शहरं
Join us  
Trending Stories
1
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
2
US Israel Iran War : युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
3
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
4
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
5
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
6
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
7
मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
8
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
9
Palmistry: आत्ताच आपला तळहात तपासा! 'अशी' भाग्यरेषा असणारे लोक होतात प्रचंड श्रीमंत
10
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
11
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
12
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
13
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
14
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
15
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
16
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
17
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
18
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
19
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
20
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
Daily Top 2Weekly Top 5

'हुक्का' टोळीचे तीघे ताब्यात; आठ घरफोड्या उघडकीस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 28, 2021 19:34 IST

या तीनही संशयितांना पोलिसांनी खाकीचा हिसका दाखविताच त्यांनी मुंबईनाका पोलिसांच्या हद्दीतील सहा व भद्रकाली पोलीस ठाणे हद्दीतील दोन अशा एकुण आठ घरफोड्या केल्याची कबुली दिली आहे.

ठळक मुद्देमुंबईनाका, भद्रकाली पोलीस ठाण्यांकडील गुन्हे उघड४ लाख ५५ हजार ४४० रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला

नाशिक : सराईत गुंडांना दोन वर्षांकरिता शहरासह जिल्ह्यातून तडीपार करण्यात आले असतानाही ते पोलिसांच्या डोळ्यांत धुळफेक करत शहरात वावरत सर्रासपणे बंद घरांचे कुलुप तोडून मौल्यवान वस्तुंवर डल्ला मारत होते. मुंबईनाका पोलीस ठाण्याच्या पथकाने 'हुक्का' टोळीच्या दोघा सराईत तडीपार गुंडांसह त्यांच्या एका साथीदाराला बेड्या ठोकल्या आहे. त्यांच्याकडून सुमारे घरफोड्यांचे आठ गुन्हे उघडकीस आणण्यात पोलिसांना यश आले आहे.शहरातील मुंबईनाका, भद्रकाली पोलीस ठाण्यांच्या हद्दीत होणाऱ्या घरफोड्यांच्या घटना रोखण्यासाठी तसेच घडलेल्या गुन्ह्यांची उकल करण्याकरिता सहायक पोलीस आयुक्त दिपाली खन्ना यांनी मुंबईनाका पोलिस ठाण्याच्या पथकाला तपास करुन संशयितांच्या मुसक्या बांधण्याचे आदेश दिले होते. यानुसार सहायक पोलीस निरिक्षक के.टी.रौंदळे यांच्या पथकाने तपासाची चक्रे फिरवून मिळालेल्या गोपनीय माहितीच्याअधारे सापळा रचून संशयित तडीपार गुंड बब्बु पप्पु अन्सारी ऊर्फ सोहेल, वसीम अब्दुल रहेमान शेख यांना शिताफीने अटक केली. त्यांची कसून चौकशी केली असता त्यांचा दुसरा साथीदार संशयित दिपक पितांबर गायकवाड यासही पोलिसांनी अटक केली. या तीनही संशयितांना पोलिसांनी खाकीचा हिसका दाखविताच त्यांनी मुंबईनाका पोलिसांच्या हद्दीतील सहा व भद्रकाली पोलीस ठाणे हद्दीतील दोन अशा एकुण आठ घरफोड्या केल्याची कबुली दिली आहे.

या चोरट्यांकडून घरफोड्यांमध्ये लांबविलेले १८ग्रॅमचे सोन्याचे मंगळसुत्र, सोन्याची नथ, चांदीचे ताट, फुलपात्रे, चार लॅपटॉप, मिनी गॅस सिलिंडर शेगडी, आयफोन, मिक्सर, स्टीलची पंचपात्री, जर्मनचे डब्बे असा सुमारे ४ लाख ५५ हजार ४४० रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला आहे. त्यांना न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने पोलीस कोठडी सुनावली आहे. या तीघांची कसून चौकशी सुरु असून त्यांच्याकडून अधिक गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता पोलिसांनी वर्तविली आहे.

टॅग्स :nashik police commissioner officeनाशिक पोलीस आयुक्तालयArrestअटकCourtन्यायालय