शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

येवल्यात २७ व्यक्तींना होम क्वॉरण्टाइनचा सल्ला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 26, 2020 23:49 IST

कोरोना बाधित महिला रुग्णाच्या संपर्कात आलेल्या चौघांना येवला येथे संस्थात्मक विलगीकरण केंद्रात ठेवण्यात आले असून, रुग्ण परिसरातील २७ नागरिकांना सुरक्षिततेसाठी होम क्वॉरण्टाइन होण्याचा सल्ला देण्यात आला आहे.

ठळक मुद्देकोरोना इफेक्ट : १३ व्यक्ती संस्थात्मक विलगीकरण केंद्रात रवाना

येवला : कोरोना बाधित महिला रुग्णाच्या संपर्कात आलेल्या चौघांना येवला येथे संस्थात्मक विलगीकरण केंद्रात ठेवण्यात आले असून, रुग्ण परिसरातील २७ नागरिकांना सुरक्षिततेसाठी होम क्वॉरण्टाइन होण्याचा सल्ला देण्यात आला आहे.शहरातील कोरोनाबाधित महिला रुग्णाच्या संपर्कात आलेल्या ९ नातेसंबंधितांना यापूर्वीच नाशिक येथे संस्थात्मक विलगीकरण केंद्रात ठेवण्यात आले आहे. तसेच रुग्ण महिलेच्या संपर्कात आलेल्या चौघांना बाभूळगाव (ता. येवला) येथे संस्थात्मक विलगीकरण केंद्रात ठेवण्यात आले आहे. याबरोबरच रुग्ण परिसरातील २७ नागरिकांना सुरक्षिततेसाठी होम क्वॉरण्टाइन होण्याचा सल्ला देण्यात आल्याची माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ. हितेंद्र गायकवाड यांनी दिली आहे.येवला नगरपालिका हद्दीतील सर्व नागरिकांना मास्कचा वापर अनिवार्य करण्यात आला असून, बुधवारपासून (दि.२९) सामान्य नागरिकांना त्यांच्या मागणीनुसार किराणा, भाजीपाला, फळे व इतर आवश्यक वस्तू विक्रेत्यांच्या माध्यमातून घरपोच पुरविण्यात येणार आहे.नगरपालिका हद्दीतील मेडिकल/आवश्यक दुकाने (विंचूर चौफुली हद्दीतील) सकाळी ९.०० ते दुपारी २.०० या कालावधीत बुधवारपासून (दि.२९) सुरू राहणार आहेत. खासगी दवाखान्यालगत असलेले मेडिकल खासगी डॉक्टरांच्या ओपीडीच्या वेळेनुसार चालू राहणार आहेत. पिठाची गिरणी व दैनंदिन दूधपुरवठा सकाळी ६.०० ते ८.०० व सायंकाळी ६.०० ते ८.०० या कालावधीत चालू राहील.येवला उपविभागाचे उपविभागीय अधिकारी पद गेल्या काही महिन्यांपासून रिक्त असून, येवला उपविभागाचा अतिरिक्त कार्यभार मालेगाव उपविभागीय अधिकारी शर्मा यांच्याकडे सोपविण्यात आलेला आहे. आपत्कालीन परिस्थिती व पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर येवला उपविभागासाठी तातडीने स्वतंत्र उपविभागीय अधिकारी देण्याची मागणी केली जात आहे.

शहरात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नगरपालिकेच्या वतीने जंतुनाशक फवारणी व स्वच्छता मोहीम राबविण्यात आलेली होती. मात्र, कोरोनाबाधित रुग्ण आढळून आल्याने पुन्हा प्रतिबंधात्मक क्षेत्रात व बफर झोनमध्येही जंतुनाशक फवारणी, नियमित स्वच्छता व विशेष स्वच्छता मोहीम राबविण्यात येत आहे. यासाठी नगरपालिकेचे २५० कर्मचारी परिश्रम घेत आहेत.- संगीता नांदूरकर, मुख्याधिकारी, नगरपालिका

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याHealthआरोग्य