शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

हिंगणे यांचा स्वराभिषेक !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 21, 2019 01:30 IST

शास्त्रीय संगीत ते भक्तिसंगीत अशा सुमधुर आणि प्रयोगशील स्वरांची मेजवानी सकाळच्या प्रसन्न काळी रसिकांना अनुभवण्यास मिळाली. निमित्त होते सूरविश्वास मैफलीत सुप्रसिद्ध गायक पं. मकरंद हिंगणे यांचे गायन. सूरविश्वासचे सहावे पुष्प त्यांनी गुंफले.

नाशिक : शास्त्रीय संगीत ते भक्तिसंगीत अशा सुमधुर आणि प्रयोगशील स्वरांची मेजवानी सकाळच्या प्रसन्न काळी रसिकांना अनुभवण्यास मिळाली. निमित्त होते सूरविश्वास मैफलीत सुप्रसिद्ध गायक पं. मकरंद हिंगणे यांचे गायन. सूरविश्वासचे सहावे पुष्प त्यांनी गुंफले.सावरकरनगर येथील विश्वास हब येथे हा कार्यक्र म संपन्न झाला. नव्या पिढीतील कलाकारांच्या आविष्काराला हक्काचे व्यासपीठ देण्यासाठी ‘सूर विश्वास’ हा अनोखा उपक्र म सुरू करण्यात आला आहे. मैफलीची सुरुवात आज बधाई बाजे... घनश्याम कृष्णाच्या जन्मानंतर गोकुळात श्रावण मेघांनी आच्छादित वातावरणात जणू सूर्योदय झाला. नंद यशोदेचे सगळे अभिनंदन करू लागले. हा हर्षोल्लास सालगवराली रागाच्या स्वरांनी श्रोत्यांसमोर साकारला. काहीशा अनवट दक्षिण भारतीय संगीतातील या रागानंतर ‘दरस बिन सुनो’ ही बंदिश सादर केली आणि वातावरणात स्वरांनी रिमझिमच जणू सुरू झाली. त्यानंतर ‘रंध्रात पेरिली मी आषाढ दर्द गाणी’ हे पं.जितेंद्र अभिषेकी यांनी गायलेली प्रसिद्ध स्वरचना सादर केली. त्यानंतरच्या ‘आम्हा न कळे ज्ञान’ या चोखोबांच्या रचनेने आणि ‘अवघे गरजे पंढरपूर’ या भक्तिगीताने सभागृह भक्तिमय झाले. कार्यक्रमात संवादिनीवर आनंद अत्रे, तबल्यावर नितीन पवार, सुखदा बेहेरे, केतन इनामदार, अजिंक्य जोशी, शुभंकर हिंगणे, अमोल पाळेकर यांनी साथसंगत केली. कार्यक्र माचे सूत्रसंचालन डॉ. स्मिता मालपुरे यांनी केले. कुसुमाग्रज प्रतिष्ठानवर विश्वस्तपदी निवड झाल्याबद्दल अ‍ॅड. अजय निकम यांचा सन्मान विश्वास ठाकूर यांनी केला. आभार प्रदर्शन विनायक रानडे यांनी केले.

टॅग्स :Nashikनाशिकcultureसांस्कृतिक