शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
2
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
3
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
4
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
5
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
6
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
7
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
8
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
9
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
10
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
11
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
12
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
13
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खेळतात? असं आहे यामागचं गुपित
14
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
15
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
16
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
17
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
18
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
19
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
20
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
Daily Top 2Weekly Top 5

नासाका सुरु होण्याची आशा पल्लवित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 1, 2018 01:15 IST

राज्यातील बंद असलेल्या कारखान्यांचे सर्वेक्षण करून चालू होण्याच्या स्थितीत असलेल्या कारखान्यांना मदतीचा हात देऊन ते आगामी हंगामात सुरू करण्याचा शासनाने धोरणात्मक निर्णय घेतला आहे.

नाशिकरोड : राज्यातील बंद असलेल्या कारखान्यांचे सर्वेक्षण करून चालू होण्याच्या स्थितीत असलेल्या कारखान्यांना मदतीचा हात देऊन ते आगामी हंगामात सुरू करण्याचा शासनाने धोरणात्मक निर्णय घेतला आहे. साखर आयुक्तालयाच्या आदेशान्वये वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या शिष्टमंडळाने नाशिक सहकारी साखर कारखान्यास भेट देत परिस्थितीची पाहणी केली. नासाकाची स्थिती चालू होण्यासाठी अनुकूल असल्याचे प्रथमदर्शनी मत व्यक्त केल्याने आगामी गळीत हंगामात नासाका सुरू होण्याच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. गेल्या पाच वर्षांपासून आर्थिक अडचणीमुळे नासाकाचा गळीत हंगाम बंद आहे. या काळात कारखाना कार्यक्षेत्रातून दोन लाख मेट्रिक टनापेक्षा जास्त ऊस प्रतिवर्षी बाहेरील कारखान्यांना गेला आहे. चार तालुक्यांचे कार्यक्षेत्र असलेल्या नासाका कारखान्यावर अवसायक नेमून वाढणाºया व्याजाला ब्रेक लावला आहे. सद्यस्थितीत नासाकावर जिल्हा बँकेचे ८४ कोटी कर्ज व व्याज थकीत आहे. या पाहणीचा अहवाल साखर आयुक्तांमार्फत शासनाकडे पाठविला जाईल. त्यानंतर त्यावर निर्णय होणार असल्याचे रेपाळे व देसाई यांनी सांगितले. यावेळी कारखान्याचे प्रभारी कार्यकारी संचालक सुधाकर गोडसे, केमिस्ट हरी दळवी, अभियंता रणजित सहाणे, शेतकी विभागाचे विष्णुपंत गायखे, कामगार युनियनचे शिवराम गायधनी, नामदेव बोराडे, सुरेश दळवी, बी. बी. काकड, गेनू आडके, विठ्ठल घुले, खंडेराव आडके आदी उपस्थित होते.यावेळी माजी अध्यक्ष तानाजी गायधनी, अशोक खालकर यांनी रेपाळे व देसाई यांची भेट घेऊन कुठल्याही परिस्थितीत कारखाना सुरू व्हावा, अशी मागणी केली.राज्य शासनाने १७ फेब्रुवारी रोजी साखर आयुक्त संभाजीराव कडू पाटील यांच्या अध्यक्षतेखाली पुणे येथे बैठक बोलावून सुरु होऊ शकणाºया २८ पैकी पहिल्या टप्प्यातील दहा कारखान्यांची आढावा बैठक घेतली होती. त्यामध्ये नासाकाचा समावेश होता. वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटचे डॉ. जुगलकिशोर रेपाळे, अभियंता सुहास देसाई यांनी बुधवारी कारखान्याची मशीनरी, गव्हाण, गुदाम, स्टोअर, मिल आदींची पाहणी करून कर्मचाºयांकडून तांत्रिक बाबींची माहिती घेतली.

टॅग्स :Sugar factoryसाखर कारखाने