शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
3
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
4
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
5
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
6
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
7
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
8
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
9
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
10
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
11
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
12
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
13
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
14
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
15
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
16
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
17
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
18
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
19
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
20
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
Daily Top 2Weekly Top 5

शासनाचे वरातीमागून घोडे ; रब्बी पेरणी अखेरच्या टप्प्यात असताना दिली खरीप नुकसानींच्या पंचनाम्यांना परवानगी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 27, 2017 20:58 IST

नाशिक : दिवाळीपूर्वी ऑक्टोबर महिन्याच्या पहिल्या पंधरवडय़ात जिल्हाभरात परतीच्या पावसाने धुमाकूळ घालत खरीप पिकांचे अतोनात नुकसान केले. त्यामुळे नुकसानग्रस्त भागांचे पीक पंचनामे करून तत्काळ मदतीची मागणी शेतकऱ्यांकडून होत होती. परंतु, ऑक्टोबर उलटल्यानंतर शेतकऱ्यांनी नुकसान झालेले पीक शेतातून काढून रब्बी पेरणीची तयारी केली असताना, शासनाने नुकसानग्रस्त भागाचे पंचनामे करून अहवाल सादर ...

ठळक मुद्देपरतीच्या पावसाने खरीप पिकांचे नुकसानदिवाळीपूर्वी मुसळधार पावसाने झोडपलेनुकसानग्रस्त शेतांमध्ये रब्बीच्या पेरण्या अंतिम टप्प्यात शेतकऱ्यांमध्ये नुकसान भरपाईविषयी संभ्रम

नाशिक : दिवाळीपूर्वी ऑक्टोबर महिन्याच्या पहिल्या पंधरवडय़ात जिल्हाभरात परतीच्या पावसाने धुमाकूळ घालत खरीप पिकांचे अतोनात नुकसान केले. त्यामुळे नुकसानग्रस्त भागांचे पीक पंचनामे करून तत्काळ मदतीची मागणी शेतकऱ्यांकडून होत होती. परंतु, ऑक्टोबर उलटल्यानंतर शेतकऱ्यांनी नुकसान झालेले पीक शेतातून काढून रब्बी पेरणीची तयारी केली असताना, शासनाने नुकसानग्रस्त भागाचे पंचनामे करून अहवाल सादर करण्याचे आदेश जिल्हा प्रशासनाला देत वरातीमागून घोडे मिरविण्याचा प्रकार केला आहे.जिल्ह्यात परतीच्या पावसाचा सुमारे 50 हजार शेतकऱ्यांना फटका बसला असून, जवळपास 25 हजार हेक्टर क्षेत्रवरील पिके पावसामुळे बाधित झाली आहेत. यंदा चांगल्या पावसामुळे चांगले उत्पादन होईल या अपेक्षेने शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर हसू फुलले, परंतु परतीच्या पावसाने शेतक:यांच्या अपेक्षांवर पाणी फेरले. जिल्ह्यातील 662 गावांतील 48 हजार 984 शेतक:यांचे अवकाळीने नुकसान झाले. जिरायत क्षेत्रतील भात, नागली, वरई, बाजरी, भुईमूग, उडीद, खुरासणी, सोयाबीन, मका या पिकांचे 12 हजार 888.55 हेक्टर, तर बागायती क्षेत्रतील 2639.64 हेक्टर क्षेत्रतील कांदा, ऊस व भाजीपाला या पिकांचे नुकसान झाले असून, सर्वाधिक फटका द्राक्षपिकाला बसला. ऐन छाटणीच्या व झाडाने फूल धरण्याच्या काळातच बेमोसमी पाऊस झाल्याने झाडांची फुले गळून पडली, तर हाती आलेला कांदा भुईसपाट झाला. 10 हजार 274 हेक्टरवरील द्राक्षांचे नुकसान झाले आहे. कृषी विभागाने प्राथमिक पातळीवर अवकाळी पावसाने झालेल्या नुकसानीची पाहणी केली. मात्र शासनाकडून कोणतेही निर्देश नसल्याने पीक पंचनामे करण्यात आले नव्हते. आता ऑक्टोबर महिना उलटल्यानंतर शासनाला जाग आली असून, शेतकऱ्यांना शेतातील नुकसान झालेले रब्बीचे पीक काढून तेथे रब्बीची पेरणी अथवा पेरणीची तयारी सुरू केली आहे. परंतु शासनाच्या आदेशानंतर पंचनाम्यासाठी यंत्रणा कामाला लागणार असल्याने अधिकाऱ्यांना काय नुकसान दाखवावे, असा प्रश्न शेतऱ्यांसमोर उभा राहणार आहे. शासनाच्या निर्देशानुसार 65 मिलिमीटरपेक्षा अधिक पाऊस झालेल्या तालुक्यांतील नुकसानीचे पंचनामे करण्यात येतात. मात्र, यावर्षी परतीच्या पावसाने पिके काढणीला आली असताना, अल्पावधीत मोठे नुकसान झाल्याने सरसकट पंचनामे करण्याची मागणी होत आहे. त्यातही आता 33 टक्क्यांपेक्षा अधिक नुकसान झालेल्या पिकांनाच नुकसानभरपाई मिळणार असल्याने किती शेतकरी यास पात्र ठरणार याबाबतही संभ्रम निर्माण झाला आहे.

टॅग्स :agricultureशेतीRainपाऊस