शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
4
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
5
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
6
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
7
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
8
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
9
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
10
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
11
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
12
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
13
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
14
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
15
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
16
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
17
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
18
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
19
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

नदीपात्राचा संकोच कायम; अतिक्रमणे ‘जैसे थे’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 22, 2020 23:50 IST

नाशिक : गोदावरी नदीच्या काठावर वसलेल्या शहराला पुराचा धोका नव्हता असेनाही, परंतु गेल्या काही वर्षात गोदावरी अन्य तीन नद्यांच्या काठावर मोठ्या प्रमाणात बांधकामे करून नदीपात्र संकुचित करण्यात आले आहेत.

नाशिक : गोदावरी नदीच्या काठावर वसलेल्या शहराला पुराचा धोका नव्हता असेनाही, परंतु गेल्या काही वर्षात गोदावरी अन्य तीन नद्यांच्या काठावर मोठ्या प्रमाणात बांधकामे करून नदीपात्र संकुचित करण्यात आले आहेत. २००८नंतर हा प्रश्न प्रामुख्याने आढळला असला तरी बांधकामांवर कारवाई मात्र झालेली नाही. इतकेच नव्हे तर सुधारित पूररेषेत महापालिकेने केलेली बांधकामे जैसे थे आहेत. गोदावरी, नासर्डी, वाघाडी आणि वालदेवी या तीन प्रमुख नद्यांची अवस्था दिवसेंदिवस बिकट होत चालली आहे. नदीपात्राचा अतिक्रमणांमुळे संकोच होत असतानादेखील पाटबंधारे खात्याचा ना हरकत दाखला मिळाला म्हणून नदीकाठावर सर्रास बांधकामे करण्यास परवानग्या देण्यात आल्या. २००८ मध्ये शहरातील सर्वच नद्यांना महापूर आल्यानंतर नदीपात्रालगत बांधकामे झालीच कशी याचाशोध घेताना अनेक बाबी उघड झाल्या होत्या. १९९३-९५ दरम्यान, महापालिकेचा पहिला शहर विकास आराखडा मंजूर करण्यात आला. त्यावेळी सुरुवातीला प्रारूप आराखड्यात गोदावरी नदीलगत असलेली बफर्स झोनची रेषा अंतिम आराखड्यात गायब झाल्याचे आढळले होते. त्यानंतर प्रशासनाने जलसंपदा विभागाकडून पूररेषा आखून घेतली असली तरी अगोदर महापालिकेने ज्या बांधकामांना परवानग्या दिल्या ती बांधकामे आजही नदीपात्र संकुचित करीत आहेत. नदीपात्रालगतची कोणतीही पक्की बांधकामे हटली नाहीत, उलट आखलेली पूररेषा कमी करण्यासाठी गेल्या दहा वर्षांपासून आटापिटा सुरू आहे. जी बांधकामे झाली आहेत, त्याच्या मालकांनी न्यायालयात जाऊन हा विषय आणखी घोळात ठेवली आहेत.   नदीपात्रांच्या संकोचाचा प्रश्न केवळ गोदावरी नदीपुरता मर्यादित नाहीतर नासर्डी, वाघाडी आणि वालदेवीबाबतदेखील आहेत. तेथील बांधकामेदेखील हटलेली नाहीत. गोदावरी नदीच्या प्रदूषणासंदर्भात उच्च न्यायालयातील याचिकेच्या अनुषंघाने मुंबई उच्च न्यायालयाने गोदावरी नदीपात्रातील बांधकामे हटविण्याचे आदेश दिले होते. महापालिकेचे तत्कालीन आयुक्त तुकाराम मुंढे यांनी त्या अनुषंघाने काही मंगल कार्यालये आणि लॉन्स हटविली होती. नंतर मात्र, सर्व कार्यवाही बंदच आहे. नदीपात्रातील गोरगरिबांच्या झोपड्या हटविल्या जातात, परंतु अन्य निवासी मिळकती, व्यापारी संकुले व अन्य बांधकामे ‘जैसे थे’ आहेत.---------एकही बांधकाम हटविण्यात आलेले नाहीमहापालिकेची बांधकामे ‘जैसे थे’ केवळ खासगी नव्हे तर महापालिकेसह अन्य शासकीय बांधकामेदेखील नदीपात्रालगत असून, तेही नदीपात्राचा संकोच करीत आहेत. महापालिकेचा गोदापात्र, पंचवटीतील गणेशवाडी येथील भाईमंडई, गणेशवाडी येथील अभ्यासिका, अशी अनेक बांधकामे आहेत, तर दुसरीकडे सार्वजनिक बांधकाम खात्याने नासर्डी नदीलगत समाज कल्याण खात्याचे कार्यालये आणि वसतिगृह बांधले आहेत. त्यातील एकही बांधकाम अद्याप हटविण्यात आलेले नाही.एकीकडे पूररेषतील बांधकामे हटविण्याचे आव्हान महापालिकेला पेलता येत नाही आणि दुसरीकडे पूररेषा कमी करण्याचे घाटत आहे. काहीही उपाययोजना करून पूररेषा कमी करून नदीपात्रातील बांधकामे वाचविण्याचे प्रयत्न असून, त्यात अनेक लोकप्रतिनिधी पुढाकार घेत आहेत, हे विशेष होय.(क्रमश:)

टॅग्स :Nashikनाशिक