शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
6
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
7
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
8
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
9
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
10
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
11
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
12
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
13
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
14
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
15
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
16
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
17
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
18
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
19
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हा रुग्णालयात सर्वाधिक प्रसूती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 18, 2018 00:41 IST

राज्याच्या सार्वजनिक आरोग्य विभागांतर्गत असलेल्या जिल्हा रुग्णालयांमध्ये प्रसूतीची सर्वाधिक संख्या ही नाशिक जिल्हा रुग्णालयाची ठरली आहे़

नाशिक : राज्याच्या सार्वजनिक आरोग्य विभागांतर्गत असलेल्या जिल्हा रुग्णालयांमध्ये प्रसूतीची सर्वाधिक संख्या ही नाशिक जिल्हा रुग्णालयाची ठरली आहे़ गत वर्षभरात जिल्हा रुग्णालयात ६ हजार २९६ महिलांची प्रसूती करण्यात आली असून, यामध्ये २ हजार ४२९ गुंतागुंतीच्या शस्त्रक्रियांचाही समावेश आहे़ केवळ जिल्ह्यातीलच नव्हे तर आजूबाजूच्या जिल्ह्यातील महिलाही प्रसूतीसाठी नाशिक जिल्हा रुग्णालयास प्राधान्य देत आहेत़ राज्यातील सर्व जिल्हा रुग्णालयांमध्ये नाशिक जिल्हा रुग्णालयात सर्वाधिक प्रसूतीची नोंद असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्स डॉ़ सुरेश जगदाळे यांनी दिली आहे़  दिवसेंदिवस आरोग्याच्या सुविधा महाग होत चालल्या असून, त्यावरील खर्च हा गरीब व सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर गेला आहे़ खासगी दवाखान्यात प्रसूती, उपचार वा प्रसंगी सिझेरियन करावे लागल्यास हजारो रुपये खर्च येतो़ मात्र, याच सोयीसुविधा जिल्हा रुग्णालयातही मिळत असल्याने महिलांकडून प्राधान्य दिले जाते़ केवळ नाशिक जिल्ह्यातीलच नव्हे तर महापालिका हद्दीसह आजूबाजूच्या जिल्ह्यातील महिलाही जिल्हा रुग्णालयात येतात़ जिल्हा रुग्णालयातील तज्ज्ञ डॉक्टर्स व प्रशिक्षित नर्स व कर्मचारी यामुळे नॉर्मल प्रसूती होण्याचे प्रमाण अधिक आहे़  प्रसूतीसाठी आलेल्या महिलेस वेळीच सुविधा न मिळाल्यास आई व बाळ अशा दोघांच्याही जिवास धोका निर्माण होण्याची शक्यता असते़ नाशिक जिल्हा रुग्णालयात डिसेंबर २०१७ ते नोव्हेंबर २०१८ या कालावधीत तीन हजार ८६७ नॉर्मल प्रसूती तर दोन हजार ४२९ महिलांची शस्त्रक्रियेद्वारे प्रसूती करण्यात आली आहे़गरोदर मातांना आधारकेवळ नाशिक जिल्ह्यातूनच नव्हे, तर पालघर तसेच ठाणे जिल्ह्यातूनही गर्भवती महिला मोठ्या संख्येने येतात़ रुग्णालयात नॉर्मल डिलिव्हरीचे प्रमाण ९० टक्के, तर सिझेरियनचे प्रमाण अवघे १० टक्के आहे़ जिल्हा रुग्णालयातील तज्ज्ञ डॉक्टर व प्रशिक्षित स्टाफमुळे या ठिकाणी सुरक्षित प्रसूती केली जाते़ सार्वजनिक आरोग्य विभाग अंतर्गत राज्यातील सर्व जिल्हा रुग्णालयांमध्ये नाशिक जिल्हा रुग्णालयात सर्वाधिक प्रसूती झाल्या आहेत़  - डॉ़ सुरेश जगदाळे, जिल्हा शल्य चिकित्सक, नाशिक

टॅग्स :Womenमहिलाhospitalहॉस्पिटलNashikनाशिक