शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

हिरावाडीत बिबटयाचे दर्शन? नागरीकांत चर्चा: भीतीचे वातावरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 6, 2017 15:47 IST

नाशिक : कधी दिंडोरीरोडवरील जलविज्ञान प्रकल्प तर कधी मखमलाबाद, बोरगड, म्हसरूळ परिसरात संचार असलेल्या बिबटयाने काल मंगळवारी (दि. ५) रात्रीच्या सुमाराला हिरावाडीतील पाटाजवळ दर्शन दिल्याचे वृत्त पसरले आहे. हिरावाडीत बिबटया दिसल्याचे वृत्त पसरल्याने नागरीकांत भितीचे वातावरण पसरले असुन हिरावाडीतही बिबटयाचा संचार असल्याचे मेसेज सोशल मिडीयावर फिरत आहे.गेल्या महिन्यात तारवालानगर परिसरातील ...

नाशिक : कधी दिंडोरीरोडवरील जलविज्ञान प्रकल्प तर कधी मखमलाबाद, बोरगड, म्हसरूळ परिसरात संचार असलेल्या बिबटयाने काल मंगळवारी (दि. ५) रात्रीच्या सुमाराला हिरावाडीतील पाटाजवळ दर्शन दिल्याचे वृत्त पसरले आहे. हिरावाडीत बिबटया दिसल्याचे वृत्त पसरल्याने नागरीकांत भितीचे वातावरण पसरले असुन हिरावाडीतही बिबटयाचा संचार असल्याचे मेसेज सोशल मिडीयावर फिरत आहे.गेल्या महिन्यात तारवालानगर परिसरातील रस्त्यावर सायंकाळच्या सुमाराला काही नागरीकांनी बिबटयाला बघितले होते त्यानंतर मेरी येथिल जलविज्ञान प्रकल्पच्या आवारात बिबटयाच्या हल्लयात श्वानाचे पिल्लू ठार केल्याने व बिबटयाच्या पायांचे ठसे आढळल्याने बिबटयाचा संचार असल्याचे स्पष्ठ झाले होते त्यानंतर मखमलाबाद परिसरात बिबटया मुक्तपणे संचार करीत असल्याचे चित्रण कॅमेºयात कैद झाले होते. वनविभागाने देखिल दखल घेऊन परिसरातील काही ठिकाणी बिबटयाला जेरबंद करण्यासाठी पिंजरा लावला होता मात्र अद्याप पावेतो बिबटया जेरबंद झालेला नाही.काल रात्री साडेदहा ते पावणे अकरा वाजेच्या सुमाराला पाटकिनारी असलेल्या परिसरात काही नागरीकांना बिबटया दिसल्याचे वृत्त आहे मात्र नेमका बिबटया कुणाला दिसला याबाबत सखोल माहीती नाही. पाटकिनारी बिबटया फिरत असल्याचे मेसेज व्हॉटअ‍ॅपवर रात्री उशिरा पावेतो फिरत असल्याने नागरीकांनी एकमेकांना फोन करून खात्री क रण्याचे काम सुरू केले होते. परिसरात बिबटया फिरत असल्याने नागरीकांनी सतर्क राहावे असे मेसेज वाचून नागरीकांच्याही काळजाचा ठोका चुकत आहे. पाटकिनारी मागील परिसरात दाट झाडी असल्याने या परिसरात बिबटया मुक्तपणे रात्रीच्यावेळी संचार करण्याची शक्यता असल्याचे काही नागरीकांनी बोलून दाखविले आहे. हिरावाडीतील पाटकिनारी बिबटयाचे दर्शन घडल्याचे वृत्त पसरल्याने सध्या तरी हिरावाडीतील नागरीकांत काहीसे भितीचे वातावरण पसरले आहे.