शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

महाबळेश्वरप्रमाणे इगतपुरीला होणार हिलस्टेशन : छगन भुजबळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 30, 2020 20:13 IST

राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यभरातील विकासकामांचा आढावा घेण्यासाठी जिल्हावार आढावा बैठका घेण्याचा कार्यक्रम सुचवला आहे. त्यातून वेगवेगळ्या जिल्ह्यांचे काय प्रश्न आहे त्यावर चर्चा होणार

ठळक मुद्दे नाशिक विमानसेवेबाबत काही अडचणी आहेत त्यावरदेखील चर्चा केली जाईल. जिल्हा वार्षिक योजनेतून निधी मिळाला नाही तर पर्यटन विभागाकडून निधी घेऊ

लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : लोणावळा-खंडाळा, महाबळेश्वरप्रमाणे इगतपुरीला हिलस्टेशन व्हावे यासाठी अभ्यास सुरू असून, त्यासाठी जिल्हा वार्षिक योजनेतून २० कोटींची मागणी करण्यात आली आहे. जिल्हा वार्षिक योजनेतून निधी मिळाला नाही तर पर्यटन विभागाकडून निधी घेऊ, अशी माहिती राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षणमंत्री तथा नाशिकचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी दिली.

नाशिक येथे पत्रकारांशी संवाद साधताना ते म्हणाले की, राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यभरातील विकासकामांचा आढावा घेण्यासाठी जिल्हावार आढावा बैठका घेण्याचा कार्यक्रम सुचवला आहे. त्यातून वेगवेगळ्या जिल्ह्यांचे काय प्रश्न आहे त्यावर चर्चा होणार आहे. त्यामध्ये घरकुल, रखडलेले जलसिंचन, वीजपुरवठा प्रलंबित प्रश्नांवर आढावा, मुख्यमंत्री ग्रामीण पेयजल आढावा, पंतप्रधान घरकुल योजना, आदिवासी विकास योजनांबाबत आढावा यासह विविध प्रश्नांचा आढावा घेण्यात येणार आहे. आघाडी सरकारच्या काळात माजी खासदार समीर भुजबळ व माझ्या काळात तयार झालेले अनेक प्रकल्प गेल्या पाच वर्षांत रखडलेले आहे. त्यात प्रामुख्याने कलाग्राम, बोटक्लब, रिसॉर्ट, टुरिझम हब, वेलनेस हब, ट्रेकिंग युनिट, पर्यटनाची आणि उपयोगी असलेली काही कामे आणि अपूर्ण असलेले काम आहेत त्यावर निश्चितपणे या बैठकीत घेण्यात येणार असून, नाशिक विमानसेवेबाबत काही अडचणी आहेत त्यावरदेखील चर्चा केली जाईल.महाविकास आघाडीबाबत बोलताना भुजबळ म्हणाले, शरद पवार, संजय राऊत, उद्धव ठाकरे अर्थातच काँग्रेसच्या नेत्यांनी हे सरकार स्थापन केले आहे. त्यामुळे इतिहासात काही गोष्टी आहेत. मात्र त्या गोष्टी बाजूला ठेवून सरकारने काम करायला हवे. सरकारी पक्ष अडचणीत येणार नाही, याची सर्वांनी काळजी घेणे गरजेचे असून, सतत काहीतरी बोलणे चांगले लक्षण नाही, दुसरेही पक्ष आहेत असे समजूनच वक्तव्य करणे महत्त्वाचे असून, काय बोलावे व काय नाही यासाठी प्रसंगी आपण सर्व पक्षीय नेत्यांशी चर्चा करू, असेही त्यांनी सांगितले.

टॅग्स :PoliticsराजकारणNashikनाशिकChagan Bhujbalछगन भुजबळ