लोकमत न्यूज नेटवर्कयेवला : पंचायत समिती शिक्षण विभागाच्या वतीने तालुक्यातील १८ केंद्रातील २ हजार ५८२ पात्र लाभार्थी शाळांच्या विद्यार्थ्यांना घरपोच पाठ्यपुस्तकांचे वितरण सुरू झाले आहे. पंचायत समिती सभापती प्रवीण गायकवाड यांच्या हस्ते या उपक्र माचा शुभारंभ करण्यात आला.विद्यार्थ्यांना घरपोच पुस्तकेदेण्याची तसेच नवीन विद्यार्थ्यांचे शाळा प्रवेश, नाव नोंदणी प्रत्येक गावात सुरू करण्याची सूचना सभापती गायकवाड यांनी पंचायत समिती शिक्षण विभागाला दिली होती. विशेष म्हणजे प्रत्येक केंद्रातल्या दोन शाळांना भेटी देऊन प्रत्येक विद्यार्थ्याला पुस्तके मिळाली किंवा नाही याची पडताळणी स्वत: सभापती गावात जाऊन करीत आहेत.तालुक्यातील नागडे येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत विद्यार्थ्यांना घरपोच जाऊन पाठ्यपुस्तकांचे वितरण सभापतींच्या हस्ते करण्यात आले. यावेळी विस्तार अधिकारी सुनील मारवाडी, सरपंच श्रावण काळे, शालेय समिती अध्यक्ष खंडू साताळकर, उपाध्यक्ष एकनाथ साताळकर, माजी सरपंच सुवर्णा पाखले, मुख्याध्यापक कैलास गाडे, केशव धीवर, उपशिक्षक राजकुमार भावसार, गौरी कुलकर्णी उपस्थित होते.
येवला तालुक्यात विद्यार्थ्यांना घरपोच पाठ्यपुस्तके
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 23, 2020 17:06 IST
येवला : पंचायत समिती शिक्षण विभागाच्या वतीने तालुक्यातील १८ केंद्रातील २ हजार ५८२ पात्र लाभार्थी शाळांच्या विद्यार्थ्यांना घरपोच पाठ्यपुस्तकांचे वितरण सुरू झाले आहे. पंचायत समिती सभापती प्रवीण गायकवाड यांच्या हस्ते या उपक्र माचा शुभारंभ करण्यात आला.
येवला तालुक्यात विद्यार्थ्यांना घरपोच पाठ्यपुस्तके
ठळक मुद्देसभापती प्रवीण गायकवाड यांच्या हस्ते या उपक्र माचा शुभारंभ