पिंपळगावी वीजबिलांची होळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 4, 2020 10:38 PM2020-09-04T22:38:17+5:302020-09-05T01:01:38+5:30

महावितरण विभागाला वीजबिल माफ करा या संदर्भात लेखी निवेदन देऊनही कोणतीच दखल घेतली नसल्याने पिंपळगाव बसवंतसह परिसरातील ठिकठिकाणी वीजबिलाची होळी करत, वीजबिल माफ करा अन्यथा खुर्च्या खाली करा, अशा घोषणा देत आदिवासी शक्ती सेनेच्या वतीने आंदोलन करून महावितरण विभागाचा निषेध नोंदविण्यात आला.

Holi of Pimpalgaon electricity bills | पिंपळगावी वीजबिलांची होळी

वीजबिलाची होळी करताना आदिवासी शक्ती सेनेचे उत्तर महाराष्टÑप्रमुख प्रभाकर फसाळे, दत्तू झनकर, रामकृष्ण कंक, तानाजी पवार, दत्तू वागळे, खंडू सापटे, लक्ष्मण पावजी, सचिन रौंदळ आदींसह संघटनेचे पदाधिकारी.

Next
ठळक मुद्देआदिवासी शक्ती सेनेचे आंदोलन : वाढीव बिलांनी संताप




पिंपळगाव बसवंत : महावितरण विभागाला वीजबिल माफ करा या संदर्भात लेखी निवेदन देऊनही कोणतीच दखल घेतली नसल्याने पिंपळगाव बसवंतसह परिसरातील ठिकठिकाणी वीजबिलाची होळी करत, वीजबिल माफ करा अन्यथा खुर्च्या खाली करा, अशा घोषणा देत आदिवासी शक्ती सेनेच्या वतीने आंदोलन करून महावितरण विभागाचा निषेध नोंदविण्यात आला.
आदिवासी शक्ती सेनेच्या माध्यमातून पिंपळगाव, मुखेड, नारायण टेंभी व कारसूळ आदी ठिकाणी वीजबिल जाळून वीजबिल माफ करा अन्यथा खुर्च्या खाली करा अशी घोषणाबाजी करत आंदोलन करण्यात आले आहे.
यावेळी आदिवासी शक्ती सेनेचे उत्तर महाराष्टÑप्रमुख प्रभाकर फसाळे, माजी सरपंच व रामकृष्ण कंक, तालुकाध्यक्ष दत्तू झनकर, तानाजी पवार, दत्तू वागळे, खंडू साप्टे, लक्ष्मण पावजी, सचिन रौंदळ, सुनील वागळे, सुनील पवार, नामदेव चौधरी, अंबादास चौधरी, विशाल पवार, लखन कंक, सविता सताळे, शोभा सताळे, शरद गायकवाड, भाऊसाहेब नेहरे, सूरज
सूर्यवंशी, सागर शिंगाडे, युवराज चोथवे, हरी रोकडे, मनोज पवार, लक्ष्मण पवार, ऋषिकेश मोगल आदींसह शक्ती सेनेचे पदाधिकारी उपस्थित होते.

Web Title: Holi of Pimpalgaon electricity bills

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.