शहरं
Join us  
Trending Stories
1
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
2
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
3
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
4
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
5
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
6
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
7
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
8
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
9
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
10
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
11
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
12
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?
13
राहुल गांधी यांनी उल्लेख केलेली 'ती' ब्राझिलियन मॉडेल कोण? मतदार यादीत छापला गेला फोटो; तुम्हीही डोक्याला हात लावाल!
14
देशभरात एअर इंडियाचा सर्व्हर डाउन, दिल्ली विमानतळावर प्रवाशांच्या लांबच लांब रांगा; मॅन्युअली पद्धतीने चेक-इन
15
दुबई-अबुधाबी फिरण्याचा विचार करताय? आयआरसीटीसीने आणलंय धमाल पैसा वसूल पॅकेज!
16
India’s Squad vs SA Test : पंत इज बॅक! दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटीसाठी कुणाला मिळाली संधी?
17
IND A vs SA A : रोहित-विराट दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या 'या' वनडे मालिकेपासून दूरच
18
"...तोपर्यंत सरकार तुमच्यासमोर गुडघ्यावर येणार नाही"; कर्जमाफी घेण्यासाठी उद्धव ठाकरेंचा शेतकऱ्यांना सल्ला
19
मारुतीने आज जो इतिहास घडवला, टाटालाही झेपणार नाही; ४२ वर्षांत ३ कोटी कार विकल्या...
20
फक्त २९ पैशांचा शेअर थेट १०० रुपयांवर! १ लाखाच्या गुंतवणुकीतून झाला '३.४४ कोटींचा' नफा

वीरमातांसह खेळाडू मातांचा सन्मान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2021 00:51 IST

राजमाता जिजाऊ यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावर संस्कारातून स्वराजाची मुहूर्तमेढ रोवली. त्याचप्रमाणे, देशासाठी लढणाऱ्या शाहीद जवानांच्या वीरमाता आणि वीरनारी यांचेही योगदान मोलाचे असून, क्रीडाक्षेत्रातील क्षितिजे पादाक्रांत करून देशाचे नाव उंचविणाऱ्या खेळाडूंच्या यशात त्यांच्या मातांचा मोलाचा वाटा असल्याचे प्रतिपादन महापालिका आयुक्त कैलास जाधव यांनी केले.

ठळक मुद्देगौरव : राजमाता जिजाऊ जयंतीचे औचित्य

नाशिक : राजमाता जिजाऊ यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावर संस्कारातून स्वराजाची मुहूर्तमेढ रोवली. त्याचप्रमाणे, देशासाठी लढणाऱ्या शाहीद जवानांच्या वीरमाता आणि वीरनारी यांचेही योगदान मोलाचे असून, क्रीडाक्षेत्रातील क्षितिजे पादाक्रांत करून देशाचे नाव उंचविणाऱ्या खेळाडूंच्या यशात त्यांच्या मातांचा मोलाचा वाटा असल्याचे प्रतिपादन महापालिका आयुक्त कैलास जाधव यांनी केले.कालिका मंदिर देवी ट्रस्ट, क्रीडा साधना संस्था आणि डी.एस.फाउंडेशनतर्फे मंगळवारी (दि.१२) राजमाता जिजाऊ जयंतीनिमित्त १६ वीरमाता आणि वीरनारी  आणि २८ शिवछत्रपती पुरस्कार प्राप्त खेळाडूंच्या मातांचा आयुक्त कैलास जाधव व जिल्हा क्रिडा अधिकारी रवींद्र नाईक यांच्या हस्ते सन्मानपत्र आणि सन्मानचिन्ह प्रदान करून सन्मान करण्यात आला.  व्यासपीठावर प्रमुख पाहुणे मविप्रचे संचालक नाना महाले, कालिका देवी मंदिर ट्रस्टचे खजिनदार सुभाष तळाजिया,  क्रीडा संघटक अशोक दुधारे उपस्थित होते.  कर्तृत्ववान मातांचा सन्मान करण्याचा उपक्रम प्रशंसनीय असल्याचेही त्यांनी यावेळी नमूद केले. दरम्यान, विजया दुधारे यांनी राजमाता जिजाऊ यांच्यावर रचलेली कविता सादर केली. प्रास्तविक आनंद खरे यांनी केले.  सूत्रसंचालन अविनाश खैरनार यांनी केले. यावेळी नितीन हिंगमिरे, अविनाश ढोली, शशांक वझे, विक्रम दुधारे आदी उपस्थित होते.सत्कारार्थी महिला जीजाबाई धोंगडे, मीनाक्षी कुलकर्णी, वैशाली वायदंडे, लीलाबाई  जाधव, कृष्णाबाई बोडके, बाळूबाई सोनावणे, बब्बुबाई ढाकणे, रेखा खैरनार, कल्पना रौंदळ, भारती पगार, सुषमा मोरे, रूपाली बच्छाव, कमल लहाने, सुवर्णा निकम, भरती चौधरी, यशोदा गोसावी, आशा सोनजे, अर्चना निकम, निर्णयाला ठाकरे, भागबाई दराडे  विजया दुधारे, विमल तांबे, आशाबाई कडाळे, देविका महाजन, मीना आथरे, विजया दुधारे, हिराबाई घोलप, उज्ज्वला जाधव, संगीता पोहरे, चंपावती देशमुख, जिजाबाई पाटील, भारती जाधव, आशा मुर्तडक. 

टॅग्स :NashikनाशिकJijau Janmotsavजिजाऊ जन्मोस्तव