शहरं
Join us  
Trending Stories
1
"अख्खा जिल्हा, ९९१ एकर जमीन एकाच कंपनीला दिली, ही काय चेष्टा लावलीय का?" हायकोर्ट संतापले
2
माणुसकीला काळीमा फासणारी घटना! ४ वर्षाच्या मुलाचं गुप्तांग कापलं; कारण ऐकून संताप अनावर होईल
3
टोल नाक्यावर सैन्यातील जवानाला मारहाण, NHAI ची मोठी कारवाई; कंपनीला २० लाख दंड, सोबतच...
4
LGEC 2025: 'लाडकी बहीण' योजनेमुळे महाराष्ट्रातील अर्थव्यवस्थेला चालनाच मिळाली; सुनील तटकरेंनी समजावलं 'गणित'
5
Donald Trump : डोनाल्ड ट्रम्प यांनी पाकिस्तानला जवळ केले! पण अमेरिकी कंपन्यांसाठी धोक्याची घंटा ठरणार
6
भारताच्या मुख्य निवडणूक आयुक्तांना संविधानाचं 'सुरक्षा कवच'; पदावरून हटवणं इतकं सोपं नाही, कारण...
7
Asia Cup 2025 : आता बुमराहला विश्रांतीच घेऊ द्या! आशिया कप स्पर्धेआधी असं का म्हणाले गावसकर?
8
संतापजनक! 23 वर्षीय तरुणीवर अनेक वेळा बलात्कार, सराफा व्यावसायिकाने व्हिडीओही बनवले
9
Mumbai Rain : हवामान विभागाकडून मुंबईला अतिसतर्कतेचा इशारा; मंगळवारी शाळांना सुट्टी जाहीर
10
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बोलावली महत्त्वाची बैठक; ७ केंद्रीय मंत्री राहणार उपस्थित
11
ज्याने ओळखले त्याला १०० तोफांची सलामी! हर्ष गोएंकांनी खाल्लेल्या टोस्टचा तुकडा शेअर केला...
12
अ‍ॅप्पलने मोठी डील केली...! २.७ लाख स्के. फुटांचे ऑफिस भाडेतत्वावर घेतले, १०१८ कोटी मोजणार... 
13
Amreen Kaur Vikramaditya Singh: कोण आहेत अमरीन कौर ज्यांच्यासोबत मंत्री विक्रमादित्य सिंह करणार लग्न?
14
राष्ट्राध्यक्ष पुतिन यांचा PM मोदींना फोन; अलास्कामध्ये ट्रम्प यांच्याशी झालेल्या चर्चेची दिली माहिती
15
शिंदेंची साथ सोडून अजित पवारांकडे...हेमलता पाटील यांच्या पक्षप्रवेशाची तारीख ठरली
16
दुसरीमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्याचा शाळेच्या वसतिगृहात सापडला मृतदेह, पोलिसांनी काय सांगितले?
17
मेट्रोमधून सामान नेण्यासाठी पैसे लागणार; एका बॅगेसाठी ३० रुपये...; तिकीट नाही काढले तर...
18
बंगाली स्थलांतरितांनी घरी परतावं, दरमहिना ५ हजार देऊ; CM ममता बॅनर्जी यांची मोठी घोषणा
19
Thane Rain Alert: ठाण्याला अतिवृष्टीचा इशारा; महापालिकेने शाळा-महाविद्यालयांबद्दल घेतला निर्णय
20
वाल्मीक कराडच्या वकिलाने १ तास ४५ मिनिटे युक्तीवाद केला; उज्ज्वल निकम म्हणतात...

‘लोकमत’तर्फे कर्तबगार सरपंचांचा सन्मान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 17, 2018 23:23 IST

नाशिक : ग्रामविकासाचे स्वप्न सत्यात उतरविणाºया आणि गावाला समृद्ध करण्यासाठी धडपडणाºया जिल्ह्यातील १३ कर्तबगार गावकारभाºयांना ‘लोकमत’च्या वतीने ‘सरपंच अवॉर्ड’ देऊन सन्मानित करण्यात आले. ढोल-ताशांचा गजर आणि तुतारीच्या निनादात मान्यवरांच्या उपस्थितीत सरपंचांचा कौतुक सोहळा अधिकच रंगला. विशेष म्हणजे गावविकासाच्या स्वप्नांना बळ देणारे मोलाचे मार्गदर्शन आणि शेकडो ग्रामस्थांच्या उपस्थितीत झालेला हा गौरव सोहळा सरपंचांसाठी संस्मरणीय ठरला.

