शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

गणनेत पंचवटी, सिडकोत सर्वाधिक वृक्षसंख्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 1, 2018 01:22 IST

नाशिक : महापालिकेने केलेल्या वृक्षगणनेत आतापर्यंत ४७ लाख ९५ हजार वृक्षसंपदा आढळून आली असून, पंचवटी व सिडको विभागांत सर्वाधिक वृक्षसंख्या असल्याचे समोर आले आहे.

ठळक मुद्देसरकारी जागांवर २७ लाख १० हजार वृक्षसंख्याप्रक्रिया खासगी एजन्सीमार्फत राबविली जात आहे

नाशिक : महापालिकेने केलेल्या वृक्षगणनेत आतापर्यंत ४७ लाख ९५ हजार वृक्षसंपदा आढळून आली असून, पंचवटी व सिडको विभागांत सर्वाधिक वृक्षसंख्या असल्याचे समोर आले आहे. विशेष म्हणजे दरवर्षी महापालिका, सामाजिक वनीकरण विभाग तसेच वनखात्याकडून मोठ्या संख्येने वृक्षलागवडीचा कार्यक्रम हाती घेतला जात असताना, सरकारी जागांवर २७ लाख १० हजार वृक्षसंख्या आढळून आली आहे, तर खासगी व इतर जागेवर नागरिकांच्या सहभागातून २० लाख ८४ हजार वृक्ष आढळून आले आहेत.महापालिकेमार्फत न्यायालयाच्या निर्देशानुसार वृक्षगणनेची प्रक्रिया एका खासगी एजन्सीमार्फत राबविली जात आहे. आतापर्यंत शहरात ४७ लाख ९५ हजार ३८७ वृक्ष आढळून आले आहेत. अद्याप आर्टिलरी सेंटर व महाराष्टÑ पोलीस अकादमी या भागातील वृक्षगणनेचे काम शिल्लक आहे.वृक्षगणनेत सर्वाधिक १७ लाख ५२ हजार १७७ वृक्षसंख्या ही एकट्या पंचवटी विभागात आढळून आली आहे. त्यामुळे पंचवटी खऱ्या अर्थाने आजच्या युगातही दंडकारण्याचा भाग असल्याचे समोर आले आहे. त्याखालोखाल सिडको विभागात १५ लाख ८५ हजार ६१८ वृक्षसंख्या आढळून आली आहे. नाशिक पश्चिम व नाशिक पूर्वविभाग हा दाट लोकवस्तीचा असल्याने याठिकाणी वृक्षांचे प्रमाण दीड टक्क्यापेक्षाही कमी आहे.दरम्यान, महापालिका, सामाजिक वनीकरण विभागामार्फत दरवर्षी पावसाळ्यात मोठ्या प्रमाणावर वृक्षलागवडीचा कार्यक्रम राबविला जातो. त्यावर कोट्यवधीचा खर्च होतो. याशिवाय, गेल्या तीन वर्षांपासून राज्य शासनाच्या वन विभागामार्फत वृक्षलागवडीचा जम्बो कार्यक्रम राबविण्यात येत आहे. असे असतानाही सरकारी जागेतील वृक्षसंख्या २७ लाख १० हजारांच्या आसपास आढळून आलेली आहे, तर खासगी व इतर जागेत नागरिक सहभागातून लागवड केलेली २० लाख ८४ हजार वृक्षसंख्या निदर्शनास आलेली आहे. त्यामुळे, सरकारी वृक्षलागवडीवर एकूणच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.