शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Nagar Parishad Election Results Live: चांदा ते बांदा आज नगरपरिषद अन् नगरपंचायतीचा निकाल; कोण मारणार बाजी?
2
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
3
रहस्यमय! २४ तासांत गायब झाल्या १६ एपस्टीन फाईल्स; डोनाल्ड ट्रम्प यांच्या फोटोचाही समावेश
4
अंबरनाथमध्ये ५४.५०% मतदान; या ठिकाणी निवडणुका झाल्या बिनविरोध
5
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
6
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
7
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
8
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
9
एपस्टीन फाइल्समध्ये 'मालिश तंत्र' अन् भारतीय आयुर्वेदाचा उल्लेख
10
अंबरनाथमधील हॉलमधून १७३ संशयित व्यक्तींना घेतले ताब्यात, बोगस मतदार असल्याचा काँग्रेस, भाजपचा आरोप
11
मुंबईत काँग्रेसला आता धर्मनिरपेक्ष मते आठवली, ठाकरेंची साथ नको, एकटे लढणार; वंचितसाठी दरवाजे खुले ?
12
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
13
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
14
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
15
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
16
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
17
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
18
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
19
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
20
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
Daily Top 2Weekly Top 5

गृहकर्ज स्वस्त, पण बांधकाम साहित्य महाग;

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 25, 2021 04:13 IST

नामदेव भोर /लोकमत न्यज नेटवर्क नाशिक : गृहकर्ज स्वस्त झाले असले तरी, बांधकामाचे साहित्य महागले आहे. त्यामुळे घरांच्या किमती ...

नामदेव भोर /लोकमत न्यज नेटवर्क

नाशिक : गृहकर्ज स्वस्त झाले असले तरी, बांधकामाचे साहित्य महागले आहे. त्यामुळे घरांच्या किमती दिवसेंदिवस वाढतच आहेत. त्यामुळे सर्वसामान्यांचे घराचे स्वप्न दिवसेंदिवस कठीण होत आहे. खासगी बँकांकडून होणारा कर्जपुरवठा कमी व्याजदराने होत असला तरी कर्ज मिळविण्यासाठी क्लिष्ट प्रक्रिया पूर्ण करावी लागत असल्याने सामान्य ग्राहक शासकीय बँकांतून कर्ज मिळविण्याचा प्रयत्न करतात. परंतु, शासकीय बँकांकडून सामान्य ग्राहकांना प्रतिसाद मिळत नसल्याने शासनाने स्वस्त घरांच्या योजनांसोबत शासकीय बँकांतून घरासाठी अर्थसाहाय्याची प्रक्रियाही सुलभ करण्याची मागणी सामान्य नागरिकांकडून होत आहे.

-----

असे आहेत गृहकर्ज दर

स्टेट बॅंक ऑफ इंडिया - ६.७५ ते ७.३०

एलआयसी - ६.९० पासून

युनियन बँक - ६.८० पासून

एचडीएफसी - ६.७५ ते ८.००

आयसीआयसीआय -६.९० ते ८.०५

२९०

----

बांधकाम साहित्यांत स्वस्ताई नाहीच !

२०१८ - २०१९ - २०२० - २०२१ (जुलै)

सिमेंट - २६० २७० ३०० - - ३६०

विटा - ४००० - ४३०० - ४५०० - ६०००

वाळू - ५००० -५५०० -६०००- ७०००

खडी - २३०० - २३०० - २३०० - ३०००

स्टील - ४५ - ४३ - ४०- - ५८

गावापासून दूर घरे स्वस्त, पण जाणे-येणे महाग

नाशिक शहरापासून उपनगरांमध्ये सातपूर, इंदिरानगर, पंचवटी, आडगाव शिवार भागातील घरांचे दर काही प्रमाणात स्वस्त आहेत. परंतु, या भागातून शहरात जाणे-येणे अधिक खर्चिक आहे. दिवसेंदिवस पेट्रोलचे दर वाढत असल्याने शहरापासून दूर घर घेताना नागरिकांकडून प्रवास खर्चाचा विचार अग्रक्रमाने करीत आहे. त्यामुळे गावापासून दूरच्या घरांच्या किमती कमी असूनही अशा घरांना फारशी मागणी नसल्याचे दिसून येत आहे.

साहित्य विक्रेते म्हणतात...

वाळुच्या ठेक्यांचे लिलाव होत नसल्याने वाळूचा तुटवडा निर्माण होत असल्याने त्याचा थेट परिणाम वाळूचे दर वाढण्याच्या स्वरुपात दिसून येत आहे. सध्या बांधकाम साहित्याच्या बाजारात चोरट्या वाळूचे प्रमाण अधिक आहे. नाशिक-मुंबईला वाळू पुरवठ्याचा मु्ख्य स्त्रोत तापी खोरे आहे. या भागातून वाळूचे ठेक्यांचे लिलाव होऊन उत्खनन प्रक्रियेतील अडसर दूर करण्याची गरज आहे.

- शांताराम ठाकरे, वाळू पुरवठादार

----

कोट-

डिझेल दरवाढीमुळे वाहतूक खर्चात वाढ झाली असून त्याचा थेट परिणाम बांधकाम साहित्याच्या महागाईच्या रुपाने झाला आहे. त्याचप्रमाणे कोरोना काळात उत्पादन बंद असल्याने मागणीच्या तुलनेत पुरवठ्याचे समीकरण बिघडल्यानेही सिंमेट स्टीलसारखे बांधकाम साहित्याचे दर वाढले आहे. कोरोनामुळे कच्च्या मालाच्या पुरवठ्यावरही परिणाम झाल्याने दरवाढ झाली आहे.

- नितीन भंडारी, संचलाक, अरिहंत ट्रडर्स

----

घर घेणे कठीणच

सध्या बँकांचे व्याजदर कमी झाले असले तरी बँकांची कर्ज उपलब्ध करून देण्याची क्लिष्ट प्रक्रिया आणि घरांच्या वाढ्त्या किमती सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर जात आहे. त्यामुळे सामान्याचे घराचे स्वप्न अजूनही कठीणच आहे. शासनाने परवडणाऱ्या घरांच्या योजनेसोबतच गृहकर्जाची प्रक्रियाही सुलभ करणे आवश्यक.

- किरण टिळे, ग्राहक

--

चांगल्या उत्पन्नाचे स्त्रोत असलेल्या व्यक्तींनाही शासकीय बँकाकडून कर्ज पुरवठ्यास अनेक समस्यांचा सामना करावा लागतो. त्यामुळे इच्छा असूनही अनेकजण स्वत:चे घरखरेदी करू शकत नाहीत. चांगल्या परिसरात घरांच्या किमती सातत्याने वाढत असल्यामुळे घराचे स्वप्न दिवसेंदिवस कठीण होत आहे.

- सागर ढेरिंगे, ग्राहक