शहरं
Join us  
Trending Stories
1
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
4
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
5
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
6
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
7
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
8
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
9
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
10
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
11
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
12
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
13
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
14
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
15
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
16
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
17
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
18
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
19
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
20
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
Daily Top 2Weekly Top 5

सुधारित नियमावलीच्या माध्यमातून छुपी भाडेवाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 24, 2018 00:09 IST

महापालिकेच्या वतीने महाकवी कालिदास कलामंदिराच्या दरात केलेली अल्पशी कपात म्हणजे हास्यास्पद प्रकार असून, सुधारित नियमावलीतही छुपी भाडेवाढ दिसून येत आहे. कलावंत व नाट्यप्रेमी दोघांनाही याचा फटका सहन करावा लागत आहे.

नाशिक : महापालिकेच्या वतीने महाकवी कालिदास कलामंदिराच्या दरात केलेली अल्पशी कपात म्हणजे हास्यास्पद प्रकार असून, सुधारित नियमावलीतही छुपी भाडेवाढ दिसून येत आहे. कलावंत व नाट्यप्रेमी दोघांनाही याचा फटका सहन करावा लागत आहे. नियमावलीस मान्यता मिळाल्यास प्रशासनाविरुद्ध रंगकर्मी, आयोजक असा सामना पुन्हा पहावयास मिळू शकतो.  महापालिकेच्या वतीने स्मार्ट सिटी अंतर्गत कालिदास कलामंदिराचे नूतनीकरण करून चौपट आणि पाचपट भाडे वाढविल्याने रंगकर्मींमध्ये आधीच तीव्र नाराजी व्यक्त करण्यात येत होती. त्यातच सभापती हिमगौरी आडके यांनी रंगकर्मींना दिलासा देऊ असे जाहीर केले असले तरी यापूर्वी स्थायी समितीने फार दिलासा दिला नव्हता. दोन महिन्यांपासून याबाबत चर्चा, निवेदने यांचे गुºहाळ चालू आहे. प्रशासनाने पुढील पंधरा वर्षं देखभाल दुरुस्तीच्या खर्चाची तरतूद करण्यासाठी तब्बल पाच ते सहापट दरवाढ करण्याचा निर्णय घेतल्याने कलावंत व प्रशासन भिडले होते. स्थायी समिती सभापती हिमगौरी आडके यांनी भाडेवाढीत अल्पशी कपात करून विषयावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला; पण याद्वारे रंगकर्मी व रसिकांच्या तोंडाला पाने पुसण्यासारखे केले असल्याची भावना रंगकर्मी व नाट्य परिषद सदस्यांनी व्यक्त केली आहे. आता मिळकत विभागाने कालिदासची सुधारित नियमावली अवलोकनार्थ सादर केली आहे. त्यातून पुन्हा एकदा भाडेवाढीचा सामना करावा लागणार आहे. सुधारित नियमावलीनुसार १५ दिवस अगोदर कार्यक्रम रद्द झाल्यास अनामत रक्कम मिळणार नाही. कार्यक्रम आरक्षित झाल्यानंतर काही कारणास्तव कार्यक्रम रद्द झाला तरी अनामत रक्कम दिली जाणार नाही. कार्यक्रमाच्या परस्पर हस्तांतरणालादेखील नव्या नियमावलीत विरोध करण्यात आला असून, कार्यक्रमाचे हस्तांतरण झाल्यास आता एक हजार ऐवजी २५ हजारांचा दंड आकारला जाणार आहे.  आता तारीख आरक्षित करण्यासाठी प्रथम अनामत रक्कम व भाडे अदा करावे लागणार आहे. कालिदास कलामंदिर व महात्मा फुले कलादालनात आयोजकांकडून अस्वच्छता आढळल्यास दोन हजार रुपये दंड आकारण्यात येणार आहे. याशिवाय पाचशे वॅट लाइटसाठी पन्नासऐवजी शंभर रुपये आकारण्याचा प्रस्ताव आहे. इलेक्ट्रिक कामासाठी प्रति प्लग ५० रुपये, रेकॉर्डिंगसाठी प्रति कॅसेटला ५०० रुपये, अतिमहत्त्वाच्या व्यक्तींच्या कक्षासाठी ५०० रुपये, अति महत्त्वाच्या व्यक्तींच्या कक्षासाठी १०५० रुपये, प्रेक्षागृहातील जाहिरात फलकांवर प्रतिदिन ११० रुपये, व्यावसायिक जाहिरातींसाठी स्वतंत्र कर, कार्यक्रम संपल्यावर ताबा देण्यास उशीर केल्यास दर अर्ध्या तासाला १ हजार रुपयांप्रमाणे दंड भरावा लागणार आहे. मुळात कालिदासचे दर पूर्वीप्रमाणेच ठेवावेत, त्यात वाढ करू नये अशी मागणी नाट्य परिषद व रंगकर्मींनी वारंवार मांडली आहे. त्यासाठी निरनिराळ्या माध्यमातून लढाही दिला; मात्र थोडीशी भाडेवाढ कमी करत रडत्याचे डोळे पुसण्यासारखे केले. आताही नियमावलीद्वारे छुपी दरवाढ करण्याचा घाट दिसतो आहे. याबाबत आधी कुणालाच कल्पना दिलेली नाही. अचानक नियमावली समोर आली आहे. कुठलाच रंगकर्मी ती मान्य करणार नाही.- प्रा. रवींद्र कदम, अध्यक्ष, नाट्य परिषद, नाशिक शाखा.

टॅग्स :Nashik municipal corporationनाशिक महानगर पालिकाartकला