शहरं
Join us  
Trending Stories
1
' भारतीय अपमान सहन करीत नाहीत, अमेरिकेच्या दबावापुढे भारत कधीच झुकणार नाही' : पुतिन
2
आजचे राशीभविष्य- ४ ऑक्टोबर २०२५: पैशांच्या गुंतवणुकीवर लक्ष द्या, कमी वेळात जास्त लाभ घेण्याची लालसा सोडा
3
...तर पाकिस्तान जागतिक नकाशावर दिसणार नाही! भारतीय लष्करप्रमुखांनी खडसावले 
4
अमेरिकी रस्त्यावर भारतीय बाइक्सने अभिमान वाटतो; राहुल यांनी अमेरिकेत केला भारतीय कंपन्यांचा गौरव
5
लेह हिंसाचार : सोनम वांगचुक यांना अटक; न्याय मागण्यासाठी पत्नी कोर्टात
6
‘बाबा’ विद्यार्थिनींना रात्री खोलीत येण्यास भाग पाडायचा; मिळाली १४ दिवस कोठडी
7
आता सौरऊर्जेवर चालणारी ई-बुलेट आली; ऊर्जाबचत, प्रदूषण नियंत्रणासाठी मोठा फायदा
8
नवी मुंबई विमानतळास दि. बा. पाटील यांचेच नाव; नामकरणासाठी पंतप्रधान मोदी सकारात्मक : मुख्यमंत्री 
9
अमेरिकेच्या टॅरिफ संकटात भारतासह युरोपियन देशांची भूमिका मोलाची; स्वेन ओस्टबर्ग यांचे मत
10
संपादकीय : आता खरी लढाई! मेळावे झाले, घोषणा झाल्या... आता सीमोल्लंघन कधी?
11
पाणंद रस्ते मोकळे करा,  तरच मिळेल सरकारी लाभ; प्रस्ताव विचाराधीन
12
सोमवारपासून परतीच्या सरी; चक्रीवादळ 'शक्ती'मुळे महाराष्ट्रात पुन्हा पाऊस? हवामान खात्याचा नेमका अंदाज काय?
13
डोनाल्ड ट्रम्प आता सिनेमावाल्यांवर का भडकले?
14
मनोज जरांगेंचा १९९४ च्या जी. आर. विरोधात एल्गार! 'या' दोन मोठ्या जातींच्या आरक्षणावर बोलले
15
पाकिस्तानवर हसावं की रडावं.... आता म्हणे मोहसीन नक्वीला गोल्ड मेडल देणार, सन्मान करणार !
16
लाखोंच्या गर्दीत हरवलेला 'मुन्ना' काही मिनिटांत 'अण्णा'च्या गळ्यात; बापलेकांची भावनिक भेट
17
सानिया मिर्झाशी घटस्फोट, आता शोएब मलिकचे सना जावेदशीही लग्न तुटणार? VIDEO मुळे उडाली खळबळ
18
ट्रॅक्टरमध्ये बसून थेट बांधावर... सोलापूरच्या अधिकाऱ्यांची तत्परता, शेतकऱ्यांना दिला धीर
19
'फिट' है तो 'हिट' है... बॉलिवूड अभिनेत्रीचा कमालीचा फिटनेस, या वयातही चाहत्यांना करते घायाळ
20
वेळागर समुद्रात आठजण बुडाले; तिघांचे मृतदेह हाती, एकीचा जीव वाचला, किनाऱ्यावर आक्रोश

भाडेतत्त्वावरील वाहनांचा अपहार करणारे गजाआड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 20, 2019 01:15 IST

वाहने भाडेतत्त्वावर घेत करारनामा करून विश्वास संपादन करत घेतलेली वाहने परस्पर गहाण ठेवून रोख रक्कम मिळवून वाहनांचा अपहार करणाऱ्या टोळीचा गुन्हे शाखा युनिट-१च्या पथक ाने तीन वर्षांपूर्वीच पर्दाफाश केला होता. या गुन्ह्यात फरार असलेल्या दोघा उपएजंटांच्या मुसक्या बांधण्यास पथकाला यश आले आहे. त्यांच्याकडून गहाण ठेवलेली सुमारे ५ वाहने जप्त करण्यात आली आहे.

ठळक मुद्देगुन्हे शाखा : २९ लाखांच्या पाच चारचाकी जप्त

नाशिक : वाहने भाडेतत्त्वावर घेत करारनामा करून विश्वास संपादन करत घेतलेली वाहने परस्पर गहाण ठेवून रोख रक्कम मिळवून वाहनांचा अपहार करणाऱ्या टोळीचा गुन्हे शाखा युनिट-१च्या पथक ाने तीन वर्षांपूर्वीच पर्दाफाश केला होता. या गुन्ह्यात फरार असलेल्या दोघा उपएजंटांच्या मुसक्या बांधण्यास पथकाला यश आले आहे. त्यांच्याकडून गहाण ठेवलेली सुमारे ५ वाहने जप्त करण्यात आली आहे.याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, गेल्या तीन वर्षांपासून अशोकामार्ग पखालरोड भागात राहणारे संशयित इसम आवेश जिलानी कोकणी व फरहाण जिलानी कोकणी यांनी बनावट टुर्स-ट्रॅव्हल्सचे क ार्यालय असल्याचे सांगून लोकांकडून भाडेतत्त्वावर वाहने घेत त्याचा करारनामा करत परस्पर उपएजंटाद्वारे मोठ्या प्रमाणात रक्कम घेऊन गहाण ठेवत मूळ मालकाला वाहने परत न करता अपहार के ल्याप्रकरणी पोलिसांनी त्यांना यापूर्वीच अटक केली आहे. त्यांनी मूळ मालकासोबत वाहनाचे दरमहा भाडे ठरवून ती वाहने नाशिकमधील उपएजंट सॅमसन प्रवीण पारखे याच्याकडून मोठी रक्कम घेत गहाण ठेवल्या.पोलिसांनी एकूण ५ वाहने हस्तगत केली आहे. तसेच कोकणी जोडगोळीकडून २०१७ साली सुमारे १२ चारचाकी वाहने हस्तगत करून मूळमालकांना परत केले आहेत.पारखे याने गहाण ठेवलेली वाहने धुळे येथील संशयित भूषण सुर्वे याच्यामार्फत त्याच्या ओळखीच्या लोकांना देत त्यांच्याकडून मोठी रोख रक्कम घेतल्याचे तपासात पुढे आले. या गुन्ह्याचा तपास करत गुन्हे शाखा युनिट-१च्या पथकाने संशयित भुºया उर्फ भूषण राजेंद्र सुर्वे (रा. जुने धुळे), जेलरोडवर राहणारा त्याचा साथीदारा पारखे यास अटक केली. त्यांची कसून चौकशी केली असता त्यांनी गहाण स्वरूपात ठेवलेल्या विविध कंपन्यांच्या सुमारे २८ लाख ९० हजार रुपये किमतीच्या चारचाकी वाहने दडवून ठेवल्याची कबुली दिली.

टॅग्स :nashik police commissioner officeनाशिक पोलीस आयुक्तालयArrestअटक