शहरं
Join us  
Trending Stories
1
अफगाणिस्तानच्या हल्ल्यात पाकिस्तानचे ५८ सैनिक ठार; तालिबान सरकारने ISIS बद्दल काय सांगितलं?
2
'मुलींनी रात्री बाहेर पडू नये', दुर्गापूर सामूहिक बलात्कार प्रकरणावर ममता बॅनर्जींचे वादग्रस्त वक्तव्य
3
धक्कादायक! कपडे उतरवून पोलिसांनी हैवानासारखं मारलं, धमन्या फुटल्या; तरुणाचा मृत्यू
4
'वनडे क्वीन' स्मृतीनं रचला नवा इतिहास; ७ वेळच्या वर्ल्ड चॅम्पियन विरुद्ध साधला मोठा डाव
5
“कोकणाच्या भूमीतील या न्याय मंदिरातून स्थानिकांना जलद गतीने न्याय मिळेल”: एकनाथ शिंदे
6
‘लंच पे चर्चा’! राज ठाकरे आईसोबत पुन्हा मातोश्रीवर; उद्धव ठाकरेंसोबत स्नेहभोजनाचा कार्यक्रम
7
गृह कर्जाचा हप्ता भरणं जड जातंय? ईएमआय कमी करण्यासाठी 'या' ५ स्मार्ट ट्रिक्स वापरा आणि मोठी बचत करा!
8
“दादा भुसेंचे ट्रम्प यांच्याशी घनिष्ट संबंध असतील, पालकमंत्रीपद...”; गिरीश महाजनांचा टोला
9
अर्धा संघ तंबूत धाडत कुलदीप यादवनं रचला इतिहास; दिल्लीच्या मैदानात मारला विश्वविक्रमी 'पंजा'
10
तुम्हालाही मस्त नेलपेंट लावायला आवडते? ठरेल जीवघेणं, वाढू शकतो स्किन कॅन्सरचा धोका
11
तुम्हीही होऊ शकता कोट्यधीश! विद्यार्थी, गिग वर्कर्ससाठी 'मायक्रो SIP' चा नवा सुपरहिट ट्रेंड
12
"जर तुम्ही कॉफी बनवायला शिकला असाल तर...", राहुल गांधींच्या दक्षिण अमेरिका दौऱ्यावर भाजपचा निशाणा
13
“तरे म्हणाले होते हा माणूस दगा देईल, तेच झाले, आता पश्चाताप झाला नसता”; ठाकरेंची शिंदेवर टीका
14
नोकरीच्या बचतीची चिंता सोडा! 'या' ४ सोप्या मार्गांनी घरबसल्या तपासा तुमचा PF बॅलन्स
15
Pune Crime: गर्लफ्रेंडच्या मोबाईलमध्ये दुसऱ्या पुरुषासोबतचे नग्न फोटो, बॉयफ्रेंडने केक कापायच्या चाकूनेच तरुणीची हत्या
16
घाईत घेतलेला निर्णय महागात; अमिताभ बच्चन यांनी मुलांच्या ओव्हर कॉन्फिडन्सवर टाकला प्रकाश
17
अफगाणिस्तानचे परराष्ट्र मंत्री पुन्हा पत्रकार परिषद घेणार, महिला पत्रकारांना विशेष आमंत्रण
18
अफगाणिस्तान vs पाकिस्तान; थेट युद्धात कोणाचे सैन्य वरचढ ठरेल? जाणून घ्या...
19
IND vs WI : बुमराहचा 'ट्रिपल फिफ्टी'चा रेकॉर्ड; वेळ घेतला; पण परफेक्ट यॉर्करसह साधला विकेटचा डाव
20
Rajya Sabha Election: भाजपने मुस्लीम नेत्याला उतरवले निवडणुकीच्या रिंगणात, तीन नावाची घोषणा

शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी शिक्षकवर्गाने दिली घरपोहोच सेवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 17, 2020 00:24 IST

देवगाव : येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापक व शिक्षकांनी घरोघरी जाऊन पुस्तकांचे वाटप केले. यावेळी शिक्षकांनी तसेच पालकांनी फिजिकल डिस्टन्सिंगचे नियम पाळून व तोंडाला मास्क लावून पुस्तकांचे वितरण केले. प्रत्येक विद्यार्थ्यांच्या घरी जाऊन त्याला पुस्तकांचा संच देऊन कोरोना महामारीबद्दल माहिती देण्यात आली.

