नाशिक : रविवार कारंजावरील अनेक वर्षांपासून बंद असलेल्या हेमलता चित्रपटगृहास गुरुवारी (दि़ ५) मध्यरात्रीच्या सुमारास आग लागली़ या आगीमध्ये दोन वाहनेही जळून खाक झाली असून, नागरिकांंनी तत्काळ अग्निशमन विभागास माहिती दिल्यानंतर त्यांनी या आगीवर नियंत्रण मिळविले़शहराच्या मध्यवस्तीत असलेल्या रविवार कारंजा परिसरात हेमलता टॉकिज आहे़ गुरुवारी मध्यरात्री दोन वाजेच्या सुमारास अचानक या टॉकिजला तसेच भिंतीलगत उभ्या केलेल्या दोन दुचाकींना आग लागल्याचे नागरिकांच्या लक्षात आले़
हेमलता चित्रपटगृहास आग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 7, 2018 01:27 IST