शहरं
Join us  
Trending Stories
1
'ऑपरेशन सिंधू' केवळ भारतीयच नव्हे, 'या' देशाच्या विद्यार्थ्यांनाही इराणमधून सुखरूप बाहेर आणणार!
2
शशी थरूर भाजपात जाणार का? काँग्रेस २३ जूनला मोठा निर्णय घेणार
3
"माझ्या भांगेत कुंकू भर..." आत्महत्येआधी तिने चिठ्ठीत लिहिलं होते; नैराश्यामागचे कारण काय?
4
शाहरुख खानच्या मन्नतवर बीएमसीची कारवाई! नूतनीकरणाच्या नियमांचं उल्लंघन केल्याचा आरोप
5
जिओ, एअरटेलची तयारी! दर दिवसाच्या हिशेबा सारखाच दर तासाला डेटा मिळणार...; रिचार्ज मात्र...
6
Ashadhi Wari 2025: दिंडीतून जाताना वारकरी महिला डोईवर तुळशी वृंदावन नेतात; पण का? वाचा!
7
"देवेंद्रजीसुद्धा योगीच, ते कसरत नाही पण..', अमृता फडणवीस यांचं विधान
8
"माझे ९ लाख रुपये निर्मात्यांनी दिलेले नाहीत", 'मन उडू उडू झालं' फेम अभिनेत्याची व्यथा, म्हणाला- "मी इंजिनियर असूनही..."
9
उप कर्णधार रिषभ पंतचा मोठा पराक्रम! शतकी खेळीसह मोडला MS धोनीचा विक्रम! सेलिब्रेशनही एकदम झक्कास
10
Tejasvi Ghosalkar: "उद्धव ठाकरे माझे कुटुंबप्रमुख, मी अजूनही...", बँकेचं संचालकपद मिळाल्यानंतर तेजस्वी घोसाळकरांचं स्पष्टीकरण
11
"इराणचा विजय होवो, त्यांनी इस्राइलला…’’, केंद्रातील सत्ताधारी भाजपाच्या मित्रपक्षाने इराणला दिला पाठिंबा   
12
टीव्ही कपल लता सबरवाल-संजीव सेठ यांचा घटस्फोट, लग्नानंतर १५ वर्षांनी मोडला संसार
13
इराण युद्धात इस्त्रायलला खूप मोठा झटका; जिनपिंग-पुतिन यांच्या निर्णयाने ट्रम्पही चिंतेत
14
राज कुशवाहाकडून कळले सोनमचे सगळे 'राज'! ५ लाखांची रोकड आणि बंदुकीचाही झाला खुलासा
15
याला म्हणतात प्रामाणिकपणा...! व्यापाऱ्याचे रिक्षात लाखो रुपये विसरले, रिक्षाचालकानं सर्व परत नेऊन दिले; रक्कम जाणून थक्क व्हाल!
16
ICICI ला HDFC चं अधिग्रहण करायचं होतं, चंदा कोचर यांच्यासमोर दीपक पारेखांनी उघडलं गुपित
17
"प्रगत राज्यातील मुलांना मागासलेल्या राज्यांची भाषा...", हिंदी भाषा सक्तीवरुन गार्गी फुले थेटच बोलल्या
18
विमान अपघातानंतर ९ दिवसांनी दीपक पाठक यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार
19
तेरी दिवानी...! शुबमन गिलच्या सेंच्युरीनंतर फॅन गर्लचा तो खास व्हिडिओ व्हायरल
20
पत्नीची हत्या करून मृतदेह घराबाहेर पुरला, पोलीस आणि नातेवाईकांना असा दिला चकवा, दोन महिने सांगायचा...  

कृत्रिम बुद्धिमत्तेचा अति वापर भविष्यात सर्वांना हानिकारक : संजय ढोले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 26, 2018 18:20 IST

कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर वाढल्याने माणसाची स्वत: विचार करण्याची क्षमता कमी होत चालली आहे व ते भविष्यात सर्वांसाठी हानिकारक ठरणार असल्याचे मत पुणे विद्यापीठातील भौतिकशास्त्र विभागातील प्राध्यापक व संशोधक डॉ. संजय ढोले यांनी व्यक्त केले.

चांदवड : कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर वाढल्याने माणसाची स्वत: विचार करण्याची क्षमता कमी होत चालली आहे व ते भविष्यात सर्वांसाठी हानिकारक ठरणार असल्याचे मत पुणे विद्यापीठातील भौतिकशास्त्र विभागातील प्राध्यापक व संशोधक डॉ. संजय ढोले यांनी व्यक्त केले. येथील श्री. नेमिनाथ जैन संचलित कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय चांदवड येथे विज्ञान मंडळाच्या उद्घाटनप्रसंगी डॉ. संजय ढोले यांचे व्याख्यान झाले. अध्यक्षस्थानी उपप्राचार्य डॉ. दत्ता शिंपी होते.डॉ. ढोले यांनी विज्ञानाचे महत्त्व विशद करताना सांगितले की, पुणे विद्यापीठाने ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन वाढावा यासाठी स्वयंचलित वैज्ञानिक जनजागृती अभियान राबविले आहे. यामध्ये विद्यापीठातील प्राध्यापक व विद्यार्थी ग्रामीण आदिवासी भागातील शाळांपर्यंत पोहोचतात व विद्यार्थ्यांसमोर विविध प्रयोग सादर करून त्यांच्यामध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन वाढवितात. त्याचबरोबर सापेक्षता वाद, कृष्ण विवरे, हिग्ज बोसॉन, सॉयो नवग्रह या विविध गोष्टींची त्यांनी माहिती दिली. विज्ञान मंडळाचे अध्यक्ष डॉ. मनोज पाटील यांनी प्रास्ताविक केले. प्रा. अनिल गिते यांनी डॉ. संजय ढोले यांचा परिचय करून दिला. यावेळी उपप्राचार्य डॉ. सुरेश पाटील यांनी मार्गदर्शन केले. प्रा. मयूर पाटील यांनी सूत्रसंचालन केले. प्रा. स्वप्निल वाघ यांनी आभार मानले. कार्यक्रमास उपप्राचार्य संजय खैरनार, डॉ .अरविंद पाटील, डॉ.तुषार साळवे, प्रा. चैतन्य कुंभार्डे, प्रा. मधुकर झांजे, डॉ. सुदीन दळवे व विज्ञान विभागातील प्राध्यापक व विद्यार्थी उपस्थित होते.

टॅग्स :scienceविज्ञानcultureसांस्कृतिक