राहण्याची वेळ; पण जाता जाता त्यांनी MI ला दिलं गिफ्ट
16
निरा डावा कालव्याला भगदाड..! बारामती परिसरात नागरिकांच्या घरात-शेतात पाणीच पाणी
17
धक्कादायक! चेंजिंग रूममध्ये कॅमेरा बसवला होता, महिलांचे कपडे बदलतानाचे व्हिडीओ व्हायरल
18
'...तर तुम्हाला रस्त्यावर फिरू देणार नाही', जरांगे पाटलांचा मुख्यमंत्री फडणवीसांना थेट इशारा
19
"मी एका खोलीच्या घरात राहतो, कर्जबाजारी..."; सीबीआयच्या आरोपपत्रावर सत्यपाल मलिक म्हणाले,...
20
पीएम मोदींचा पाकिस्तान दौरा अन् 2016 चा पठाणकोट हल्ला..; शशी थरुर यांचे मोठे वक्तव्य

मनपा रुग्णालयांमध्ये औषधाविना रुग्णांचे हाल

By admin | Updated: July 26, 2014 00:53 IST

मनपा रुग्णालयांमध्ये औषधाविना रुग्णांचे हाल

मालेगाव : येथील महानगरपालिका औषध ठेकेदाराची दिरंगाई आणि प्रशासनाची तथाकथित तांत्रिक कारणे यामुळे गेल्या तीन महिन्यांपासून विविध प्रकारच्या १८५ औषधांची खरेदी होऊ शकलेली नाही. त्यामुळे संबंधित आजाराच्या रुग्णांना औषधाविना परतावे लागत असून, खासगी औषध विक्रेत्यांकडून औषध खरेदी करावे लागत असल्याने सर्वसामान्य रुग्णांना आर्थिक भुर्दंड सोसावा लागत आहे.येथील मनपाचे वाडीया व अली अकबर हे दोन प्रमुख रुग्णालये, कॅम्प दवाखाना व प्रसूतिगृह आणि नऊ नागरी आरोग्यकेंद्रे आहेत. या रुग्णालयातील व प्राथमिक आरोग्य उपचार केंद्रातील संबंधित आजारांवरील औषधसाठा संपुष्टात आल्यानंतर मनपा प्रशासनातर्फे यासंदर्भातील निविदा प्रसिद्ध करण्यात आली. निविदा प्रक्रियेनुसार मनपाच्या एका नियमित औषध ठेकेदाराची त्यासाठी निवड करण्यात आली. मात्र ८० लक्षहून अधिक रकमेच्या या औषध पुरवठ्यासाठी संबंधित ठेकेदाराने दाखल केलेल्या किमान किमती-विषयीचा मुद्दा पुढे आला. आधीच्या औषधांच्या किमती व आताच्या औषधांच्या किमती यांच्यात तफावत असल्याच्या आरोपातून या निविदा ठेक्याची प्रक्रिया खोळंबली. आरोग्य प्रशासन व स्थायी समितीकडून यासंदर्भात औषधविक्रेत्या कंपनीच्या दरपत्रकाची मागणी करण्यात आली. त्यानंतर मनपाच्या स्थायी समिती बैठकीतही दोन - तीनदा चर्चा झाली. मात्र याविषयी समाधानकारक तोडगा निघू शकलेला नाही.गेल्या तीन महिन्यांपासून मनपा औषध खरेदीचा ठेका त्रांगड्यात अडकला आहे. त्याचा फटका विविध आजारांचा रुग्णांना होत आहे. मध्यंतरी अत्यावश्यक शिल्लक साठ्यातील औषधे संपुष्टात आल्याने नाशिकहून तातडीने औषधे आणण्यात आली होती. त्यानंतरही मनपाची औषध खरेदीप्रक्रिया सुरळीत होऊ शकलेली नाही.