शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

दिंडोरीत नर्सरी व्यवसायाला घरघर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 20, 2020 00:24 IST

कोरोनामुळे ग्राहकच नसल्यामुळे दिंडोरी तालुक्यातील अनेक छोट्या-मोठ्या नर्सरी व्यावसायिकांचे नुकसान झाले आहे. ज्यांनी रोपे बुक केली ते ग्राहक नर्सरीकडे येत नसल्यामुळे नर्सरी व्यावसायिक अडचणीत सापडले आहेत. गेल्या दोन ते अडीच महिन्यांत एक ते सव्वा कोटी रुपयांची रोपे नर्सरी व्यावसायिकांना फेकून द्यावी लागली आहेत.

ठळक मुद्देमजूर बेरोजगार : रोपे खरेदीला ग्राहक नसल्याने कोट्यवधी रुपयांचे नुकसान

लखमापूर : कोरोनामुळे ग्राहकच नसल्यामुळे दिंडोरी तालुक्यातील अनेक छोट्या-मोठ्या नर्सरी व्यावसायिकांचे नुकसान झाले आहे. ज्यांनी रोपे बुक केली ते ग्राहक नर्सरीकडे येत नसल्यामुळे नर्सरी व्यावसायिक अडचणीत सापडले आहेत. गेल्या दोन ते अडीच महिन्यांत एक ते सव्वा कोटी रुपयांची रोपे नर्सरी व्यावसायिकांना फेकून द्यावी लागली आहेत.तालुक्यात शंभर ते दीडशेच्या जवळपास नर्सरी आहेत. लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर शेतकरी वर्गाने नियोजित लागवड थांबविल्याने नर्सरीत रोपे घ्यायला कुणी आले नाही. त्यामुळे व्यावसायिकांना यंदाच्या हंगामातील तयार रोपे फेकून द्यावी लागली. परस्परांवर अवलंबून असलेले शेतीचे जणू पूर्ण नियोजनच कोलमडले आहे. नर्सरीतील मजुरांना उपासमारीला सामोरे जावे लागत आहे. रोजंदारीवर काम करीत होते; परंतु नर्सरीकडे कोणीही ग्राहक येत नसल्यामुळे या मजुरांची रोजंदारी कशी द्यायची? असा प्रश्न निर्माण झाला आहे. कोरोनामुळे शेतमालाला दर नाही. शेतीच नाही तर रोपे घेणार कोण? कोरोनाचे दुष्टचक्र यंदा नर्सरी व्यवसायाला भोवले आहे. नर्सरित रोपे पडून असल्याने ती फेकून द्यावी लागली. दिंडोरी तालुक्यातील नर्सरीचालकांचे सुमारे एक ते सव्वा कोटीचे नुकसान झाले असल्याचे बालाजी नर्सरीचे संचालक माधव पाचोरकर यांनी सांगितले. नर्सरी व्यावसायिकांनी व्यवसाय बंद केल्याने मजूरवर्गास घराची वाट धरावी लागली.

लॉकडाऊनमुळे बऱ्याच भागातील आठवडे बाजार बंद झाले. बाजार समित्या सुरू असल्या तरी ग्राहक नसल्याचे कारण देत व्यापारी भाजीपाला खरेदी करीत नव्हते. खरेदी केला तरी योग्य दर मिळत नव्हता. यामुळे मेटाकुटीस आलेल्या शेतकऱ्यांनी उभ्या पिकांवर नांगर फिरवला. नवीन लागवड न झाल्याने नर्सरी व्यावसायिकांना याचा मोठा फटका बसला आहे. कोरोनामुळे मजूर मिळत नाही. शिवाय भाजीपाल्याला ग्राहक नसल्याने शेतकºयांची चिंता वाढली आहे. कोरोनामुळे दोन ते तीन महिन्यांपासून शेतमालाला दर नाही. झालेला खर्च भरून निघाल नाही. त्यात लागवडीसाठी पैसा कुठून आणायचा. परिणामी रोपांची लागवड केली नाही.- सुधाकर घुले, शेतकरी, मावडी

प्रथमच नर्सरी व्यवसायावर इतकी वाईट वेळ आली आहे. मजुरांचा पगार, बॅँकेचे व्याज व हप्ते, बियाणे, खते, पावडर, कोकोपीट, रोपांसाठी लागणारे ट्रे, वीजबिल व इतर खर्च कसा फेडायचा, असा प्रश्न उभा ठाकला आहे.- संजय सानप, दिंडोरी

टॅग्स :Agriculture Sectorशेती क्षेत्रFarmerशेतकरी