ठळक मुद्देसरपंच अवॉर्ड वितरणचा शानदार सोहळा : ग्रामविकासाच्या स्वप्नांना मिळाले पुरस्काराचे बळज्येष्ठ कृषितज्ज्ञ बुधाजीराव मुळीक व औरंगाबाद जिल्ह्यातील राष्टÑपती पुरस्कार विजेते सरपंच भास्करदादा पेरे उपस्थित

नाशिक : ग्रामविकासाचे स्वप्न सत्यात उतरविणाºया आणि गावाला समृद्ध करण्यासाठी धडपडणाºया जिल्ह्यातील १३ कर्तबगार गावकारभाºयांना ‘लोकमत’च्या वतीने ‘सरपंच अवॉर्ड’ देऊन सन्मानित करण्यात आले. ढोल-ताशांचा गजर आणि तुतारीच्या निनादात मान्यवरांच्या उपस्थितीत सरपंचांचा कौतुक सोहळा अधिकच रंगला. विशेष म्हणजे गावविकासाच्या स्वप्नांना बळ देणारे मोलाचे मार्गदर्शन आणि शेकडो ग्रामस्थांच्या उपस्थितीत झालेला हा गौरव सोहळा सरपंचांसाठी संस्मरणीय ठरला.बीकेटी टायर्स प्रस्तुत, पतंजली आयुर्वेद प्रायोजित आणि महिंद्रा ट्रॅक्टर्स सहप्रायोजक असलेल्या ‘लोकमत सरपंच अवॉर्ड २०१७’चा शानदार सोहळा हॉटेल एक्स्प्रेस इन येथे पार पडला. या सोहळ्यासाठी माजी मंत्री विनायकदादा पाटील, जिल्हा परिषद अध्यक्ष शीतल सांगळे, विभागीय महसूल आयुक्त महेश झगडे, पोलीस अधीक्षक संजय दराडे, पोलीस आयुक्त रवींद्रकुमार सिंगल, बीकेटी टायर्सचे सहायक व्यवस्थापक जुबेर शेख, अधिकृत वितरक सुरेश धूत, महिंद्राचे वरिष्ठ व्यवस्थापक (इन्व्हेंट अ‍ॅण्ड अ‍ॅक्टिव्हेशन) अविनाश ओझा, एरिया मॅनेजर हर्षद साबळे, अधिकृत वितरक उदय गोळेसर तसेच एक्स्प्रेस इनचे विकास शेलार आदी मान्यवर व्यासपीठावर होते, तर प्रमुख वक्ते म्हणून ज्येष्ठ कृषितज्ज्ञ बुधाजीराव मुळीक व औरंगाबाद जिल्ह्यातील राष्टÑपती पुरस्कार विजेते सरपंच भास्करदादा पेरे उपस्थित होते.प्रारंभी कीर्ती भवाळकर यांच्या नृत्यांगण कथक नृत्य संस्थेच्या नृत्यांगनांनी गणेशवंदना सादर केली. मान्यवरांच्या हस्ते ‘लोकमत’चे संस्थापक संपादक जवाहरलालजी दर्डा यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यावेळी बीकेटी टायर्स, महिंद्रा ट्रॅक्टर्स आणि पतंजली यांच्या उत्पादनांची ध्वनिचित्रफीत दाखविण्यात आली. मान्यवरांचा सत्कार ‘लोकमत’चे सहायक उपाध्यक्ष बी.बी. चांडक व निवासी संपादक किरण अग्रवाल यांच्या हस्ते करण्यात आला.यावेळी लोकमतचे निवासी संपादक किरण अग्रवाल यांनी, प्रास्ताविकात सरपंच अवॉर्ड उपक्रमाची भूमिका मांडली. गावाचा प्रपंच चालविणारा आणि नवी उमेद, ऊर्जा आणि भरारी घेऊन ग्रामविकासाचे स्वप्न पाहणारा सरपंच हा खरा गावप्रमुख असतो. चौदाव्या वित्त आयोगानुसार सरपंचांना निधीचा विनियोग करण्याचे अधिकार असलेला आजचा सरपंच आहे. या कर्तबगार आणि विकासासाठी झटणाºया सरपंचांचा हा गौरव सोहळा असल्याचे