देवगाव : येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापक व शिक्षकांनी घरोघरी जाऊन पुस्तकांचे वाटप केले. यावेळी शिक्षकांनी तसेच पालकांनी फिजिकल डिस्टन्सिंगचे नियम पाळून व तोंडाला मास्क लावून पुस्तकांचे वितरण केले. प्रत्येक विद्यार्थ्यांच्या घरी जाऊन त्याला पुस्तकांचा संच देऊन कोरोना महामारीबद्दल माहिती देण्यात आली. आपल्या पाल्याच्या आरोग्याची काळजी घ्यावी, अशी माहिती दिली. यावेळी पालक पोपट रोकडे, पांडुरंग दोंदे उपस्थित होते.

-----------------------------मेशी : दरवर्षी सर्व प्राथमिक आणि माध्यमिकशाळा १५ जूनपासून सुरू होतात; परंतु यावर्षी कोरोनाच्या महामारीमुळे त्या होऊ शकल्या नसल्यातरी काही शाळांनी घरपोहोच पुस्तके वाटप केलीत. सध्या आॅनलाइन पद्धतीने वर्ग सुरू आहेत. परंतु या पद्धतीने शिकविणे सर्व ठिकाणी विशेषत: ग्रामीण भागात अडचणीचे ठरत आहे. अजून पंधरा दिवस तरी विद्यार्थ्यांना शाळेत जाण्यासाठी प्रतीक्षा करावीलागणार आहे.पेठ : शाळेच्या पहिल्या दिवशीच मुलांना पाठ्यपुस्तके उपलब्ध व्हावीत, या उद्देशाने शिक्षण विभागाकडून पुरेपूर खबरदारी घेण्यात आली. शाळा बंद असल्या तरी पेठ तालुक्यातील जवळपास १३ हजार मुलांसाठी मोफत पाठ्यपुस्तक वितरण गटशिक्षण अधिकारी सरोज जगताप, वसंत खैरनार, विलास साळी यांच्यासह विस्तार अधिकारी केंद्रप्रमुख, विषयतज्ज्ञ यांच्या उपस्थितीत करण्यात आले. यावेळी फिजिकल डिस्टन्सिंगचे पालन करण्यात आले.

--------------------काकासाहेबनगर : निफाड तालुक्यातील उत्तर पूर्व पट्ट्यातील खडकमाळेगाव येथील जिल्हा परिषद शाळा रायतेवस्ती शाळेस पहिल्या दिवशी कोरोना प्रतिबंधक साहित्य भेट देण्यात आले. यावेळी जाणता राजा मित्रमंडळाचे संस्थापक अध्यक्ष विकास रायते, संतोष रहाणे, बालरोगतज्ज्ञ डॉ.मंगेश रायते उपस्थित होते. १५ जून रोजी नवीन शैक्षणिक सत्राची सुरुवात झाली. परंतु कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रत्यक्षात कधी सुरू याबाबत अनिश्चितता आहे; मात्र शाळा सुरू झाल्यावर विद्यार्थ्यांच्या आरोग्याच्या दृष्टिकोनातून कोरोना प्रतिबंधात्मक साहित्याची आवश्यकता लक्षात घेत साहित्य भेट दिले. गेल्या तीन महिन्यांपासून शाळा बंद असल्याकारणाने शाळा निर्जंतुकीकरणासाठी सोडियम हायपोक्लोराइड उपलब्ध करून दिले. यावेळी डॉ. मंगेश रायते यांनी प्रत्यक्षात शाळा सुरू झाल्यानंतर काय काळजी घ्यावी, थर्मल स्कॅनरचा वापर कसा करावा, याबाबत मार्गदर्शन केले. ऋषिकेश रायते यांनी शाळा परिसराचे निर्जंतुकीरण केले. मुख्याध्यापक गोरख देवढे यांनी प्रास्ताविक केले. सहशिक्षक शशिकांत पाटील यांनी आभार मानले.

टॅग्स :Nashikनाशिक