शहरं
Join us  
Trending Stories
1
नेपाळचा पंतप्रधान कोण? आंदोलकांमध्येच जुंपली; भारत समर्थक म्हणून सुशीला कार्की यांना एका गटाने नाकारले
2
आजचे राशीभविष्य- १२ सप्टेंबर २०२५: प्रकृतीची काळजी घ्या, वाहन चालवताना दक्ष राहा!
3
सरकारचा जीआर कोणाला सरसकट आरक्षण देत नाही; मुख्यमंत्री फडणवीसांनी स्पष्ट केली भूमिका
4
विशेष लेख: मशाल हाती घेऊन इंजिन धावेल असे दिसते; पण...
5
बस प्रवास स्वस्त? टोलमध्ये मिळणार सवलत, राष्ट्रीय महामार्गासाठी टोल धोरण लवकरच
6
लाखो मुंबईकर लवकरच होणार 'अधिकृत रहिवासी'; २५ हजारांहून अधिक इमारतींच्या 'ओसी'चा मार्ग अखेर मोकळा
7
अग्रलेख: जागतिक खेडे ते खंडित जग! युद्धज्वर जगाला संपवून टाकेल
8
राज्यात तब्बल एक लाख आठ हजार कोटींची गुंतवणूक; ४७ हजार रोजगारांची निर्मिती होणार
9
व्होटबंदी : साप मेला नाही; पण दात काढले!
10
Mhada: ठाणे शहर आणि जिल्हा, वसईतील म्हाडाच्या ५ हजार घरांसाठी दोन लाख अर्ज
11
पाकिस्तानसोबत क्रिकेट नकोच..; IND-PAK सामन्यावर प्रियंका चतुर्वेदींचे सरकारला आवाहन
12
मोठी बातमी! एल्फिन्स्टन ब्रिज उद्या मध्यरात्रीपासून बंद; जाणून घ्या पर्यायी मार्ग...
13
Asia Cup 2025 PAK vs Oman : भारतीय वंशाचा कॅप्टन सलमानच्या पाकला भिडणार! अन्...
14
'रशियन तेल खरेदी थांबवा अन्यथा...',अमेरिकन मंत्री हॉवर्ड लुटनिकची भारताला पुन्हा धमकी
15
Asia Cup 2025 BAN vs HK : कॅप्टन लिटन दासची 'फिफ्टी'; बांगलादेशनं मॅच जिंकली, पण...
16
छत्तीसगडमध्ये भीषण चकमक! १ कोटीचा इनाम असलेला मोडेम बाळकृष्णसह १० नक्षलवादी ठार 
17
परदेशात कोणत्या गुप्त बैठकांसाठी जाता? CRPF च्या पत्रावरुन भाजपने राहुल गांधींना घेरले
18
Mustafizur Rahman Stunning Catch : विकेटचा रकाना रिकामा; पण मुस्ताफिझुरनं बेस्ट कॅचसह केली हवा (VIDEO)
19
'लष्करी शक्तीच्या जोरावर पाच पट मोठ्या भारताला...', पाकिस्तानच्या संरक्षणमंत्र्यांनी पुन्हा गरळ ओकली
20
खासदार प्रशांत पडोळे अपघातातून थोडक्यात बचावले ; नक्षलग्रस्त भागात शासकीय सुरक्षा व्यवस्था न दिल्याचा मुद्दा चर्चेत

सरदवाडी येथे बिबट्याने पळवला बोकड

By admin | Updated: March 5, 2016 23:04 IST

बंदोबस्ताची मागणी: दोन महिन्यांपासून परिसरात दहशत कायम

सरदवाडी : सिन्नर तालुक्यातील सरदवाडी शिवारात चरत असलेल्या शेळ्यांच्या कळपातून बिबट्याने बोकड उचलून नेल्याची घटना शुक्रवारी सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास घडली. या घटनेमुळे परिसरात घबराट पसरली असून, बिबट्याचा बंदोबस्त करण्याची मागणी होत आहे. सरदवाडी गावाच्या पश्चिमेला वन विभागाचे जंगलक्षेत्र आहे. याच भागातील पांगरवाडीत राहणाऱ्या लक्ष्मण कुंवर यांचा शेळीपालनाचा व्यवसाय असून, त्यांच्याकडे लहान-मोठ्या अशा सुमारे ५० शेळ्या आहेत. शुक्रवारी नेहमीप्रमाणे कुंवर दांपत्य जंगलालगत शेळ्या चारत होते. यावेळी दबा धरून बसलेला बिबट्याने अचानक कळपातील पूर्ण वाढ झालेल्या बोकडावर झडप घालून त्याला जंगलाकडे पळवून नेले. ही घटना कुंवर दांपत्यासमोर झाल्याने त्यांची भीतीपोटी पाचावर धारण बसली. जंगलाकडे बोकड घेऊन जात असलेल्या बिबट्याकडे ते हताशपणे बघत राहिले. डोळ्यांदेखत अवघ्या काही फुटांच्या अंतरावर हा थरार पाहिलेल्या कुंवर यांनी कळप घेऊन घराकडे जाणे पसंत केले.बिबट्याच्या हल्ल्याची माहिती मिळताच परिसरातील युवकांनी घटनास्थळी धाव घेतली. घनदाट जंगल, मोठ्या प्रमाणात वाढलेले गवत आणि बिबट्याचे वर्णन ऐकल्यानंतर युवकांनी भीतीपोटी बोकडाचा शोध घेण्याचा विचार सोडून दिला. शनिवारी सदर घटनेची माहिती सिन्नर येथील वन विभागास कळविल्यानंतर कार्यालयाकडून बिबट्याने खाल्लेल्या बोकडाचे अवशेष किंवा त्याचे फोटो काढून आणण्यास कर्मचाऱ्यांनी सुचविले, असे कुंवर यांनी सांगितले.महिनाभरापूर्वी सरदवाडी गावालगत माजी सरपंच बजुनाथ सिरसाट यांच्या उसाच्या शेतात बिबट्याने ठाण मांडले होते. सदर ऊस तोडल्यानंतर बिबट्याने आपला मुक्काम गावाच्या पश्चिमेकडील वन विभागाच्या जंगलात हलवला आहे. या कालावधीत बिबट्याने अनेक कुत्रे व कोंबड्यांचा फडशा पाडला आहे. शेतात काम करणाऱ्या अनेक शेतमजुरांना अनेकवेळा बिबट्याने दर्शन दिल्याने परिसरात भीतीचे वातावरण आहे. बिबट्याचा बंदोबस्त करण्यासाठी परिसरात पिंजरा लावावा, अशी मागणी होत आहे. (वार्ताहर)