शहरं
Join us  
Trending Stories
1
वैष्णोदेवी भूस्खलनात आतापर्यंत ३० मृत्युची नोंद; बचावकार्य सुरू, मृतांची संख्या वाढण्याची शक्यता
2
अंतरवाली सराटीतून आज मराठा बांधव मुंबईकडे, गावा-गावात स्वागताची जय्यत तयारी
3
KCL 2025: पदार्पणाच्या सामन्यात हॅटट्रिक, भारताच्या युवा गोलंदाजाचा केसीएलमध्ये धुमाकूळ!
4
"एवढे शुल्क लाऊ की तुमचं...!"; पंतप्रधान मोदींसोबतच्या फोन कॉलसंदर्भात ट्रम्प यांचा मोठा दावा!
5
Vasai: वसईत चार मजली इमारतीचा भाग कोसळला; दोघांचा मृत्यू, ९ जण जखमी!
6
Amravati: पॉर्न व्हिडिओ पाहण्यापासून रोखल्याने मुलांचा वडिलांवर हल्ला, अमरावतीतील घटना!
7
भारताचे ‘सुदर्शन चक्र’ होणार ढाल अन् तलवारही, भारताचे आत्मनिर्भर होण्याच्या दृष्टीने आणखी एक पाऊल
8
खासगी शिकवणीकडे वाढला विद्यार्थ्यांचा ओढा, शालेय शिक्षणावर केंद्र सरकारने केलेल्या सर्वेक्षणातील निष्कर्ष
9
आजचे राशीभविष्य : बुधवार २७ ऑगस्ट २०२५; उत्पन्नापेक्षा खर्च वाढेल, आरोग्याकडे लक्ष द्यावे लागेल
10
भारत-पाकिस्तानसह ७ युद्धे मी थांबवली; ट्रम्प यांचा पुन्हा दावा
11
एका पक्षकाराला सकाळी, दुसऱ्याला दुपारी बोलावले अन् प्रकरण निकाली! राज्य माहिती आयोगाचा असाही कारभार
12
मेट्रो ४साठी फ्रान्समधील कंपनी बनविणार ३९ ड्रायव्हरलेस ट्रेनसेट
13
पंकज भोयर वर्धेबरोबरच भंडाऱ्याचेही पालकमंत्री, सावकारे यांची बुलढाण्याचे सहपालकमंत्रीपदी नियुक्ती
14
डोनाल्ड ट्रम्प यांचा ४ वेळा फोन, पण PM मोदींचा बोलण्यास नकार; जर्मन वृत्तपत्राचा दावा
15
मिरारोडमध्ये सदनिकेचा स्लॅब पडून ४ वर्षाच्या बालकाचा मृत्यू; तिघे जखमी 
16
वेगवेगळ्या विचारसरणी असणे हा गुन्हा नाही : सरसंघचालक मोहन भागवत यांचं मत
17
जरांगे पाटलांबद्दल आक्षेपार्ह पोस्ट टाकल्याने तरुणाला काळं फासलं; समर्थकांकडून तरुणाला मारहाण
18
मराठा आरक्षणासाठी ३५ वर्षीय तरुणाने केला आत्महत्येचा प्रयत्न; लातूर जिल्ह्यातील घटना
19
डीएचएलसह अनेक कंपन्यांनी अमेरिकेकडे पाठवणारे पार्सल थांबवले! डोनाल्ड ट्रम्प यांच्यामुळे उडाला गोंधळ
20
विकासकामांत तोडली जाणारी झाडे वाचवण्याचा अनोखा उपक्रम! पुण्यात 'वृक्ष पुनर्रोपण' अभियान

अग्र आनंद मेळ्यात ज्येष्ठ समाजबांधवांचा सन्मान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 26, 2016 02:01 IST

अग्रसेन जयंती : विविध स्पर्धा, गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव

नाशिक : महाराज श्री अग्रसेन जयंतीनिमित्त आयोजित अग्र आनंद मेळ्यात वयाची ७५ वर्षे पूर्ण केलेल्या ज्येष्ठ समाजबांधवांना सन्मानित करण्यात आले. तसेच विविध विद्या शाखांमधील गुणवंतांनाही यावेळी गौरविण्यात आले.अग्रवाल महिला मंडळ, युवक मंडळ आणि अग्रवाल सखी मंचाच्या वतीने विश्वास लॉन्स येथे या आनंद मेळ्याचे आयोजन करण्यात आले होते. मेळ्याचे उद्घाटन रुख्मिणीदेवी सिंघानिया, संतोषराणी जैन यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी अग्रवाल सभेचे कार्याध्यक्ष किरण अग्रवाल, महामंत्री महेश अग्रवाल, विभागीय अध्यक्ष ताराचंद गुप्ता, जिल्हाध्यक्ष श्याम ढेडिया, अलका अग्रवाल आदि प्रामुख्याने उपस्थित होते. मेळ्यात महिला व युवकांचा फॅशन शो आदि स्पर्धा घेण्यात आल्या. युवा मंडळातर्फे रक्तदान शिबिरही घेण्यात आले. प्रेमा हिसारिया, अंकित अग्रवाल व प्रिती ढेडिया यांनी पाहुण्यांचे स्वागत केले. सुनीता भतवाल व डॉ. ममता अग्रवाल यांनी सूत्रसंचालन केले. यावेळी मोठ्या संख्यने समाजबांधव उपस्थित होते.दरम्यान, येत्या शुक्रवारी (दि.३०) काठे गल्लीमधील नियोजित अग्रसेन भवनच्या ठिकाणी सायंकाळी ५ वाजेपासून फॅन्सी ड्रेस, नृत्य, रांगोळी, कलश सजावट आदि स्पर्धा होणार आहे. मुख्य जयंती सोहळा शनिवारी (दि.१) होणार असून, सकाळी रविवार कारंजा व महात्मानगर येथे माल्यार्पण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. (प्रतिनिधी)सन्मानार्थी ज्येष्ठ राधादेवी अग्रवाल, वासुदेव कारीवाला, सत्यनारायण चॉँद, ओ. पी. अग्रवाल, बनवारीलाल हिसारिया, शकुंतलादेवी अग्रवाल, भारतभूषण अग्रवाल, जगनलाल अग्रवाल, मंगतुराम सिंघानिया, आनंदीदेवी सिंघानिया, गंगाबिशन अग्रवाल, राजकुमार अग्रवाल या ज्येष्ठांना सन्मानित करण्यात आले.