शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
4
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
5
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
6
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
7
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
8
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
9
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
10
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
11
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
12
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
13
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
14
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
15
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
16
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
17
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
18
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
19
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
20
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

कर्जमाफीच्या प्रस्तावाची होळी

By admin | Updated: June 19, 2017 00:21 IST

शासनाकडून फसवणूक : शेतकऱ्यांना दिलासा नसल्याचा आरोप

लोकमत न्यूज नेटवर्कसायखेडा : फडणवीस सरकारच्या मंत्रिगटाचा तत्त्वत: निकषांच्या आधारावर सरसकट कर्जमाफीचा प्रस्ताव फसवा आणि शेतकऱ्यांना दिलासा देणारा नसल्याने शेतकरी वर्गात मोठा रोष निर्माण होत आहे. जर सुकाणू समितीने शासनाच्या अटी मान्य केल्या तर सुकाणू समितीला शेतकरी कदापि माफ करणार नाही, अशा प्रतिक्रिया शेतकऱ्यांमधून उमटत आहेत. सरसकट कर्जमाफी निर्णयाच्या निषेधचा भाग म्हणून निफाडच्या शेतकऱ्यांनी कर्जमाफीच्या प्रस्तावाच्या प्रतिची ग्रामपंचायत कार्यालयासमोर प्रतीकात्मक होळी केली. यावेळी मोठ्या संख्येने ग्रामस्थ हजर होते.शासनाकडून शेतकऱ्यांची फसवणूक केल्याने सुकाणू समितीने तो मान्य करू नये त्यासाठी जिल्ह्यात शेतकऱ्यांत जागृती करून पुन्हा एकदा आंदोलन उभे करण्याचा इशारा यावेळी शेतकऱ्यांनी दिला आहे.कर्जमाफीचे निकष म्हणजे भाकरीपेक्षा भोकरच जड अशा घोषणा यावेळी देण्यात आल्या. ग्रामीण भागात बहुतांश शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांची खातेफोड झालेली नसते. त्याच्याकडे ट्रॅक्टर तर असतोच. याशिवाय बाजार समितीत शेतमाल नेण्यासाठी कर्ज काढून जीप किंवा चारचाकी वाहन खरेदी अपरिहार्य आहे. हल्ली शहरात तर सर्वसाधारण व्यक्तीकडे वाहन असते. दुचाकीपेक्षा जुनी चारचाकी स्वस्त अन् प्रत्येक कोपऱ्यावर एजंटांनी त्याची दुकाने थाटलेली असतात. शेतीवर पोट भरत नाही म्हणून कोणी पानपट्टी गोळ्या बिस्किटांचे दुकान, पानटपरी काढली तर त्यालाही नोंदणी करावी लागते. उत्पन्न मात्र शंभर, दिडशे रुपयांवर नसते. त्यालाही कर्ज हवे तर बँका इन्कमटॅक्स रिटर्नची प्रत मागते, म्हणून युवक रिटर्न भरतात. आता हे सगळेच त्यांच्या मुळावर आले आहे. सरकारने शेतकऱ्यांना जाळ्यात अडकवले आहे. त्यांनी कर्जमाफी देण्याची नव्हे तर टाळण्याची घोषणा केली आहे. यामध्ये शेतकऱ्यांचा विश्वासघात असल्याच्या प्रतिक्र ीया या कार्यक्र मावेळी व्यक्त करण्यात आल्या.शेतकरी संपाविषयी नाशिकच्या तरुणांनी त्यात भाग घेऊन गावोगावी जाऊन शेतकऱ्यांचे प्रबोधन केले. मुख्यमंत्र्यांनी सुकाणू समितीच्या सदस्यांना हाताशी धरुन संप फोडल्यावरही त्याच्या सर्वाधिक तीव्र प्रतिक्रिया नाशिकमध्ये उमटून संप सुरुच ठेवण्याचा निर्धार करण्यात आला होता. सध्या नाशिकमध्ये सोशल मीडियावर कर्जमाफीविषयी तीव्र प्रतिक्रिया व्यक्त होत असून, अतिशय कठोर शब्दांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महसूलमंत्री चंद्रकांत पाटील आणि सरकारवर टीका होत आहे. आजच्या आंदोलनाने कर्जमाफीच्या घोषणेला नवे वळण मिळण्याची शक्यता असून, विविध राजकीय पक्षांकडूनही त्याचे समर्थन केले जात आहे.