शहरं
Join us  
Trending Stories
1
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
2
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
3
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ११५ जण होरपळले, बचाव कार्य सुरू
4
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
5
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
6
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
7
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
8
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
9
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
10
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
11
वडील विनोद खन्ना यांच्यासोबत काम का करायचं नव्हतं? 'छावा' फेम अक्षय खन्नाने सांगितलेलं हैराण करणारं कारण
12
Airtel नं लाँच केला जबरदस्त प्लान; हाय स्पीड डेटासह मिळणार 'इतके' फायदे, जाणून घ्या
13
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!
14
सोड्याचीच 'हवा', पेप्सी-कोला 'फुस्स'! तब्बल १५०० कोटींची सोडा विक्री, 'या' ब्रँडने बाजी मारली!
15
दिल्ली-मुंबई महामार्गावर थरकाप उडवणारा अपघात; स्वच्छता कर्मचाऱ्यांना चिरडले, ६ ठार, ५ गंभीर जखमी
16
पाकिस्तानसाठी हेरगिरी, पुरवली गोपनीय माहिती; निशांत अगरवालच्या शिक्षेवरील निर्णय न्यायालयाने ठेवला राखून
17
Chaitra Amavasya 2025: चैत्र अमावस्येपासून दर अमावास्येला सुरू करा अग्निहोत्र; होतील अपार लाभ!
18
देशातील पहिला टेस्ला सायबर ट्रक गुजरातमध्ये पोहोचला, सुरतच्या हीरा व्यापाऱ्याची मोठी खरेदी, कोण आहे ती व्यक्ती?
19
“...तर भेटी घेण्यात काही गैर नाही”; शिंदेसेनेत प्रवेशाच्या चर्चा, चंद्रहार पाटील थेट बोलले
20
आयपीएलचा अर्धा हंगाम संपला, प्लेऑफसह ऑरेंज आणि पर्पल कॅपची शर्यतही झाली रंगतादार, कोण आघाडीवर? वाचा  

दसरा मेळावा शंभर लोकांत करा, अन्यथा शिवसेनेवर कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 18, 2020 17:40 IST

कोरोनाच्या पार्शभूमीवर शिवसेनेने शिवाजीपार्कवर केवळ शंभर लोकांच्या उपस्थितीत दसरा मेळावा साजरा करावा अन्यथा शिवसेनेला कारवाईला सामोरे जावे लागेल असा इशारा केंद्रीय सामाजिक व न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी नाशिकमध्ये रविवारी पत्रकार परिषदेत बोलताना दिला आहे.

ठळक मुद्दे शंभर लोकांच्या उपस्थितीत दसरा मेळावा साजरा करारामदास आठवले यांचा शिवसेनेला इशारा

नाशिक : कोरोनाच्या पार्शभूमीवर शिवसेनेने शिवाजीपार्कवर केवळ शंभर लोकांच्या उपस्थितीत दसरा मेळावा साजरा करावा अन्यथा शिवसेनेला कारवाईला सामोरे जावे लागेल असा इशारा केंद्रीय सामाजिक व न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी नाशिकमध्ये रविवारी पत्रकार परिषदेत बोलताना दिला आहे.

राज्यातील कोरोनाचा स्थिती पाहता यापूर्वी छत्रपती शिवाजी महाराज जयंती, डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती, बुद्धपौर्णिमा तथा गणेशोत्सव अतिशय साध्यापणाने साजरा करण्यात आला आहे. त्यानुसार शिवसेनेनेही शिवाजीपार्कवर झेंडे लावून शंभर लोकांच्या उपस्थितीत दसरा मेळावा साजरा करावा. अन्यथा काद्याचे उल्लंघन केल्याप्रकरणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनाच शिवसेनेवर कारवाई करावी लागेल असा चिमटाही त्यांनी काढला. यावेळी राज्यातील महाआघाडी सरकारला टिकेचे लक्ष करीत महाराष्ट्र एक नंबरवर पोहोचला आहे. परंतु मुख्यमंत्र्यांमुळे नव्हे, तर कोरोनामुळे असा टोला लगावला. राज्यातील सरकार सध्या तीन चाकांवर चालले असून असे सरकार दिर्घ काळ चालणार नसल्याचे भाकितही त्यांनी यावेळी केले. त्याचप्रमाणे राज्यात परतीच्या पावसाने थैमान घातले असून उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शेतकऱ्यांना मदतीसाठी केंद्राकडे १० हजार कोटींची मागणी केली आहे. परंतु, तत्काळ एवढी मदत शक्य नाही.त्यामुळे राज्य सरकारने कर्ज काढून शेतकऱ्यांना मदत करावी असा सल्लाही त्यांनी दिला. दरम्यान, मराठा मराठा समाजाचा ओबीसीत समावेश न करता स्वतंत्र आरक्षण मिळायला हवे अशीच आमची भूमिका असल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

मुख्यमंत्र्यांवर काँग्रेस राष्ट्रवादीचा दबाव

केंद्रीय मंत्रीमंडळाने मंदीरे खुली करण्यासंदर्भात निर्णय घेतला असून भाविकांच्या मागणीनुसार राज्यातील मंदीरेही खुली करण्याची गरज आहे. फिजिकल डिस्टन्सचे पालन करून मंदिरे उघडणे शक्य आहे. परंतु, मात्र मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर सत्तेत सहभागी असलेले काँग्रेस आणि राष्ट्रवादीचा दबाव असल्यानेच ते मंदीरे उघडण्याचा निर्णय घेत नसल्याचा आरोपही रामदास आठवले यांनी केला आहे.

ड्रग्स घेणाऱ्या अभिनेत्रींना टाळा

बॉलीवूडमधील चित्रपट निर्मात्यांनी ड्रग्स घेणाऱ्या अभिनेत्रींना काम देऊन नये, अन्यथा अशा निर्मात्यांचे चित्रपट प्रदर्शीत होऊ देणार नाही असा इशारा रामदास आठवले यांनी दिला आहे. त्याचप्रमाणे बॉलीवूड मुंबईतच राहणार असून ते इतरत्र हलविण्याचा कोणीही प्रयत्न करू नये असा इशाराही त्यांनी दिला आहे.

टॅग्स :PoliticsराजकारणRamdas Athawaleरामदास आठवलेShiv Senaशिवसेना