शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
4
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
5
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
6
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
7
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
8
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
9
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
10
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
11
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
12
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
13
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
14
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
15
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
16
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
17
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
18
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
19
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
20
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

सटाण्यात घरफोडी, अडीच लाखांचा ऐवज लंपास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 2, 2021 16:38 IST

सटाणा : शहरातील ६० फुटी रोडलगतच्या राजमाता जिजाऊ नगरमध्ये घरी कोणीही नसल्याचा फायदा घेऊन अज्ञात चोरट्यांनी घरफोडी करून घरातील सोन्याच्या वस्तू व दोन लाख पन्नास हजार रुपयांचा ऐवज लंपास केल्याची घटना गुरुवारी उघडकीस आली आहे.

सटाणा : शहरातील ६० फुटी रोडलगतच्या राजमाता जिजाऊ नगरमध्ये घरी कोणीही नसल्याचा फायदा घेऊन अज्ञात चोरट्यांनी घरफोडी करून घरातील सोन्याच्या वस्तू व दोन लाख पन्नास हजार रुपयांचा ऐवज लंपास केल्याची घटना गुरुवारी उघडकीस आली आहे. सटाणा पोलिसांत अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिसांनी पुढील तपास सुरू केला आहे. ६० फुटी रोडलगतच्या राजमाता जिजाऊ चौकातील काळू नानाजी नगरमधील राहत असलेले भरत रामलाल परदेशी कामानिमित्त देवळा तालुक्यातील लोहणेर येथे गेले असता घरी कोणी नसल्याचा फायदा घेऊन चोरट्यांनी चोरी केली असल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.  बुधवारी भरत परदेशी परिवाराला घेऊन लोहणेर येथे गेले असताना रात्रीच्या अंधारात फायदा घेत अज्ञात चोरट्यांनी घराचे कुलूप तोडून घरात प्रवेश करून कपाटात ठेवलेले तीन ग्रॅम सोन्याची अंगठी सात ग्रॅमचे मनीमंगळसूत्र, २ लाख २८ हजार रोख रक्कम असा २ लाख ७४ हजारांचा ऐवज लंपास केला आहे, तर बाजूच्या गल्लीत राहणारे इत्तेशाम शेख गुलाम अहमंद शेख यांच्या घराचे कुलूप तोडून घरात प्रवेश करून अज्ञात चोरट्यांनी २२ हजार रोख रक्कम लंपास केल्याची घटना घडली आहे. भरत परदेशी यांनी सटाणा पोलिसांत फिर्याद दिली असून, पोलीस निरीक्षक नंदकुमार गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक वर्षा जाधव तपास करीत आहेत. सटाणा शहरात चोऱ्यांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढू लागले आहे. काळू नानाजी नगर व परिसरात भुरट्या चोऱ्याही वाढू लागल्या आहेत. काळू नानाजी नगर व परिसर येथे दाट वस्ती आहे. पोलिसांनी गस्त वाढवावी व अज्ञात चोरट्यांचा लवकरात लवकर शोध घ्यावा, अशी मागणी होत आहे.

टॅग्स :Nashikनाशिक