शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
3
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
4
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
5
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
6
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
7
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
8
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
9
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
10
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
11
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
12
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
13
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
14
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
15
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
16
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
17
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
18
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
19
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
20
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
Daily Top 2Weekly Top 5

होळी, पाडव्यासाठी हार-कडे बनविण्याची लगबग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 19, 2021 01:19 IST

सायखेडा : होळी आणि रंगोत्सव काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. त्यामुळे रंगाबरोबरच बाजारात साखरेच्या गाठी म्हणजे हार-कड्याचीही दुकाने सजू लागली आहेत. त्या पार्श्वभूमीवर हार-कडे बनविण्याची व्यावसायिकांची लगबग सुरू आहे.

ठळक मुद्देग्रामीण भागात उत्साह : व्यावसायिकांच्या तयारीला वेग

सायखेडा : होळी आणि रंगोत्सव काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. त्यामुळे रंगाबरोबरच बाजारात साखरेच्या गाठी म्हणजे हार-कड्याचीही दुकाने सजू लागली आहेत. त्या पार्श्वभूमीवर हार-कडे बनविण्याची व्यावसायिकांची लगबग सुरू आहे.होळी आणि गुढी पाडव्याची चाहूल लागली, की साखरेच्या गाठ्यांचे हार-कडे बाजारात पाहायला मिळतात. अनेक कुटुंबांमध्ये या गाठी निर्मितीचा व्यवसाय परंपरागतरीत्या चालत आला आहे. अशा परंपरेतूनच अनेक व्यावसायिक गेल्या महिनाभरापासून त्यासाठी कामाला लागले आहेत. या दिवसात साखरेच्या हार-कड्यांना मोठी मागणी असल्याने या कामाला शिवरात्रीपासूनच सुरुवात होते आणि गुढीपाडव्यापर्यंत कामाची लगबग सुरू राहते. पांढऱ्या शुभ्र आणि तितक्याच चविष्ट गाठी तयार करण्यासाठी अनेक कुटुंब परिसरात प्रसिद्ध आहेत. वडिलोपार्जित नव्हे तर गेल्या चार पिढ्यांचा हा उद्योग अनेकांनी आजही तितक्याच समर्थपणे यशस्वीरीत्या पुढे चालू ठेवला आहे. या साखरगाठीची रेसिपी साधारण वाटत असली तरी या मागे मोठी मेहनत घ्यावी लागते. त्यामुळे सर्व कुटुंब या दिवसात भल्या पहाटे उठून या कामाला लागतात. अनेक वर्षाच्या या पदार्थ परंपरेमुळे होळी आणि गुढीपाडव्याला आता अशा साखर गाठींना धार्मिक महत्त्व येत आहे. ग्रामीण भागात परंपरेने चालत आलेला हा उद्योग आजच्या मार्केटिंगच्या काळातही धडपडत का होईना शाबूत असल्याने काही कुटुंबाना वर्षातून एका महिन्याचा हा चांगला रोजगार उपलब्ध झाला आहे.इन्फो..अशी आहे रेसिपीसुरुवातीला एका कढईला उष्णता देऊन त्यात गरजेनुसार पाणी आणि साखर टाकली जाते. नंतर दूध टाकून ते अधिक शुभ्र आणि चवदार होईल याची काळजी घेतली जाते. पुढे हेच साखरेचे पाणी एका लाकडी साचात दोरे टाकून भरले जाते. काही वेळाने ते थंड झाले की हे लाकडी साचे वेगळे काढले जातात मग यातून तयार होतो तो साखरेचा पांढरा शुभ्र हार.फोटो- १८ पाडवा

 

टॅग्स :gudhi padwaगुढीपाडवाSocialसामाजिक