अग्रवाल म्हणाले. लोकमत हे केवळ वृत्तपत्र राहिले नाही तर वाचकांची चळवळ झाली आहे. लोकमतने सर्वसामान्यांसाठी अनेक व्यासपीठ उपलब्ध करून दिले आहेत. लोकमतने सुरू केलेल्या विविध पुरस्कारांच्या मालिकेत संसदेपासून ते सरपंचपदापर्यंतचा प्रवास असल्याचे अग्रवाल यांनी आपल्या प्रास्ताविकात सांगितले. यावेळी मान्यवरांच्या हस्ते जल व्यवस्थापन, वीज व्यवस्थापन, शैक्षणिक सुविधा, स्वच्छता, पायाभूत सुविधा, ग्रामसंरक्षण, आरोग्य, कृषी तंत्रज्ञान, ई-प्रशासन (डिजिटल अवॉर्ड) पर्यावरण संवर्धन, रोजगार निर्मिती, उदयोन्मुख नेतृत्व, सरपंच आॅफ द इअर या श्रेणींमध्ये सरपंचांना पुरस्कार प्रदान करण्यात आले. यामध्ये महिला सरपंचांचा लक्षणीय सहभाग होता.परीक्षक म्हणून वनाधिपती विनायकदादा पाटील यांच्या अध्यक्षतेखाली कृषी अर्थतज्ज्ञ गिरीधर पाटील, वीज मंडळाचे निवृत्त मुख्य अभियंता अरविंद गडाख, जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी (ग्रामपंचायत) राजेंद्र पाटील, प्रगती अभियानच्या अश्विनी कुलकर्णी, जलचिंतनचे अध्यक्ष राजेंद्र जाधव, जलपर्यावरण अभ्यासक निशिकांत पगारे यांनी काम पाहिले. यावेळी त्यांचा सत्कार करण्यात आला. सूत्रसंचलन रवींद्र मालुंजकर यांनी, तर आभार लोकमतचे सहायक उपाध्यक्ष बी. बी. चांडक यांनी मानले.पुरस्कार वितरण समारंभाआधी कार्यक्रमस्थळी येणाºया सरपंच, ग्रामपंचायत पदाधिकारी तसेच कार्यकर्त्यांचे प्रवेशद्वारावर गुलाबपुष्प देऊन व तुतारीच्या निनादात स्वागत करण्यात आले.सरपंच अवॉर्ड स्वीकारताना सरपंच ग्रामपंचायत सदस्य आणि कार्यकर्त्यांसह व्यासपाठीवर आले होते.कार्यक्रमास आलेल्या सरपंच, पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी कार्यक्रमस्थळी उभारलेल्या बैलगाडीच्या देखाव्याजवळ सेल्फी काढून आनंद साजरा केला.या कार्यक्रमाचे ‘लोकमत नाशिक’ या फेसबुक पेजवरून लाइव्ह प्रक्षेपण झाले. हा कार्यक्रम अनेक गावांनी फेसबुक पेजवरून लाइव्ह पाहिला. भास्करराव पेरे पाटील यांचे भाषण ऐकताना सरपंचांसह सर्व उपस्थित तल्लीन झाले.सरपंच अवॉर्ड सोहळ्याचे आकर्षक व्यासपीठ होते. या व्यासपीठावरून काही चित्रफिती स्क्रीनवर दाखविण्यात आल्या.चार तास सुरू असलेल्या या कार्यक्रमातून उपस्थितांना ग्रामविकासाचे धडे मिळाले.आराखडा महत्त्वाचाप्रत्येक सरपंचाने गावाचा आर्थिक विकास, सामाजिक न्याय, पारदर्शकता आणि अर्थसंकल्प यांचे आराखडे तयार केले पाहिजे. त्या माध्यमातूनच गावपातळीवरची आर्थिक व्यवस्था मजबूत होण्याबरोबरच रोजगारही उपलब्ध होईल. गावच्या अर्थकारणामुळेच देशाची अर्थव्यवस्था सुदृढ होईल.- महेश झगडे,विभागीय आयुक्त